Friday, 18 September 2020

DIO BULDANA CORONA ALERT 18.9.2020

 सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी अर्ज करावे

  • जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका)दि. 18 : सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार भारत सरकारच्यावतीने दरवर्षी देण्यात येतो. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल व्हावी यादृष्टीने हा पुरस्कार देण्यात येतो. तरी 2021 वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागवीण्यात आले असून अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. इच्छुकांनी http://dmawards.mdma.gov.in या पोर्टलवर जावून लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावे. हे अर्ज ऑनलाईन प्रक्रियेने सादर करण्यासाठी इच्छूक व्यक्ती, संस्था यांकडून अर्ज 30 सप्टेंबर पर्यंत आमंत्रित करण्यात आले आहे. तरी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   

**********

कोरोना अलर्ट : प्राप्त 321 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 93 पॉझिटिव्ह

  • 76 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 321 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 93 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 73 व रॅपिड टेस्टमधील 20 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 155 तर रॅपिड टेस्टमधील 166 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 321 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 12, खामगांव तालुका : घाटपुरी 2, पिं. राजा 1,   शेगांव शहर : 21, शेगांव तालुका : पहुरजीरा 1,  आडसूळ 5, उन्हारखेड 2,   दे. राजा तालुका : दे. मही 1, दे. राजा शहर : 1, लोणार तालुका : मांडवा 1, गायखेड 1, सावरगांव मुंढे 1, किन्ही 2, वडगांव तेजन 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : नरवेल 1, वडजी 1,  मेहकर शहर : 1, जळगांव जामोद तालुका : जामोद 1, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा शहर : 1, मोताळा तालुका : सहस्‌त्रमुळी 1,  टाकळी 1, मोताळा शहर : 6, चिखली शहर : 10, चिखली तालुका : मेरा खु 2, असोला 1, सातगांव भुसारी 2, बुलडाणा तालुका : वरवंड 1,  बुलडाणा शहर : 3, नांदुरा तालुका : निमगांव 1, खुमगांव बुर्टी 1,  मूळ पत्ता मुक्ताई नगर जि. जळगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 93 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  सिं.राजा तालुका : साखरखेर्डा 3, शेंदुर्जन 2,  राजेगांव 1, सिं. राजा शहर : 1, दे. राजा शहर : 8,  दे. राजा तालुका : दे. मही 5, गारखेडा 5, पांगरी 1,   चिखली तालुका : वरूड 1, चिखली शहर : 1, लोणार तालुका : तांबोळा 3, सुलतानपूर 1, चिखला 1,  खामगांव शहर : 1, मेहकर तालुका : कळंबेश्वर 1, बेलगांव 7, खामगांव तालुका : लाखनवाडा 1,   मलकापूर शहर : 15, मलकापूर तालुका : विवरा 1, मोताळा तालुका :पिं देवी 1, धा. बढे 1, नांदुरा शहर : 2,   नांदुरा तालुका : निमगांव 6, बेलूरा 1, वडनेर 1, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 1, जळगांव जामोद शहर : 3,  मूळ पत्ता घनसावंगी जि. जालना 1.

   तसेच आजपर्यंत 25422 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4413 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4413 आहे. 

  आज रोजी 1805 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 25422 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5597 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4413 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1115 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment