स्थानिक निधी लेखापरिक्षा कार्यालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

 


 स्थानिक निधी लेखापरिक्षा कार्यालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर  

 

बुलडाणा, दि‍.06 :- स्वस्थ भारत अभियानांतर्गत आरसीएम न्युट्रीचार्ज मार्फत दि. 2 नोव्हेंबर रोजी स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय बुलडाणा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी व आहाराविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांचे  आरोग्य तपासणी शिबीर घेवुन मार्गदर्शन करण्यात आले.  

 

 

सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा कार्यालयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वास्थ रक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. न्युट्रीशनल कांऊसलर अरुण खंदारे व नारायण चौधरी यांनी आरोग्याच्या समस्या व आहारात कोणते बदल करणे अपेक्षित आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून सर्व शंकाचे योग्य प्रकारे निरसन केले. चर्चेमध्ये कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदवाला. शिबीरासाठी श्रीकांत डहाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.  

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या