एक कोटी वृक्षलागवडीत सर्व घटकांचा सहभाग घेणार
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 13 : शासनाच्या निर्णयानुसार एक जुलैपासून एक कोटी वृक्षलागवडीस सुरवात होणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवडी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, वृक्ष लागवड मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. यासाठी शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, कर्मचारी, बचतगटांच्या महिलांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे. या वृक्ष लागवडीसाठी रोपे मोफत देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळपिक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येऊन वृक्ष लागवड करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीमधील रोपे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ही झाडे दत्तक घेण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
वृक्ष लागवड मोहिमेसोबतच बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बांबूची रोपे इश्वेद बायोटेक या कंपनीकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने रोपांची मागणी नोंदवावी. बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षात हेक्टरी 7 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे बांबू शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे स्वतंत्र निर्देश येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाची ही प्रमुख योजना म्हणून राबविल्या जाणार आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून बांबू लागवड आणि विपनन संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
वृक्षांची रोपे सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या नर्सरीमधून देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागा निश्चिती करण्यात यावी. यासाठी मोकळ्या जागा, अतिक्रमीत जागांचा शोध घेऊन याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी. शाळांमधील मोकळ्या जागा, कुंपन, ग्रामपंचायतीचे क्षेत्र, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक झाड लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 28 हजार बचतगटांच्या महिलांनाही यात सहभागी करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्षाचे संगोपन करण्यासाठी ही झाडे दत्तक देण्यात येणार आहे.
00000
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन
खामगाव, दि. 13 : आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी, दि. 13 जून रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधी आणि श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.
श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने श्री. जाधव यांचा स्वागत शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय रायमुलकर, संस्थानचे विश्वस्त हरीहर दादासाहेब पाटील, तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
कृषी दिनानिमित्त शहरात ‘ग्रीन बुलडाणा मिशन’
बुलडाणा, दि. 13 : जिल्हा प्रशासन, बुलडाणा नगर पालिका आणि इंडियन रेड क्रॉस समितीतर्फे कृषी दिनानिमित्त दि. 1 जुलै 2024 रोजी शहरामधील प्रमुख रस्ते, पादचारी रस्ते, ले-आऊट मधील खुल्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी ‘ग्रीन बुलडाणा मिशन’ राबविण्यात येणार आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या बुलडाणा शहराला पुर्वीचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यात शहरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था सामुदायिक मंडळ, विविध संघटनाचे पदाधिकारी आणि नागरीकांनी राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग होणे आवश्यक आहे.
सामुहिक वृक्ष लागवडीसाठी बुलडाणा नगरपालिका खड्डे खोदण्यासाठी मदत करणार आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी संबंधितांनी परिसरातील सुयोग्य जागेची निवड करावी, तसेच याबाबत मुख्याधिकारी यांना जागाची व वृक्ष लागवडीकरीता आवश्यक रोपाची माहिती देण्यात यावी. वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नसल्यास नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा. तसेच सामुहिकपणे लावण्यात येणारी रोपे नागरिकांनी दत्तक घेऊन संगोपन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनने केले आहे.
वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी 9422181032, 9422884421, 9763516110, 8668836356, 9594532581 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
000000
पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबत संपर्क करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : प्रधानमंत्री पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी पीक विमा कंपनीच्या जिल्हा, तालुकास्तरावरील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तालुकानिहाय नेमलेल्या संबंधीत तालुका विमा प्रतिनिधी आणि जिल्हा विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क क्रमांक, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनीद्वारे सुमारे 2 लाख 42 हजार 134 शेतकऱ्यांना सुमारे 161 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 67 हजार 874 शेतकऱ्यांना सुमारे 38 कोटी रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 74 हजार 260 शेतकऱ्यांना 123 कोटी रूपयांची नुकसान भरपाई जूनअखेर वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर पीक विमा कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधी यांचे नाव व संपर्क क्रमांक
नितीन सावळे, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी, डॉ.काटकर हॉस्पिटल जवळ, बुलढाणा, 8329097567, 9403265135, अमित पवार, बुलडाणा, डॉ. काटकर हॉस्पिटल जवळ, बुलढाणा, 8380876744, अमोल गाडेकर 9588411588, योगेश मोहिते 9730958213, सुमित पवार 9637565972, सूर्यकांत चिंचोळे, चिखली, रोहिदास नगर, राऊतवाडी रोड, चिखली 8806677166, शंकर परिहार 9764115567, गजानन सुरडकर 9579639231, किरण लेंडे 9921418162, मयूर चौधरी 9506764615, योगेश जांभे, मोताळा, सांगळद रोड, मोताळा 9673687489, तुषार सरोदे 9623904737, मनोहर पाटील, मलकापूर, गोपाल कृष्णानगर, बुलढाणा रोड, मलकापूर, 7987436939, सचिन मापारी 9921537731, प्रशांत अहिरे 9764185140, मंगेश कऱ्हाडे, खामगाव, वामन नगर चौक, खामगाव 8806075155, मोहम्मद उमर मो. हारून 8669104485, परमेश्वर खोडके 9359298549, श्रीकांत आखरे 8600709500, शिरधर नंदणे 7020761482, सुभाष निकम शेगाव, आळसणा रोड, श्याम निवास, राजेश्वर कॉलिनी, शेगाव 9284309357, निलेश वानखडे, 7304673073, पवन डिक्कर 7887978715, गणेश हिरोडकर, नांदुरा, बालाजी कॉम्प्लेक्स, नांदुरा 8788842111, कुंदनसिंग सोळंके 9657253445, नितेश तायडे 9075460919,
अमोल नागपुरे, जळगाव जामोद, सेवकदास नगर, नांदुरा रोड, पेट्रोल पंपाजवळ, जळगाव जामोद 8390280820, धनंजय वाघ 9011182575, प्रसाद वानरे 8855071312, अक्षय लधे, संग्रामपूर, दुकान क्र. 2, जय माता दी नगर, बीएसएनएल कार्यालयासमोर, संग्रामपूर 9921476303, अमोल रहाटे 7744980788, वैभव गाळकर 8806176215, गणेश वायाळ मेहकर, वार्ड क्र. 5, म्हाडा कॉलनी, मेहकर 8381050606, नंदकिशोर जोगदंडे 9309981345, स्वप्नील झोड 9529511321, प्रवीण माथुरकर 9823152903, आशिष पुरी 7028444685, अक्षय पेवकर, लोणार, तालुका कृषि अधिकारी, लोणार कार्यालयाजवळ, मेहकर रोड, लोणार 8806937058, अमोल चव्हाण 8390730020, वसीम जाफर शाह गफर शाह 9922626342, अमोल निंबोळकर 9765381292, प्रदिप मुंडे, देऊळगाव राजा, शासकीय विश्रामगृह जवळ, देऊळगाव राजा 7499983216, उमेश घुगे 8668279487, रविद्र गोरे, सिंदखेड राजा, जालना-मेहकर हायवेजवळ, सिंदखेड राजा 9545061758, तुषार डोंगरे 7774939328, योगेश मांटे 8554844912 याप्रमाणे आहे.
00000
मंगळवारी महिला लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 13 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने जून महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवार, दि. 18 जून 2024 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जून 2024 मधील तिसऱ्या सोमवारी सुट्टी असल्याने हा महिला लोकशाही दिन मंगळवारी घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.
00000
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : शासनाच्या निर्णयानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२४-२५ या सत्रापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू इतर मागास बहुजन विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नाही, अशा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे.
सदर योजनेसाठी विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी राज्याचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला, विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के गुण आणि दिव्यांगास ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी, दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडणे आवश्यक आहे, या अटी व शती लागू राहणार आहेत.
000000
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार
बुलडाणा, दि. 13 : आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवार, दि. 21 जून रोजी सकाळी ६.३० वाजता जिजामाता क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षीत, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक, युवक घडविणे, तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे, योग दिनाच्या आधारे जनतेमध्ये कायमस्वरुपी, चिरस्थायी जनहित निर्माण करणे हे उद्दीष्ट आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माध्यमिक, प्राथमिक शालेय शिक्षण विभाग, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, एएसपीएम महाविद्यालय, आयुर्वेद, नर्सिंग महाविद्यालय आणि आयुष मंत्रालय यांचे निर्देशीत मानकानुसार जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात योगदिन साजरा करण्यात येणार आहे.
सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
000000
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे
भाऊसाहेब फुंडकर समाधीस्थळी अभिवादन
खामगाव, दि. 13 : आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर आदी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment