Friday, 18 November 2022

DIO BULDANA NEWS 18.11.2022

 






शालेय फुटबॉल स्पर्धेत अल्पसंख्याक शाळांचा सहभागात वाढ

-जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव

बुलडाणा, दि. 18 : कोरोनाच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमधील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अल्पसंख्याक शाळांचा सहभाग वाढला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 16 व 17 नोव्हेंबर 2022 दरम्यान जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, तालुका क्रीडा अधिकारी बी. के. घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव एन. आर. वानखेडे, फुटबॉल पंच शेख अहेमद शेख सुलेमान, फव्वाद अहमद, राहुल औशलकर, डॉ. राजपूत, डॉ. अनिस उपस्थित होते.

स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघ सहभागी झाले. उद्घाटनीय सामना सहकार विद्या मंदिर, बुलडाणा व सेंट अन्स इं‍ग्लिश स्कुल, खामगाव यांच्यात झाला. 14 वर्षाआतील अंजूमन हायस्कूल, खामगाव विरुद्ध यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर यांच्यात होऊन, अंजूमन हायस्कूल खामगाव या अल्पसंख्याक शाळेने विजय संपादन केला. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस क्रीडा प्रभारी नसिम मिर्झा, रविंद्र गणेशे, दिलीप हिवाळे, हेड कॉन्स्टेबल नरेश रेड्डी आदी उपस्थित होते.

स्पर्धेत 14 वर्षे मुलेमध्ये अंजुमन हायस्कुल, खामगाव विजयी, उपविजयी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, देऊळगाव राजा, 17 वर्षे मुलेमध्ये सहकार विद्या मंदिर, बुलडाणा विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 19 वर्षे मुलेमध्ये सहकार विद्या मंदिर, बुलडाणा  विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 14 वर्षे मुलीमध्ये प्रबोधन विद्यालय, बुलडाणा विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 17 वर्षे मुलीमध्ये राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई ता. चिखली विजयी, उपविजयी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा, 19 वर्षे मुलीमध्ये राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई ता. चिखली संघ विजयी ठरले आहे.

स्पर्धेला पंच म्हणून फव्वाद अहेमद, शेख मोहसीन शेख महेमूद, शेख वाजीद, विजय चव्हाण, जावेद, दिपशिखा हिवाळे, साक्षी हिवाळे, शकील अहमद यांनी काम पाहिले.  अनिल इंगळे यांनी सुत्रसंचालन केले. स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत यांनी पुढाकार घेतला.

00000

जात वैधता प्रमाणपत्रासाठी मोहिमेत सहभागी व्हावे

* जात पडताळणी समितीचे आवाहन

            बुलडाणा, दि. 18 : जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम 'मंडणगड पॅटर्न' करीता पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जात पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करुन घेताना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी, पालकांकडून विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर केले नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळी विद्यार्थी आणि पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणीना सामोरे जावे लागते. विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यासाठी 'मंडणगड पॅटर्न' ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

अकरावी आणि बारावीतील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत सन २०२२-२०२३ या सत्रामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे अर्ज भरावे. त्यासोबत १५-ए फॉर्मवर प्राचार्यांनी स्वाक्षरी घेऊन, बोनाफाईड प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वडील, आजोबा, पणजोबा यांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम उतारा प्रत, वडील आजोबा, पणजोबा अशिक्षित असल्यास त्याबाबतचे शपथपत्र, त्यानंतर वडील, आजोबा, पणजोबाचे रक्तनाते संबंधातील पुराव्यासह सादर करावी. तसेच जन्म, मृत्यू नोंदवही उतारा प्रत, आजोबा, पणजोबा यांची जात नमुद आहे, जसे ग्राम नोंदवही कोतवाल बुक नक्कलची प्रत, राष्ट्रीयत्व नोंदवही मानीव दिनांकापूर्वीचे जात नोंद असलेले रहिवासी पुरावे सादर करुन परिपूर्ण अर्ज महाविद्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

00000




जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 18 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा बॉक्सिंग एकविध खेळ संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने दि. 16 आणि 17 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात पडल्या.

यात दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी 14, 17, 19 वर्षाआतील मुलांच्या, तर दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी 14, 17, 19 वर्षाआतील मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून बॉक्सर मुलांचा सहभाग लाभला. दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मुलींनी सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा बॉक्सिंग एकविध खेळ संघटनेचे सचिव राज सोलंकी यांनी मुख्य पंच, तर संकेत धामंदे, सुशीलकुमार झणके, मोहम्मद सुफीयान, राहुल गिते, कुणाल जुंबळ, सुमित खंडारे, निशांत आराख, संकेत सरोदे, डॉ. तृप्ती काटेकर, तेजस्विनी पाखरे, आरती खंडागळे, प्रेरणा मधाडे, दिपाली सुरवाडे, निकिता सोनुने, जयश्री शेटे यांनी सहायक म्हणून कामकाज पाहिले.

वैद्यकीय पथकातील सामान्य रूग्णालयाच्या डॉ. साक्षी पडगीलवार, डॉ. कल्याणी आकाशे यांनी प्राथमिक वैद्यकीय उपचाराचे कर्तव्य पार पाडले. बॉक्सिंग स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा पार पडल्या.

00000

No comments:

Post a Comment