माजी सैनिकांनी विविध क्षेत्रामध्ये प्राविण्यप्राप्त केले असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.

 

माजी सैनिकांनी विविध क्षेत्रामध्ये प्राविण्यप्राप्त केले असल्यास

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.

 

        बुलढाणा, दि. 24(जिमाका) : जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते कि ज्या माजी सैनिकांनी वर्ष 2024 मध्ये खेळामध्ये, संभाषनामध्ये,वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये, किंवा एखादया तंत्रज्ञानामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्यप्राप्त केले असेल किंवा ऊत्कृष्ट कामगिरी केलेली असेल अशा सर्व माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडे  खालील दिलेल्या नमुण्याप्रमाणे  रकान्यामध्ये आपली माहिती भरुन दिनांक 2 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावी,असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

आपले नाव व पत्ता , ऊत्कृष्ट कामगिरी केलेले क्षेत्र, आपल्या उपलब्धीचे वर्णन 100 शब्दामध्ये, फोन नंबर, स्वता:चा फोटो, व शेरा. या रकान्यामध्ये  आपली माहिती भरुन दि. 02 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावी.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या