सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक कर्ज घ्यावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*30 जून पूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज
*बँकेत पीक कर्जासाठी विशेष व्यवस्था
बुलडाणा, दि.15 : येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा होणार आहे. बियाणे, रासायनिक खते यासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊन पीक कर्ज घ्यावे, तसेच शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी जुन्या पीक कर्जाचे 30 जून पूर्वी पुनर्गठन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्याला १५०० कोटी रुपयाचा पीक कर्ज आराखडा मंजूर झाला आहे. यात आतापर्यंत 30 टक्के म्हणजेच सुमारे ४५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासायास कर्जपुरवठा व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करावा. कर्ज मिळण्यास अडचण आल्यास जिल्हा अग्रणी बँकेतर्फे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी 7507766004 या क्रमांकावर संपर्क करावा.
शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास सदर पीक कर्जाची परतफेड 30 जून पूर्वी करणे आवश्यक आहे. 30 जून पूर्वी कर्जाची परतफेड झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याजदर लागणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही. पीक कर्ज घेतल्याने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर, सिबिल स्कोर आदी फायदे होणार आहेत
शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रत्येक बँकेत विशेष खिडकी निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणताही त्रास होणार नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्जाची प्रकरणे जलद गतीने मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहे.
000000
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, दि. 15 : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार रविवार, दि. 16 जून 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता मेकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित राहतील.
सोमवार दि. 17 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता मेहकर येथून चिखलीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिजाऊ सभागृह, श्रीराम नागरी पतसंस्था, चिखली येथे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहतील. दुपारी दोन वाजता चिखली येथून मेहकरकडे प्रयाण करतील. त्यानंतर सोयीने दिल्लीकडे रवाना होतील.
00000
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा सोमवारी जिल्हा दौरा
बुलडाणा, दि. 15 : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार सोमवार, दि. 17 जून 2024 रोजी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर येथून निघून दुपारी 1.50 वाजता शेगाव येथे पोहोचतील. त्यानंतर श्री गजानन महाराज संस्थान येथे पूजा आणि दर्शन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी तीन वाजता शेगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment