वृद्ध साहित्यक व कलावंतांना मिळणार मानधन
• 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावे
बुलडाणा,(जिमाका) दि. 7 : शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 ला अनुसरून सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सन 2020-21 मध्ये लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सादर करावे लागणार आहे. शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 नुसार अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या मान्यवर वृद्ध कलावंत यांच्याकडून 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
यापूर्वी या योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमूद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रासह सादरकेलेले केवळ वैध आणि योग्य अर्जच स्वीकारले जाणार असल्याने यासंबंधीत नियम व अटी, शर्ती अर्जदारांनी काळजीपुर्वक वाचुनच अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांनी 25 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
****
मधुमक्षिका पालन; 100 मध पेट्यांचे वाटप
बुलडाणा,(जिमाका) दि. 7 : मधुमक्षिका पालन उद्योगासाठी मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही सदर योजनेतंर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग रामदास मगर, सौ. अनुजा प्रमोद मगर दोघे रा. दे. माळी ता. मेहकर यांना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत महाबळेश्वर येथे 20 दिवसाचे प्रगतीशील मधपाळ (केंद्रचालक) म्हणून निवासी प्रशिक्षण विनामूल्य देण्यात आले आहे.
मध उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना सदर योजनेतंर्गत 50 टक्के स्वगुंतवणूक व 50 टक्के मंडळ अनुदान या भांडवली स्वरूपात त्यांना प्रत्येकी 50 वसाहतीसह मेलीफेरा मधपेट्या, एक मधयंत्र व इतर मध उद्योग साहित्य असे एकूण 100 मधपेट्यांचे वाटप जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जिवन बोधीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मधुक्षेत्रीक एस एम हाडोळे, तांत्रिक कर्मचारी आर. एम बिलबिले, औद्योगिक पर्यवेक्षक सचिन इढोळे व गावातील शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी श्री. हाडोळे यांनी मधमाशीपालन विषयी माहिती दिली, तर श्री. किलबिले यांनी शेतकऱ्यांना शेतीपिके, फळपिके यामध्ये 15 ते 40 टक्के पर्यंत परागीभवन होवून वाढ होवून मधमाशा पालन हा शेतीपूरक जोडधंदा असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जिवन बोथीकर यांनी जास्तीत जास्त शेतकरी व लाभार्थी यांनी या व्यवसायाकडे वळून लाभ घेण्याचे आवाहन केले.
******
मध केंद्र योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज आमंत्रित
- 28 जुलै 2021 पर्यंत मुदत
बुलडाणा,(जिमाका) दि. 7 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना 10 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार हा साक्षर असावा, तसेच त्याच्याकडे स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षपेक्षा जास्त असावे, प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक मंडळाकडे करावी लागेल. प्रगतशील मधपाळांसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणारआहे. तसेच 50 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावा व वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किंवा कुटूंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व प्रजनन, मधोत्पादन याबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे केंद्र चालक संस्थेसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संस्था ही नोंदणीकृत असावी, संस्थेचे नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेली किमान एक एकर शेती किंवा 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मधोत्पादनाकरीता लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक ही योजनेची वैशिष्टये आहेत. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध उद्योग व्यवसाय सुरू करणे बाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, शेतीचा 7/12 व नमुना 8 – अ, दोन छायाचित्रे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2021 आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अरूणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर, बुलडाणा या कार्यालयाशी तसेच 07262-22428667, 8329908470 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 2800 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह
- 34 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2800 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपीड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 508 तर रॅपिड टेस्टमधील 2292 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2800 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर :3, शेगांव तालुका : गौलखेड 1, शिरसगांव 1, टाकळी विरो 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1,घाटपुरी 2, नांदुरा शहर : 6, नांदुरा तालुका : माटोडा 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : ढालसावंगी 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 1, दे. राजा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : पळसखेड 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, विझोरा 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : कवठळ 1, शेलूद 2, बेराळा 1, नायगांव खु 4, मालखेड 1, मालगणी 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 34 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 590846 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86198 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86198 आहे.
आज रोजी 1330 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 590846 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87038 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86198 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 176 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवसाचे 10 जुलै रोजी आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.7 : केंद्र शासनाने 10 जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस म्हणून घोषीत केला आहे. त्यानुसार 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कोविड 19 नियमांचे पालन करून मच्छिमार बांधवांच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची सामाजिक बांधीलकी लक्षात घेता, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यशेतकरी, मत्स्यकास्तकार यांचे आशा, अपेक्षा व त्यासाठीची शासनाची बांधीालकी व शासनाचे मत्स्यव्यवसायाबाबतचे धोरण मच्छिमार बांधवापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून या दिवसाचे अयोजन करण्यात येत आहे, असे सहायक आयुक्त स. इ नायकवडी यांनी कळविले आहे.
******* |
|
|
No comments:
Post a Comment