क्रिकेट
स्पर्धेने बुलडाणा तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
बुलडाणा, दि. 11 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा
क्रीडा परिषदेतर्फे बुलडाणा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे जिजामाता
क्रीडा व व्यापारी संकुल येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार रुपेश खंडारे, समाजकल्याण अधिकारी मनोज
मेरत, प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, क्रिकेट खेळाचे प्रमुख संजय देवल,
राजू ढाले, सचिन गवळी उपस्थितीत होते.
मुलांच्या 14 वर्षे वयोगटातील स्पर्धेत पहिला सामना शारदा
ज्ञानपीठ आणि सहकार विद्या मंदिर यांच्यात झाला, सहकार विद्या मंदिर विजयी, तर दुसऱ्या
सामन्यात बुलडाणा कॅब्रीज आणि सेंट जोसेफ यांच्या सामन्यात सेंट जोसेफ संघ विजयी ठरला.
एडेड हायस्कुल आणि भारत विद्यालयामध्ये सामना होऊन भारत विद्यालय विजयी झाला. तसेच
17 वर्षे वयोगटातील शारदा ज्ञानपीठ आणि बुलडाणा कॅब्रीज यामध्ये सामना होऊन शारदा ज्ञानपीठ
विजयी तर भारत विद्यालय आणि पोतदार इंटरनॅशनल यांच्यामध्ये सामना होऊन, भारत विद्यालयाचा
संघ विजयी झाला.
स्पर्धेला पंच म्हणून सचिन गवळी, सुशील वानखेडे, अमीन
शेख, चावरमल शर्मा, अभिषेक चव्हाण, रोहित जोगळेकर, तुषार खराटे, ऋषिकेश जाधव यांची
कामकाज पाहिले.
00000
राष्ट्रीय लोक आदालतीचे शनिवारी आयोजन
बुलडाणा,
दि. 11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा आणि तालुकास्तरावर शनिवार,
दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तडजोड
करुन खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस
कमी होवून एकमेकांबद्दल प्रेमाची सद्भावना निर्माण होते. याबाबीचा विचार करुन
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार
जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय
लोक अदालतीच्या माध्यमतून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी
नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क
साधावा, तसेच पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये दाखल किंवा दाखलपूर्व प्रकरणे आपसात
तडजोडीद्वारे निकाली काढावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव
हेमंत भुरे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांनी केले आहे.
०००००
बुलडाणा येथे रविवारी शासकीय योजनांचा मेळावा
बुलडाणा,
दि. 11 : राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ
आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पॅन इंडिया अंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण
आणि ‘हक्क हमारा भी तो है’ या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी, दि.
13 नोव्हेंबर 2022 रोजी समाज कल्याण कार्यालयात शासकीय सेवा योजनांच्या मेळावा आयोजित
केला आहे.
या मेळाव्यात
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड पेंशन योजना, इंदिरा गांधी
राष्ट्रीय विधवा पेंशन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग पेंशन योजना, राष्ट्रीय
कुटुंब योजना, आम आदमी विमा योजना, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशन
कार्ड, मतदान ओळखपत्र, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना,
रमाई आवास योजना, आधार कार्ड, आयुष्यमान भारत योजना, प्राधनमंत्री जीवन ज्योती
विमा योजना, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगसाठी पास सवलती, व्हील चेअर, स्टीक, बचत
प्रमाणपत्र आदी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
या मेळाव्यात
गरजू व पात्र लोकांना लाभ मिळणार असल्यामुळे तसेच प्राधिकरणाच्या वतीने ग्रामीण
भागात वितरीत केलेल्या माहिती पत्रकाच्या अनुसार मेळाव्यात शासकीय योजनांच्या लाभ
मिळण्याकरीता पात्र लाभार्थ्यांची प्रतिनिधिक स्वरुपात नोंद करण्यात येणार आहे. या
मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ह. पि. तुम्मोड,
जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष विजय
सावळे, सचिव अमर इंगळे यांनी केले आहे.
000000
थेट सरपंचपदांसह
ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान
बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींच्या
सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान
होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार
आहे.
ऑक्टोबर
2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित सर्व ग्रामपंचायतींच्या
निवडणुकांसाठी दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध
करतील. नामनिर्देशनपत्र दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 2 डिसेंबर 2022 दरम्यान दाखल
करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र
मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच
दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान दि. 18 डिसेंबर
2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 20 डिसेंबर
2022 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 23 डिसेंबर 2022 रोजी निवडणुकीच्या
निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
00000
हॉटेल,
ढाब्यावर मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई
बुलडाणा,
दि. 11 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात हॉटेल आणि ढाब्यांवर अवैधपणे
मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई केली. जिल्ह्यातील जळगाव जामोद, बुलडाणा, चिखली तालुक्यातील
हॉटेल आणि ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री
जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
खामगाव,
शेगाव, बुलडाणा, मलकापूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने बुधवार, दि. 9
नोव्हेंबर 2022 रोजी खांडवी, ता. जळगाव जामोद येथील हॉटेल रायबा ढाबा, आसलगाव, ता. जळगाव जामोद येथील हॉटेल साईराज येथे
ढाबा मालक व अवैध मद्यसेवन करणाऱ्या पाच ग्राहकांवर कारवाई केली. हॉटेल, ढाबा मालक
व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना जळगाव जामोद न्यायालयात हजर करण्यात आले.
तसेच भानखेड
येथील हॉटेल विघ्नहर्ताचे मालक आणि मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर कार्यवाही करण्यात
आली. यात हॉटेल मालकाला 40 हजार रुपये आणि मद्यसेवन करणाऱ्या चार ग्राहकांना प्रत्येकी
5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच मेहकर फाटा, ता. चिखली येथील हॉटेल श्रीयोगच्या
मालकाला 40 हजार रूपये आणि मद्यसेवन करणाऱ्या तीन ग्राहकांना प्रत्येकी 5 हजार
रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच वरवंड,
ता. बुलडाणा येथील हॉटेल गारवा ढाबा, बोराखेडी ता. मोताळा येथील हॉटेल विराट ढाबा,
पेठ, ता. चिखली येथील हॉटेल काकाजी ढाबा, नवघरे शिवार ता. चिखली येथील हॉटेल सत्यम
ढाबा, नांदुरा येथील हॉटेल न्यू मुंबई स्वाद ढाबा, लोणार येथील भाजी मंडीतील हॉटेल
भारत, मेहकर फाटा, ता. चिखली येथील हॉटेल श्रीयोग, मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेडराजा
हॉटेल सुरज धाबा, लोणार येथील हॉटेल राजधानी, मेहकर येथील हॉटेल अन्नदाता, मानेगाव
शिवार, ता. जळगाव जामोद येथील हॉटेल पुर्णामाय या ढाब्यांवर व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात
आली आहे. सदर प्रकरण न्यायालय प्रविष्ठ आहे.
दि. 1
जानेवारी 2022 ते दि. 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत एकुण 816 गुन्हे नोंदवून 756 वारस
गुन्हया्सह बीअर 372 लिटर, देशी मद्य 5082 लिटर, हातभट्टी दारु 7089 लिटर, सडवा
152462 लिटर, विदेशी मद्य 720 लिटर आणि परराज्यातील मद्य 315 लिटर जप्त करुन 791 आरोपीसह
1 कोटी 14 लाख 59 हजार 960 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
माहे ऑक्टोबर
2022 मध्ये एकूण 121 गुन्हे नोंदवून 113 वारस गुन्ह्यासह बीअर 41 लिटर, देशी मद्य
657 लिटर, हातभट्टी दारु 692 लिटर, सडवा
7089 लिटर. विदेशी मद्य 20 लिटर आणि 9 वाहने जप्त करुन 116 आरोपीसह 14 लाख 64 हजार
705 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
नागरीकांनी
मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच
मद्य खरेदी व सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य
निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फी नंबर 1800833333 वर किंवा व्हॉटस्ॲप नंबर
8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ
माहिती कळवावी.
जिल्ह्यातील
किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास
त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. मद्य बाळगताना मद्य सेवन,
मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी
दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे,
असे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment