Wednesday, 9 November 2022

DIO BULDANA NEWS 09.11.2022

 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज दौरा

बुलडाणा, दि. 9 : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरूवार, दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्री श्री. पाटील हे गुरूवार, दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी सात वाजता श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता देऊळगाव साकर्षा येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करतील. सकाळी 10 वाजता जानेफळ येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करतील. सकाळी 11.30 वाजता डोणगाव येथे आचार्य श्री विद्यासागर महाराजांचे दर्शन घेतील. दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूसंपादन कार्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता पाणी आरक्षण आणि इतर संवैधानिक बैठकीस उपस्थित राहतील.

00000


जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी पत्रकार परिषद घेऊन दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती दिली.

00000

पंचायत समिती सभापती पदाची मंगळवारी आरक्षण सोडत

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदासाठी मंगळवार, दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र ग्रामविकास विभाग अधिसूचना दि. 4 ऑक्टोबर 2022 नुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, तसेच इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

00000

फिट इंडिया प्रश्न मंजुषामध्ये शाळा, महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा

*जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ अंतर्गत शाळास्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने फिट इंडिया प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

सहभाग नोंदविताना प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी शाळेचा युडीआयई क्रमांकासह स्वतःचा ई-मेल समावेश करावयाचा आहे. सहभागी विद्यार्थ्यांची प्रवेश फी ५० रुपये ही ऑनलाईन पद्धतीने शाळेने भरावी लागणार आहे. फिट इंडिया ही प्रश्नमंजुषा तीन स्तरावरुन राष्ट्रीयस्तर हा अंतिम ठेवण्यात आला आहे. स्तर-अ मध्ये दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रत्येक शाळेतील केवळ दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. त्यासाठी fitindia.nta.ac.in या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्तर- ब मध्ये प्राथमिक फेरीच्या बॅचमध्ये मोबाईलवर आधारीत चाचणी होईल. या चाचणीमध्ये ६० प्रश्न राहणार असून त्याचा कालावधी ३० मिनिटांचा राहिल. या पुढील स्तर- क मध्ये डिसेंबर २०२२ या महिन्यात राज्यातील विविध शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. राज्यातील गुणवंत विद्यार्थी हे अंतिम फेरीत सहभागी होतील. अंतिम फेरी ही राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामध्ये देशातील ३६ राज्यातील गुणवंताचा सहभाग राहिल. त्या प्रश्न मंजुषामधून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी निवडला जाणार आहे.

या प्रश्न मंजुषा फेरीत बक्षिसांची एकूण रक्कम ३ कोटी २५ लाख रुपये आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यास २ हजार रुपये, तर शाळेला १५ हजार रुपये, राज्यस्तरावरील दुसऱ्या उपविजेत्यास ५ हजार रुपये, तर शाळेस ५० हजार रुपये, राज्यस्तर पहिल्या उपविजेत्यास १० हजार रुपये तर शाळेला १ लाख रुपये आणि राज्यस्तर विजेत्यास २५ हजार रुपये तर शाळेस २ लाख ५० हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या विजेत्यास १ लाख रुपये, तर शाळेस १० लाख रुपये, राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या उपविजेत्यास १ लाख ५० हजार रुपये तर शाळेस १५ लाख रुपये बक्षिस देण्यात येईल. अंतिम राष्ट्रीय विजेत्यास २ लाख ५० हजार रुपये, तर शाळेस २५ लाख रुपये बक्षिस देण्यात येईल. अंतिम स्पर्धा जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा मध्ये शारिरीक हालचाली या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अंतिम फेरीचे विश्लेषण राष्ट्रीय स्तरावरुन प्रसारण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद व प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment