बुलडाणा, दि. 20(जिमाका) : कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग बुलडाणा कार्यालयाकडून दि.26 सप्टेंबर 2023 रोजीचे पत्रान्वये धानोरी.क्र.(10.22 हेक्टर), कनका बु. (4.055 हेक्टर), घारोड क्र.1 20.13 हेक्टर, भुमराळा पाझर तलाव 4.21 हेक्टर हे तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी ठेक्याने देण्यासाठी नव्याने हस्तांतरित झाले असून, हे तलाव सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांसाठी मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. या तलावांच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव मागणी अर्ज 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत. शासन निर्णय अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका वाटप समितीचे मान्यतेने तलाव, जलाशय देण्याचे प्रस्तावित आहे. हे तलाव ठेका प्रक्रियेसाठी अटी-शर्तींची पुर्तता तलाव, जलाशयावर नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. तलाव ठेका नमुना-1 तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव व अर्ज,...
" सातपुडा, अजिंठा रांगांनी सजले । निसर्गसौंदर्य अलौकिक हो लाभले ।। म्हणतात याला विदर्भाचे प्रवेशद्वार । लोणार सरोवर निसर्गाचा अद्वितीय आविष्कार ।। जन्मभूमी ही स्वराज्यजननी जिजाऊंची । भूमी ही पावन इतिहासाची साक्षीदार ।। 'विदर्भाची पंढरी' शेगाव नगरीला मान । पूर्णा, पैनगंगेने लाभले सुपीकतेचे वरदान ।। बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती । बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।।" बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलडाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' देखील म्हंटल्या जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बु...
दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी बुलढाणा, (जिमाका) दि. 10: बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. बाळ दत्तक कोण घेऊ शकतो- भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. या दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नी यांची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला हि दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडु शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा- दोन वर्षाच्या आतील बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा 85 वर्ष, तर भावी एकल माता पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष, दोन ते चार वर्षापर्यंतचे बालक ...
Comments
Post a Comment