Wednesday, 9 November 2022

DIO BULDANA NEWS 07.11.2022

 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा

बुलडाणा, दि. : कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे मंगळवार, दि. नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार अब्दुल सत्तार सकाळी दहा वाजता सिंदखेडराजा येथील राजवाड्यात राजमाता मॉ जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता चांगेफळ, ता. सिंदखेडराजा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आणि महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच सकाळी अकरा वाजता जनार्दन मोगल यांच्या निवासस्थानी भेट देतील

0000

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा दौरा

बुलडाणा, दि. : केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे मंगळवार, दि. नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार श्री. कराड दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

विविध सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री. कराड हे दुपारी दीड वाजता विदर्भ वंजारी सेवा परिषद यांच्यावतीने आयोजित वंजारी समाज मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी चार वाजता डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग महाविद्यालयात लोकसभा संवाद कार्यक्रमास उपस्थित राहतील

000000

कपाशीवरील दहिया रोगाचे नियंत्रण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : सद्यस्थितीत कापसाच्या पिकावर कमी अधिक प्रमाणात दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचे शेतकऱ्यांनी नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

दहिया रोगात पानांवर दही शिंपडल्यासारखे पांढरे ठिपके पडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने, पात्या, फुले अपरिपक्व बोंडे गळून पडतात. दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझोझायस्टोबीन 18.2 टक्के डब्ल्यू. डब्ल्यू. डायफेनोकोनाझोल 11.4 टक्के डब्ल्यू. डब्ल्यू. 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी

प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावे. या रोगाचा प्रसार बुरशीचे रेणू फळे एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी हवेद्वारे प्रसारीत होत असल्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसत असतांना फवारणीद्वारे नत्र देऊ नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी आवाहन केले आहे.

                                      00000000

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग शिष्यवृती योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे

प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या तीन शिष्यवृत्ती योजने अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल माध्यमातुन कार्यान्वीत केल्या जात आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत पीएमएफएस प्रणालीव्दारे बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे. यासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholrship.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पुर्व शिष्यवृत्ती- विद्यार्थ्यांने नोंदणी करण्यासाठी दि. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत, सदोष अर्ज पडताळणी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत, संस्था पडताळणी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत, नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी दि. 15 डिसेंबर 2022. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती- विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सदोष अर्ज पडताळणी दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत, संस्था पडताळणी दि.15 डिसेंबर 2022 पर्यंत, नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत, सदोष अर्ज पडताळणी दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत, संस्था पडताळणी दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत, नोडल अधिकारी यांची पडताळणी दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment