‍शिक्षक पात्रता परीक्षेचे आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

 

वृत्त क्रमांक : 909                                             दिनांक : 12.12.2024

 

‍शिक्षक पात्रता परीक्षेचे आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि.12 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.1 पेपर क्र.2 ची तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र.1 व पेपर क्र.2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी व आक्षेप असल्यास ते परिषदेच्या http://mahatet.in संकेतस्थळावर दि. 16 डिसेंबर अखेरपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या आक्षेप व त्रुटीबाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकव्दारे परिषदेकडे पाठवता येतील.

 

आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने किंवा ईमेलव्दारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथवकाश प्रसिध्द करण्यात येईल. याची उमदेवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्ष परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या