कोरोना अलर्ट : प्राप्त 512 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 196 पॉझिटिव्ह
- 125 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.8: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 708 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 512 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 196 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 156 व रॅपिड टेस्टमधील 40 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 288 तर रॅपिड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 512 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 11, तलाव रोड 1, चांदे कॉलनी 1, सुटाळा 7, सिवील लाईन 2, नटराज गार्डन 1, घाटपुरी रोड 2,तायडे कॉलनी 1,डि पी रोड 1, कॉटन मार्केट रोड 1, सुटाळपुरा 3, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, शेलोडी 1, दे. राजा शहर : 10, माळीपुरा 1, भगवान बाबा नगर 1, दुर्गापूरा 1, योगीराज नगर 1, दे. राजा तालुका : निमगांव गुरू 16, दे. मही 5, मेंडगांव 1, बुलडाणा शहर : 10, चैतन्यवाडी 1, साई नगर 1, आंबेकर नगर 1, गणेश नगर 1, बुलडाणा तालुका : कोलवड 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : दे. घुबे 1, मेरा बु 1, किन्होळवाडी 2, मलकापूर शहर : 8, लख्खानी चौक 2, दादावाडी 1,द्वारका नगर 1, एसबीआय बँक 1, मलकापूर तालुका : शिराढोण 1, विवरा 6, मोरखेड 1, मेहकर शहर : 6, मेहकर तालुका : डोणगांव 1, बोरी 2, जानेफळ 4, मोताळा तालुका : बोराखेडी 1, धा. बढे 1, इब्राहीमपूर 1, मोताळा शहर : 2, लोणार तालुका : बिबी 2, शिवणी पिसा 14, नांदुरा तालुका : निमगांव 5, वडनेर भोलजी 2, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 7, खेर्डा 4, जामोद 1,वाडी खु 1, सिं. राजा तालुका : आगेफळ 1, मोहाडी सवडत 5, दरेगांव 1, झोटींगा 1, साखरखेर्डा 1, सिं. राजा शहर : 5, शेगांव शहर : 1, दुर्गा नगर 1, माळीपुरा 1,गुरूकृपा अपार्टमेंट 4,पोलीस स्टेशन 3, संग्रामपूर शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 196 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान धाड ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 125 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : धोत्रा नंदई 1, शेगांव शहर : 1, माळीपुरा 1, शेगाव तालुका : भोनगांव 1, माटरगांव 1, नांदुरा शहर : 3, राहुल टॉवर 3, गावंडेपुरा 1, भीमनगर 1, हेलगे नगर 1, नांदुरा तालुका : निमगांव 3, माळेगांव गोंड 1, मलकापूर शहर : 3, संत गजानन नगर 1, खामगांव शहर : 6, रेखा प्लॉट 2, पोलीस वसाहत 1, शामल कॉलनी 2, सुदर्शन नगर 1, नगर परीषद 7, अमृत नगर 1, वाडी 2, आठवडी बाजार 1, खामगांव तालुका : अटाळी 1, तहसील कार्यालय 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : शेलगांव ज 1, सि. राजा तालुका : सोयंदेव 1, उमरद 2, कि. राजा 2, वाघाळा 2, साखरखेर्डा 1, सिं. राजा शहर : 3, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोणगांव 13, मोताळा तालुका : खेडी 2, बुलडाणा शहर : 8, विश्वास नगर 1, इकबाल नगर 1, वानखडे ले आऊट 3, विठ्ठलवाडी 1, बुलडाणा तालुका : सव 1, सावळा 1, कासारखेड 1, लोणार शहर : 13, जळगांव जामोद शहर : 2, माळी फैल 2, जळगांव जा. तालुका : पिं. काळे 5, खेर्डा खु 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, मूळ पत्ता : वडाळा ता. जाफ्राबाद जि. जालना 1,
तसेच आजपर्यंत 20941 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3008 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3008 आहे.
आज रोजी 1337 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 20941 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4191 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3008 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1124 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 59 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**************
पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेचे खाते उघडावे
- डाक विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8: पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीचे काही विद्यार्थ्यांनी खाते पोस्ट ऑफीसमध्ये उघडले आहे. पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3.7 लक्ष आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी डाक कार्यालयात येवून आयपीपीबी अर्थात इंडियाज पोस्ट पेमंट बँकेचे खाते आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करावे. अशा विद्यार्थ्यांना याबाबत एसएमएससुद्धा पाठविण्यात आले आहे. त्यांनी आपल्या जवळच्या डाक कार्यालययात जावून आधार लिंक खाते काढून घ्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती जवळच्या डाक कार्यालयातच मिळेल. तरी विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेवून इंडियाज पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर बुलडाणा विभाग यांनी केले आहे.
शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू
- विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8: शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा येथे सत्र 2020 – 21 साठी इयत्ता 11 वी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता 10 वीत उत्तीर्ण किंवा एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. या महिावद्यालयात उच्च माधमिक अभ्यासक्रम एचएसची व्होकेशनल साठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रती अभ्यासक्रमाच्या 30 जागा आहेत. अधिक माहितीसाठी 9673488997, 9850318228, 9822716170, 8605735258 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र व कनिष्ठ महाविद्यालय, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलडाणा या ठिकाणी संपर्क करावा. तरी विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment