Monday, 5 July 2021

DIO BULDANA NEWS 5.7.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 1205 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 30 पॉझिटिव्ह

  • 21 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1235 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1205 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 11 व रॅपीड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 560 तर रॅपिड टेस्टमधील 645 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1205 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :2, लोणार तालुका : भुमराळा 1, जळगांव जामोद शहर : 1, शेगांव शहर : 1, खामगांव शहर : 5, नांदुरा शहर : 1, सि. राजा शहर : 1, चिखली तालुका : बेराळा 17   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 30 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 21 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 585475 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86151 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86151 आहे.

  आज रोजी 987 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 585475 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86970 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86151 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 156 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

अनुकंपा अर्जदारांची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जांची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांना 12 जुलै 2021 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणीसाठी वेळापत्रकानुसार तपासणी करण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार संबधीत अनुकंपाधारक उमेदवार यांनी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे. वेळापत्रक व त्या संबंधीतचे पत्र जिल्हा परिषद, बुलडाणा www.zpbuldhana.gov.in या संकेतस्थळावर पाहावे व त्यानुसार सर्व संबधीत अनुकंपाधारक उमेदवारांनी वेळापत्रकानुसार न चुकता उपस्थित रहावे. याची संबधितांनी नोंद घ्यावी. याची संबंधीत यादीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कळविले आहे.

***************

 

 

 

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांचे काळजी व संरक्षणासाठी सहकार्य करावे

-          जिल्हाधिकारी

  • कृती दल आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बालकांच्या पाल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेकडून बाल कल्याण समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे. तसेच  पोलीस विभागाच्या वतीने 0 ते 18 वयोगटातील बालकांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने सहकार्य करावे व बाल कल्याण समितीला सादर करावे.  याप्रकरणी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.

   जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालकांप्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक आज 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक महेंद्र बनसोड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड आरिफ सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. रामरामे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे आदी उपस्थित होते.

   जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे समवेत चाईल्ड लाईन यांनी 1098 हेल्पलाईनची प्रचार करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत विविध कार्यालयात आयईसी साहित्य, पोस्टर्स लावावेत. या हेल्पलाईनचा प्रचार- प्रसार करावा. संबंधित विभागाच्यावतीने कोविड दरम्यानची माहिती सविस्तरपणे शहानिशा करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सादर करावी. त्याचप्रमाणे कोविड दरम्यान अनाथ झालेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या संपत्तीचे हस्तांतरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांचे वरिष्ठ सरकारी वकीलांच्या मार्गदर्शनाखाली संपत्तीचे बाबत निर्णय घेण्यात यावा.

कोविड काळातील जिल्ह्यातील बालकांची स्थिती

कोविडमुळे अनाथ झालेली बालके 10 (मुले 4 व मुली 6), एक पालक झालेले बालकांची संख्या 272 (मुले 146 व मुली 126), बाल कल्याण समिती मार्फत गृह चौकशी आदेश 223, सामाजिक गृह चौकशी करण्यात आलेल्या बालकांची संख्या 223, बाल कल्याण समितीमार्फत समक्ष सादर करण्यात आलेल्या बालकांची संख्या 49, बाल कल्याण समितीमार्फत एक पालक असलेल्या आणि ताबा घेतलेल्या बालकांची संख्या 40 व अनाथ बालकांची संख्या 9.   

********

 

No comments:

Post a Comment