Thursday, 8 July 2021

DIO BULDANA NEWS 8.7.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 3244 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 13 पॉझिटिव्ह

  • 71 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 614 तर रॅपिड टेस्टमधील 2630 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3244 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : दिवठाणा 1, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, जळगांव जामोद तालुका : वडगांव पाटण 1, आसलगांव 1, बुलडाणा शहर : 2, दे. राजा तालुका : मेंडगांव 1, चिखली शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 594090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86269 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86269 आहे.

  आज रोजी 1688 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 594090 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87051 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86269 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 118 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

 

बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी

  • कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना

बुलडाणा,(जिमाका) दि.8 : कोविड 19 मुळे उभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापसून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे या वर्षी 21 जुलै 2021 रोजी बकरी ईद अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहे, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.   

    कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यासअनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले 4.6.2021 चे ब्रेक द चेनचे नियम आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे मार्गदर्शक सुचनांच्या परिपत्रकात नमूद आहे.

*****

                    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.8 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत शनिवार,  दिनांक 10 जुलै 2021 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि 10 जुलै 2021 रोजी अमरावती येथून मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सायं 6 वाजता बुलडाणा येथे आगमन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती, सायं 6. 15 वा पत्रकार परिषदेस उपस्थिती, सायं 6.30 वा शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी, सायं 7.30 वा शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथून मलकापूरकडे प्रयाण, रात्रौ 8.30 वा शासकीय विश्रामगृह, मलकापूर येथे आगमन व राखीव, रात्रौ 10.13 वा मलकापूर रेल्वे स्थानक येथून गोंदिया-मुंबई सुपर फास्ट स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

 

 

--

No comments:

Post a Comment