मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थांची माहिती सादर करण्याचे आवाहन


 

वृत्त क्रमांक : 922                                                     दिनांक : 16.12.2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थांची माहिती सादर करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 16(जिमाका) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत विविध आस्थापनेवर प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली आहेत. नियुक्ती झालेल्या प्रशिक्षनार्थींना आस्थापनेवर यापुर्वी रुजू झालेले परंतु संकेतस्थळावर नावे ॲड करताना तांत्रिक अडचणी येत आहे. अशा आस्थापनांनी प्रशिक्षनार्थीचे  माहिती दि.17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.

 

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार विविध आस्थापनेवर यापुर्वी रुजू झालेले परंतु cmykpy.mahaswayam.gov.in संकेतस्थळावरती नाव ॲड न होवू शकलेले उमेदवारांना ॲड करुन देण्याबाबत शेवटची संधी म्हणून या कार्यालयाच्या लॉगीन मध्ये टॅब उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आपल्या आस्थापनांमध्ये योजनेअंतर्गत नियुमानुसार नियुक्त केलेले प्रशिक्षणार्थी यांची माहिती आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात यावी.

 

आवश्यक कागदपत्रे : संबंधित आस्थापनेचे पत्र, CMYKPY संकेतस्थळावर ॲड न  केलेल्या प्रशिक्षणार्थी यांच्या नावाची संपुर्ण माहितीसह यादी(रुजू दिनांक,आधार नंबर, आधार लिंक बँक डिटेल्स,बँक पासबुक/ कॅन्सल चेक,ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक). महास्वयंम संकेतस्थळावरती प्रसिध्द केलेल्या जाहिरातीचा स्किनशॉट. प्रशिक्षणार्थींचे नियुक्ती आदेश, प्रशिक्षणार्थी यांचे स्वयंघोषणापत्र तसेच रुजू आदेश, प्रशिक्षणार्थी उच्चत्तम शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र(उदा.बारावी/पदविका/आयटीआय/पदवी/पदव्युत्तर पदवी) आणि स्वयंसाक्षांकित केलेले आधर कार्ड. प्रशिक्षणार्थी यांच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा(उदा. नवात बदल बातचे राजपत्र/विवाह नोंदणी प्रमाणपत्र), प्रशिक्षणार्थी यांचे आधार लिंक बँक डिटेल्स.

 

ऑनलाईन पद्धतीने उमेदवार रुजू करुन घेण्यासाठी आवश्यक  परिपुर्ण कागदपत्रे व माहिती विहित मुदतीत या कार्यालयास सादर करावी. जेणेकरुन ऑनलाईन ॲड व विद्यावेतन करण्याची कार्यवाही विहीत मुदतीस पुर्ण करणे शक्य होईल. विहित मुदतीत माहिती या कार्यालयास प्राप्त न झाल्यास व त्यामुळे  प्रशिक्षणार्थी ऑनलाईन रुजू/ॲड करुन घेण्याच्या प्रक्रियेपासून वंचित राहिल्यास प्रशिक्षक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबत जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी.

000000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या