Tuesday, 1 November 2022

DIO BULDANA NEWS 01.11.2022

 


माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात

दोन लाख महिलांची तपासणी पूर्ण

*330 आरोग्य संस्थामध्ये आरोग्य तपासणी

*11 लाख महिलांच्या तपासणीचे लक्ष्य

बुलडाणादि. 1 : माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियानांतर्गत जिल्ह्यातील 330 आरोग्य संस्थांमध्ये 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यात 11 लाख महिलांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून आतापर्यंत सुमारे दोन लाख महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

राज्यातील माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियानांतर्गत 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या किमान 10 लाख 93 हजार 512 महिलांच्या आरोग्य तपासणीचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत 1 लाख 91 हजार 580 महिलांची आरोग्य तपासणी व उपचार पार पडले आहे. सदर मोहिमेत जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व माता, महिला, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

मोहिमेच्या कालावधीत दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत वैद्यकीय अधिकारी यांची शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महिला व मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीवजन व उंची घेऊन बीएमआय काढणेहिमोग्लोबीन, लघवी तपासणी, रक्त तपासणी, प्रत्येकस्तरावर सर्व तपासण्या, ग्रामीण रुग्णालय व पुढील संस्थेत छातीचा एक्स रे, आवश्यकतेनुसार मेमोग्राफी कर्करोग तपासणी, रक्तदाब तपासणी30 वर्षावरील महिलांची मधुमेह तपासणी, आरटीआय, एसटीआय तपासणीमाता बालकांचे लसीकरण, स्त्रीरोग तज्‍ज्ञांमार्फत तपसणी करण्यात येणार आहे.

अतिजोखमीच्या मातांची तपासणी, बालकांची तपासणी व लसीकरण गरोदर मातांची सोनोग्राफीब्लड ग्रुपतज्‍ज्ञांच्या सल्ल्यानुसार इतर तपासणी व उपचार, मानव विकास शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहे. प्रत्येक आजारी महिलांना औषधोपचार, फोलीक ॲसिड व कॅलशियम आर्यन, सुक्रोज इंजेक्शन, शस्त्रक्रीयाआवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहे.

समुपदेनात पोषणमानसिक आरोग्यस्तनपानव्यसनमुक्तीआरोग्य व पोषण समुपदेशन कार्यक्रमांतर्गत शाळा तपासणी व समुपदेशन, गर्भसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाच्या सांघिक योगदानातून जिल्ह्यातील एकूण 330 आरोग्य संस्थांमध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. महिलांनी आरोग्य संस्थांमधील माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते केले आहे.

00000

जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी 53 पैसे जाहिर

बुलडाणादि. 1 : जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी जाहिर केली आहे. त्यानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ही आता 53 पैसे झाली आहे. सन 2022-23 या खरीप हंगामातील जिल्हयातील एकूण 1 हजार 419 गावांमध्ये 483 गावांची सुधारीत पीक पैसेवारी 50 पैश्याच्या आत आणि 936 गावांची सुधारीत पीक पैसेवारी 50 पैश्याच्या वर जाहिर करण्यात आली आहे.

तालक्यातील एकुण गावे आणि तालुकानिहाय प्रसिद्ध झालेली पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे. बुलडाणा तालुका 98 गावे 59 पैसे, चिखली 144 गावे 48 पैसे, देऊळगाव राजा 64 गावे 48 पैसे, मेहकर 161 गावे 47 पैसे, लोणार 91 गावे 55 पैसे,  सिंदखेड राजा 114 गावे 48 पैसे, मलकापर 73 गावे 62 पैसे, मोताळा 120 गावे 56 पैसे, नांदुरा 112 गावे 53 पैसे, खामगाव 145 गावे 56 पैसे, शेगांव 73 गावे 54 पैसे, जळगांव जामोद 119 गावे 58 पैसे,  संग्रामपर 105 गावे 51 पैसे याप्रमाणे 1 हजार 419 गावांची सुधारित पैसेवारी 53 पैसे जाहिर करण्यात आली आहे.

00000




आरसेटीतील प्रशिक्षणार्थ्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन

बुलडाणादि. 1 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्ष घेतलेल्या प्रशिक्षनार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन पार पडले. यावेळी आरसेटीचे संचालक उत्तम कवाणेमनीषा देवस्वप्नील गवई उपस्थित होते.

या मेळाव्यत महिलांच्या वस्तूची खरेदी विक्री करण्यात आली. आरसेटी अंतर्गत महिलांना सक्षम बनवून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केल्या जाते. तसेच वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून 18 ते 45 वयोगटातील युवकयुवतींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येतो.

00000

No comments:

Post a Comment