आत्मनिर्भर अभियानाची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांची उद्दीष्टपूर्ती करावी
- खासदार प्रतापराव जाधव
- विविध प्रलंबीत योजनांच्या कामांची आढावा बैठक
- कोविड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा द्याव्यात
- शासनाकडून प्राप्त कुठलीही मदत कर्ज खात्यात टाकू नये
- पोषण आहाराचे प्रमाण व दर्जा वेळोवेळी तपासावा
बुलडाणा,(जिमाका) दि.4: कोरोना विषाणू संसर्ग परिस्थीतीमुळे समाजातील प्रत्येक घटक व्यथित आहे. सर्व क्षेत्रामध्ये निराशा आलेली आहे. रस्त्यावर फिरती विक्री करणारे विक्रेते यांना तर कोरोनाची चांगलीच झळ बसली आहे. या सर्व घटकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांना अशा बिक्ट आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासन आत्मनिर्भर अभियान राबवित आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, असे निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिले.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात प्रलंबीत योजनांमधील कामांच्या बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार डॉ. संजय रायमूलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थीत होते. तसेच बैठकीला संबधीत विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
कापूस, मका खरेदीचा आढावा घेताना खासदार श्री. जाधव म्हणाले, नोंदणी केलल्या शेतकऱ्यांचा मका व कापूस खरेदी करायचा रहीला असेल, तर तो खरेदी करावा. कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची माहीती घेवून तो खरेदी करावा. आत्मनिर्भर अभियानाचा लाभ देण्यासाठी संबधीत यंत्रणेने बँकांच्या तालुका निहाय बैठका घ्याव्यात. बँकांनी मानवतेच्या दृष्टीने बघून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून आर्थिक लाभ द्यावा. कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. त्यांना पाणी, भोजन, नाश्ताची व्यवस्था करावी. कुणाहीची तक्रार याबाबत यायला नको. कोरोना बाधीत रूग्णांना आता गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. याबाबत त्यांना कुठेही संपर्क न करण्याचे, घरातच राहण्याबाबत समजावून सांगावे. प्राथमिक गरजा भागविल्या जातील अशा जम्बो कोवीड हॉस्पीटल निर्मितीबाबत कारवाई करावी.
पिक विमा कंपनीने विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेवून निकाली काढण्याचे सूचित करीत खासदार म्हणाले, यावर्षीच्या नुकसानीची सहानुभूतीने सर्वे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा. पीएम किसान योजनेत नोंदणी राहीलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी. एका महीन्यात हे काम पूर्ण करावे. स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कुटूंबप्रमुखांएवजी एका सदस्यालाही आता लाभ मिळतो. याबाबत मागील एका वर्षाच्या काला वधितील सादर प्रकरणे तपासून कुंटूंबातील सदस्य लाभास पात्र असेल, तर लाभ द्यावा. याबाबत कृषी सेवक, सहाय्यक यांनी गावात जावून जनजागृती करावी. शेतकऱ्यांना या बदलाची माहीती द्यावी. याचा बुलडाणा पॅटर्न राबवावा.
ते पुढे म्हणाले, बँकांनी त्यांच्याकडील वन टाईम सेटलमेंट योजनांची प्रसिद्धी करावी. जुने थकीत खातेदार शेतकऱ्यांकडून ओटीएस ची मुद्दलाची योजनेप्रमाणे 70 टक्के पर्यंत असणारी रक्कम भरून शेतकऱ्यांचे उर्वरीत कर्ज माफ करावे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाने दिलेली कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती करू नये. अशा बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात. महीला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधून दिला जाणारा पोषण आहाराचा दर्जा तपासून घ्यावा. सदर आहाराचे वितरण शासनाच्या नियमाप्रमाणे परिमाणात होत आहे किंवा नाही, याबाबतही भेटी देवून अहवाल घ्यावा. कमी पुरवठा असल्यास संबंधीत कंत्राटदारांकडून लाभार्थ्यांना वाटप करावा. त्याचप्रमाणे यावेळी समृद्धी महामार्ग, ग्रामिण रस्ते, दलित वस्ती सुधार योजना, मेहकर व लोणार नगर परिषदेकडील प्रलंबीत विषयांचाही आढावा घेण्यात आला. आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी मतदारसंघातील प्रलंबीत कामांचा आढावा घेतला व संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. बैठकीला संबधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
********
सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन
- कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
- मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
- व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.4: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हा लोकशाही दिन होणार आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील,
निवृत्ती वेतन धारकांनी to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर माहिती सादर करावी
- 30 सप्टेंबर अंतिम मुदत
- जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन धारक, कुटूंबनिवृत्ती वेतन धारकांची माहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. तरी निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती कोषागार कार्यालयाकडे शक्य तितक्या लवकर सादर करावी. माहीती सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात येण्याची गरज नाही, सदर माहीती to.buldhana@zillamahakosh.in या ईमेलवर सादर करावी. ज्या निवृत्ती वेतन धारकांनी ही माहीती सादर केले नाही, त्यांनी विना विलंब सादर करावी. या माहितीमध्ये पुर्ण नाव, पत्ता, पीपीओ क्रमांक, पॅन कार्ड, भ्र्मणध्वनी / दूरध्वनी क्रमांक, असल्यास ई मेल आयडी आणि आधार क्रमांक आदींचा समावेश असावा. ही माहिती पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2020 आहे.
केंद्र शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गणनेमध्ये बदल केले असून नवीन कर आकारणी प्रक्रिया आणि जुनी कर आकारणी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार केवळ आयकरास पात्र निवृत्तीवेतन धारकांनी आपल्याला हवी असलेली कर आकारणी प्रक्रीया निवडून जिल्हा कोषागार कार्यालयाला to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर आपले नाव, पीपीओ क्रमांक, बँक शाखेबाबत 15 ऑक्टोंबर पर्यंत कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
**********
धाड ते धामणगांव रस्त्याच्या बाजुने साखर कारखाना फाट्याजवळ सागवन जप्त
- ज्यांच्या मालकीचा माल आहे, त्यांनी 7 दिवसाचे आत संपर्क करावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) बुलडाणा यांचे अखत्यारितील गुम्मी वर्तुळामध्ये गुम्मी बीट अंतर्गत कक्ष क्रमांक 344 बी साग वृक्षतोडीबाबत वनगुन्हा 10 मे 2020 रोजी कायम करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी राखीव वनात तुट झालेल्या मालाचा शोध घेत असताना चौकशीमध्ये धाड ते धामणगांव रस्त्याच्या बाजुने साखर कारखान्याचे फाट्या जवळ संशयास्पद सागवान गोल नग 11 सापडले आहेत. जप्त केलेले नग 1.197 घनमीटर असून त्याची किंमत 73 हजार 985 रूपये आहे. सदर जप्त करण्यात आलेला साग माल कोणाच्या मालकीचा असल्यास त्यांनी मालकी हक्काबाबत वैध दसतएवजासह वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालयात पुढील 7दिवसाचे आत सादर करावे, असे वनपरीक्षेत्र अधीकारी जी. पी टेकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कोरोना अलर्ट : प्राप्त 309 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 91 पॉझिटिव्ह
- 167 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 400 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 309 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 91 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 188 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 309 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 12, सोळंके ले आऊट 1, सरस्वती नगर 1, बुलडाणा तालुका : सावळा 1, गुम्मी 1, मेहकर तालुका : जानेफळ 7, डोणगांव 6, मेहकर शहर : 1, चनखोरे ले आऊट 1, खामगांव शहर : सुटाळपुरा 1, पुरवार गल्ली 1, शिवाजी नगर 1, चांदे कॉलनी 1, जलालपूरा 1, माखरीया मैदान 1, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, शेगांव तालुका : माटरगांव 4, जवळा बु 4, शेगांव शहर : राजेश्वर कॉलनी 1, व्यंकटेश नगर 2, दसरा नगर 1, रोकडीया नगर 1, नांदुरा तालुका : धानोरा विटाळी 1, सिं. राजा तालुका : बारलिंगा 6, वाघाळा 1, पिंपळगांव पुडे 1, सिं. राजा शहर : 4, दे. राजा शहर : 4, सिव्हील कॉलनी 1, दे. राजा तालुका : मेंडगांव 1, दे. मही 1, लोणार शहर : 1, मोताळा तालुका : धा. बढे 3, तरोडा 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, शिवणी पिसा 1, संग्रामपूर : कोंडवाडा नगर 1, संग्रामपूर तालुका : पेसोडा 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, मडाखेड 1, मूळ पत्ता वाशिम 2, दगडखेड ता. बाळापूर जि. अकोला 1, वडगांव ता. बाळापूर 1, हाता ता. बाळापूर 1, जठारपेठ अकोला 3, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 91 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान शेंदुर्जन ता. सिं. राजा येथील 73 वर्षीय पुरूष, फत्तेपूर ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरूष, दुधलगांव ता. मलकापूर येथील 70 वर्षीय महिला, शिवणी पिसा ता. लोणार येथील 74 वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
तसेच आजपर्यंत सर्वात जास्त 167 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, विजय नगर 1, शिवाजी नगर 1, गाडगे नगर 2, विष्णूवाडी 3, बुलडाणा तालुका : बोरखेडी 1, धाड 2, सागवन 1, सावरगांव 1, मलकापूर शहर : 3, हेलोडे अपार्टमेंट 1, मंगल गेट 3, होंडा शो रूम जवळ 2, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : माळेगांव 1, तपोवन 3, सिं. राजा तालुका : हनवतखेड 2,हिवरखेड 3, नांदुरा शहर : 1, संकल्प कॉलनी 4, सिनेमा रोड 1, नवाबपुरा 1, खामगांव शहर :2, जलालपूरा 2, घाटपुरी नाका 2, सुदर्शन नगर 2, गोपाल नगर 7, शंकर नगर 5,किसन नगर 2, सुटाळा 4, वाडी 13, जोशी नगर 1, हिरा नगर 1, यशोधरा नगर 1, सती फैल 1, खामगांव तालुका : भालेगांव 6, तेल्हारा 1, पि. राजा 4, जळका तेली 1, चिखली शहर : 5, जिजाऊ नगर 2, चिखली तालुका : मेरा बु 13, अमडापूर 1, शेलगांव आटोळ 1, शेवगा 1, सवणा 1, सातगाव भुसारी 1, दे. राजा शहर : 5, सिव्हील कॉलनी 1, माळीपुरा 3, मेहकर शहर : 5, मेहकर तालुका : जायगांव 5, बरटाळा 1, जानेफळ 1, हिवरा खु. 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, अंजनी खुर्द 1, लोणार शहर : 8, शेगांव शहर : सदगुरू नगर 1, सुरभी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, धानुका 1,गजानन सोसायटी 4, मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला : 1.
तसेच आजपर्यंत 19310 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2572 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2572 आहे.
आज रोजी 1105 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 19310 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3605 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2572 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 980 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 53 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*************
No comments:
Post a Comment