एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात; 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार परीक्षा

 


 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात; 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार परीक्षा

 बुलढाणा, दि. 18 (जिमाका) : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा ही दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इच्छूकांनी आपले अर्ज दि. 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या परिक्षेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यक्षेत्रातील अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. या सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेवून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय किंवा अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला जोडण्यात यावा.

 

परिक्षेचे ठिकाण व वेळ : प्रवेश परीक्षा दि.23 फेब्रुवारी, 2025 रोजी होणार असून इयत्ता 6 वी करिता सकाळी 11 ते 1.00 या वेळेत व इयत्ता 7 वी ते 9 वी करिता सकाळी 11 ते 2.00 या वेळेत होईल. ह्या परीक्षा शासकीय आश्रम शाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी जि. अकोला व शासकीय आश्रम शाळा, घाटबोरी ता. मेहकर जि. बुलडाणा या ठिकाणी होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या