बुलढाणा येथे उद्या “सहाकर से समृध्दी” कार्यक्रम

 

बुलढाणा येथे उद्या सहाकर से समृध्दी कार्यक्रम

बुलढाणा, दि. 24(जिमाका) : केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून सहकार से समृध्दी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे व्ही.सी. व्दारे दि. 25 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता दि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँक बुलडाणा सभागृहामध्ये प्रक्षेपीत करणत येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानसाहेब चव्हाण यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सहाकर से समृध्दी अंतर्गत बहुउद्देशीय प्राथमिक सहाकरी संस्था, दूग्ध व्यवसाय व मत्सपालन सहकारी संस्थंच्या स्थपनेव्दारे ग्रामपंचायत व गावांना समाविष्ट करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत स्थापन झालेल्या 10 हजार प्राथमिक सहाकरी संस्थापैकी 6 हजार संस्था दूध व्यवसायाशी निगडीत आहेत. महत्वपूर्व उपलब्धी साजरी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून 25 डिसेंबर रोजी न्यु दिल्ली येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे व्हीसी व्दारे दुपारी 1.30 वाजता दि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृहामध्ये प्रक्षेपीत केल्या जाणार आहे. या कार्यक्रमाध्ये बुलढाणा जिल्हयातील केंद्रीय योजनेतंर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या सेवा सहाकरी संस्थाचे (जन औषधी केंद्र/सीएससी. सेंटर/गोदाम बांधकाम) असे विविध उपक्रम राबविलेल्या संस्थांच्या कामकाजाची माहिती फोटो व व्हिडीओव्दारे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा सहाकर समिती (dcdc) जिल्हा सहकार समितीअंतर्गत संयुक्त कार्यकारी समिती (jwc) चे सदस्य  प्राथमिक पत पुरवठा सहाकरी संस्था व मत्स सहकारी  संस्थांचे पदाधिकारी संचालक मंडळ, संघाचे प्रतिनिधी, सचिव यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

00000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या