कोरोना अलर्ट : प्राप्त 380 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 150 पॉझिटिव्ह
- 150 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.7: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 530 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 380 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 150 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 121 व रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 209 तर रॅपिड टेस्टमधील 171 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 380 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 16, उसरा 1, पिं. काळे 1, मडाखेड 1, मोताळा तालुका : धा. बढे 1, मोताळा शहर : 3, मलकापूर शहर : 6, आदर्श कॉलनी 1, चाळीस बिघा 1, लख्खानी चौक 1, विष्णूवाडी 1, लक्ष्मी नगर 1, रजत नगर 1, मलकापूर तालुका : तालसवाडा 1, दे. राजा तालुका : गारखेडा 1, अंढेरा 2, खैरव तळेकर 1, दे. मही 3, सातेफळ 1, सावखेड नागरे 1, निमगांव गुरू 1, गारगुंडी 6, दे. राजा शहर : 1, चिखली रोड 1, योगीराज नगर 1 शिवाजी नगर 1, शिंगणे नगर 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : डोणगांव 4, गणपूर 1, मादनी 2, कल्याणा 1, नांदुरा शहर : एसबीआय बँकेजवळ 1, नांदुरा तालुका : निमगांव 2, नायगांव 2, चिखली शहर : 5, चिखली तालुका : कोनड खु 3,गांगलगांव 2, भालगांव 1, बुलडाणा शहर : 10, केशव नगर 5, जुनागाव 1, पोलीस लाईन 1, सुंदरखेड 4, पोलीस वसाहत 1, खामगांव शहर : 2, शिवाजी नगर 1, सावजी ले आऊट 4, चांदे कॉलनी 2, जगदंबा रोड 1, पुरवार गल्ली 2, फरशी 1, घाटपुरी नाका 3, सिंधी कॉलनी 1, कृषी कार्यालय 1, सती फैल 1, खामगांव तालुका : अटाळी 1, लाखनवाडा 5, बुलडाणा तालुका : मातला 1, भादोला 1, केसापूर 4, नांद्राकोळी 2,धाड 2,कोळेगांव 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, किनगांव राजा 1, लोणार तालुका : चिंचोली 1, दरेगांव 1, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 150 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 150 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, वावरे ले आऊट 2, वानखेडे ले आऊट 7, हाजी मलंग दर्गाजवळ 1, जोहर नगर 1, परदेशीपुरा 1, वार्ड नं दोन 1, बुलडाणा तालुका : गुलखेड 1, धाड 1, धामणगांव 4, मासरूळ 2, नांदुरा शहर : 2, कृष्णा नगर 1, रसलपूरा 1, पीएचसी क्वार्टर 2, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तपोवन 16, धा. बढे 2, बोराखेडी 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : भालगांव 2, कारखेडा 1, किन्ही सवडत 1, दे. राजा शहर : 5, भगवान बाबा नगर 1, दे.राजा तालुका : दे. मही 1, धोत्रा नंदई 1, मेहकर शहर : 17, राम नगर 3, मेहकर तालुका : जानेफळ 1, मलकापूर शहर : 5, लोणार तालुका : बिबी 10, शेगांव तालुका : तिव्हाण 1, चिंचखेडा 1, जलंब 1, सागोन 1, शेगांव शहर : 1, भुत बंगलाज जवळ 2, गोमाजी नगर 2, व्यंकटेश नगर 2,मंगलम नगर 1, एसबीआय कॉलनी 1, धानुका 1, गौलखेड 1, धनगर नगर 1, रोकडीया नगर 1, मोदी नगर 1, खामगांव शहर : 6, गोपाल नगर 2, अभय नगर 1, वाडी 1, घाटपुरी नाका 3, विकमशी चौक 3, सिं. राजा तालुका : कि. राजा 1, वाघाळा 2, लोणार शहर : 1,
तसेच आजपर्यंत 20429 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2883 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2883 आहे.
आज रोजी 1444 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 20429 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3995 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2883 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1054 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 58 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**************
उपप्रादेशि परिवहन कार्यालयाचा शिबीर दौरा जाहीर
- सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याचा कालावधी
बुलडाणा,(जिमाका) दि.7: जिल्ह्यातील मोटार वाहन चालक तसेच मालक यांच्या सोयीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा वाहन कर, वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी व वाहन चालक परवाना कामाकरीता मासिक शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तरी संबंधीत कर्मचाऱ्यांनी दौऱ्याच्या ठिकाणी वेळेवर हजर रहावे. नागरीकांनी या शिबिर कार्यालयाचा लाभ घ्यावा.
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सप्टेंबर 2020 : शेगांव 7, मेहकर 9 व 30, खामगांव 11 व 28, चिखली 14, दे .राजा 15, लोणार 18, नांदुरा 21, मलकापूर 23, सिं. राजा 25, ऑक्टोंबर 2020 : जळगांव जामोद 5, शेगांव 7, मेहकर 9 व 29, खामगांव 12 व 28, चिखली 14, दे .राजा 16, लोणार 19, नांदुरा 21, मलकापूर 23, सिं. राजा 26, नोव्हेंबर 2020 : जळगांव जामोद 4, शेगांव 6, मेहकर 9 व 24, खामगांव 11 व 27, चिखली 12, दे .राजा 17, लोणार 19, नांदुरा 20, मलकापूर 23, सिं. राजा 25, डिसेंबर 2020 : जळगांव जामोद 4, शेगांव 7, मेहकर 9 व 30, खामगांव 11 व 28, चिखली 14, दे .राजा 16, लोणार 18, नांदुरा 21, मलकापूर 23, सिं. राजा 24.
या शिबिराच्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्यास दौरा दुसऱ्या दिवशी होणार आहे. या ठिकाणी येताना अर्जदारांनी हात मोजे, मास्क् व सॅनीटायझर घेवून यावे. तसेच सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
************
लम्पी या विषाणूजन्य आजाराला पशुपालकांनी घाबरू नये
- लम्पी हा त्वचारोग
- पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.7: लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या रोगाचा प्रसार हा माशा, गोचीडे, मच्छरे व चिलटे यांपासून मुख्यत्वे होतो. या रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रिप्रॉक्स या प्रवर्गातील आहे. हा रोग गायवर्गीय जनावरांमध्ये आढळून येतो. तसेच म्हैस वर्गामध्ये क्वचित आढळून आला आहे. या आजारामुळे पशुपालकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जि.पचे पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा उपायुक्त डॉ. बोरकर, सहाय्यक आयुक्त् डॉ. पी. व्ही सोळंके व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी केले आहे.
या रोगाचा प्रसार हा झारखंड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात आढळून आला आहे. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात हा रोग निर्दशनास आला आहे. या रोगामध्ये जनावरांच्या अंगावर गाठी येणे, सुज येणे, जखम होणे, डोळे, नाक यामधून पाणी येणे व ताप अशी लक्षणे दिसून येतात. यावर औषधेउपचार केल्याने या आजारावर नियंत्रण मिळविता येते. सध्या जिल्ह्यात चिखली परीसरात तसेच शिवणी आरमाळ ता. दे. राजा, पाडळी शिंदे, सोनोशी, पिंप्री गवळी ता. मोताळा, निमखेड, सोयंदेव, धामणगांव धाड येथे या रोगाचा तुरळक प्रभाव दिसून आला आहे. रोग बाधीत जनावरांवर औषधे उपचार सुरू आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे. या रोगाचा प्रसार होवू नये म्हणून गोठ्याचे व परीसराचे निर्जंतुकीकरण करावे. माशा, गोचीड, मच्छरे, चिलटे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग असून बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना दूर ठेवावे. तसेच बाधीत जनावरांचे विलगीकरण करावे. बाधीत क्षेत्रात गायी, म्हशींची खरेदी, विक्री तसेच पशुबाजार बंद करावे, असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
**********
जिल्हाधिकारी कार्यालयात
आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका), 7 : आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी, उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी- कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0
No comments:
Post a Comment