|
|
लिंग विनिश्चीत केलेल्य वीर्य मात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींच्या कृत्रिम रेतनात वापर होणार
- राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना, वीर्य मात्रा वाटप करण्यास मान्यता प्रदान
- शेतकरी, पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्याकरीता केंद्र शासनाने केंद्र सहाय्यित योजना (60:40) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चीत केलेल्या वीर्य मात्रांचा (Sex Sorted Semen) क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमाअंतर्गत
वापर करणे साठी प्रशासकिय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणानुसार राज्यातील गाई- म्हशींमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार विर्य मात्रा देण्यात येणार आहे. सन 2021-22 पासुन पुढील पाच वर्षाच्या कालावधी करीता 575 रूपये प्रति लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्रा या प्रमाणे एकुण 11000 लक्ष लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राची (Sex Sorted Semen) वाटप करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे.
तरी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी अथवा पशुपालकांनी आपल्या गाई- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करण्याकरीता लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राचा वापर करावा. त्या करीता 81 रूपये कृत्रिम रेतनापेटी दर आकारणी केलेली आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.
*********
गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम
- कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : सन 2021-22बुलडाणा जिल्हयात राज्यातील गायी म्हशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2015 च्या सेवा हमी कायदयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहे. तरी सन 2021-22 या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवुन आपल्या दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैदयकिय संस्थेस पुरविण्यात आलेल्या विहित नमुण्यात भरुन त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास त्वरीत सादर करावे.
नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैदयकीय दवाखन्या मार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केल्या जाते. कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासराना 25000 रुपये अनुदान देण्यात येते. तरी या योजने मध्ये समाविष्ठ होण्यासाठी अर्ज पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यलयास दिनांक 31 जुलै 2021 पर्यंत देण्यात यावे.
तरी जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. ही योजना पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी " गाय वाचवा व वंशावळ वाढवा व स्वस्थ पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान "असे बोधवाक्य नेमले आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment