पिक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी अवघा तीन दिवसांचा अवधी
- कापूस व सोयाबिनला 45 हजार रूपये विमा संरक्षण
- प्रति हेक्टरी कापसाला 2250, तर सोयाबीनला 900 रूपये हप्ता
- 15 जुलै 2021 अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी लागू करण्यात आली आहे. ही योजना खरीप हंगामातील अधिसुचीत पिकांकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेचा खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी सहभाग होण्यासाठी अवघा तीन दिवसांचा अवधी शिल्लक असून अंतिम दिनांक 15 जुलै 2021 आहे. या
योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिके अधिसुचीत करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभागासाठी इच्छूक नसल्यास तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या आत 7 दिवस आधीपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केल्या जाणार आहे.
गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षीत क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणाी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचीत पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचीत पिकाचे काढाीनंतर दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता येण्यासाठी गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्रावर अर्ज भरून योजनेत सहभागी होता येणार आहे. तरी शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलै 2021 पर्यंत सहभागी व्हावे. काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधीत पीक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबबतची सुचना क्रॉप इन्शुरन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसुल विभाग यांना कळवावे. तसेच संबंधित रिसायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या rgcl.pmfby@relianceada.com या ईमेलवर, टोल फ्री क्रं 18001024088 या क्रमांकावर कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.
योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम नाईक यांचेवतीने करण्यात येत आहे.
- असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षीत रक्कम
पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 35 हजार, हप्ता 700 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 900 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 2250 रूपये राहणार आहे.
विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी
संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीचे प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पिक विमा संदर्भात बाबींचे निरासरण तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने होणार आहे. कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी पुढीलप्रमाणे : बुलडाणा : जिल्हा समन्वयक सर्मन कोडीयातर, जिल्हा समन्वयक विशाल मांटे, समन्वयक अमित पवार, चिखली : योगेश लहाने, दे. राजा : श्रीकृष्ण ढाकणे, जळगांव जामोद : अमोल रहाटे, खामगांव : परमेश्वर खोडके, लोणार : दत्तात्रय पालवे, मलकापूर : मनोहर पाटील, मेहकर : विनोद गाडे, मोताळा : सुमीत पवार, नांदुरा : तुषार सरोदे, संग्रामपूर : प्रसाद वनारे, शेगांव : पंकज अरज, सिं. राजा : योगेश मांटे.
*******
‘एमटीपी ड्रग’ मोहिमेतंर्गत येथील औषध पेढीतून ‘गेस्टाप्रो’ औषध साठा जप्त
बुलडाणा,(जिमाका) दि.13 :जिल्ह्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या निर्देशानुसार एमटीपी ड्रग मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत एमटीपी ड्रग औषधाची जिल्हाभरात एमटीपी ड्रग औषधाची जिल्हाभरात तपासणी करण्यात येत आहे. ज्यामुळे भृणहत्या रोखण्यास मदत मिळणार आहे. या मोहिमेनुसार आतापर्यंत जिल्हाभरात 20 औषध विक्रेते व डॉक्टर्सच्या पेढ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 12 जुलै 2021 रोजी बुलडाणा शहरातील जांभरून रस्त्यावरील मे. मनिष मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स या औषध पेढीची सापळा रचून तपासणी केली. या ठिकाणी एमटीपी ड्रग अंतर्गत गेस्टाप्रो टेबलेट नामक औषध साठा आढळून आला आहे. सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर साठ्याच्या खरेदी विक्री बिला संदर्भात तपास करण्यात येत असून त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी विना प्रिस्क्रीप्शन एमटीपी ड्रग विक्री करू नये. तसेच इतर कोणीही एमटीपी ड्रग अवैधरित्या विक्री अथवा साठा करू नये. विक्री करताना आढळल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई सह आयुक्त यु. बी घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अ. तु बर्डे व औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केली आहे, असे सहायक आयुक्त श्री. बर्डे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे. ******* खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करावी
बुलडाणा,(जिमाका यामध्ये मैदानी स्पर्धा, जलतरण, स्क्वॅश, बिलीयर्डस्, बुध्दीबळ, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉनटेनिस, टेबल टेनिस, शुटींग, वेटलिफ्टींग, कुस्ती, बॉक्सींग, ज्युदो व जिम्नॅस्टीक या खेळाकरीता महिला व पुरुष हे दोन्ही खेळाडू आवेदन पत्र सादर करु शकतात. परंतु बॉडी बिल्डींग (70 कि.ग्रॅ.आतील व 70 ते 80 क्री.ग्रॅ.), व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी व क्रीकेट या खेळाकरीता फक्त पुरुष खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकतात. उपरोक्त 5 खेळाकरीता महिला खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकत नाही असे परिपत्रकात नमुद करण्यात आलेले आहे. जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या परिच्छेद 3 मधील मुद्दा क्र 3 अन्वये, भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय रार्ष्टीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. परिच्छेद 4 व परिच्छेद 5 मधील मुद्दा क्रमांक 4 अन्वये संबंधीत खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी पाहता संचालनालयाद्वारे प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जे खेळाडू भरतीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करीत आहे व जे खेळाडू भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित (S.G.F.I.) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग, प्राविण्य प्राप्त केलेले आहे व जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या खेळानुसार व वयोमर्यादेनुसार पात्र ठरणार आहेत. केवळ अशा सर्व खेळाडूंनी भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित (S.G.F.I.) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग, प्राविण्य प्राप्त केलेले आहे. अशा खेळाडूंनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र व या कार्यालयात उपलब्ध असलेला विहीत नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेतच दि.20 ऑगस्ट 2021 पुर्वी सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. ***** |
|
|
कोरोना अलर्ट : प्राप्त 2219 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 05 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.13 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2219 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 803 तर रॅपिड टेस्टमधील 1416 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2219 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : बेराळा 1, संग्रामपूर तालुका : काटेल 1, शेगाव शहर : 1, दे. राजा तालुका : चिंचखेड 1, परजिल्हा पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 05 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे सावळा ता. बुलडाणा येथील 85 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 47 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 604865 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86433 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86433 आहे. आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 604865 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87139 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86433 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 40 सक्रीय रूग्ण असून उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. |
No comments:
Post a Comment