जिल्हास्तरीय रेड क्रॉस समिती गठीत करण्यासाठी शुक्रवारी बैठक; सामाजिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहणाचे आवाहन

 

जिल्हास्तरीय रेड क्रॉस समिती गठीत करण्यासाठी शुक्रवारी बैठक;

सामाजिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहणाचे आवाहन

 

बुलढाणा दि. 8 (जिमाका):- इंडियन रेड क्रॉस सोसायटीची जिल्हास्तरीय शाखा गठीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

            इंडियन रेड क्रॉस सोसायटी कायदा 1920 अंतर्गत रेड क्रॉस सोसायटी संपूर्ण भारतात कार्यरत आहे. ही सोसायटी  राज्य व जिल्हास्तरीय शाखेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामातुन आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत असतात. राज्यपाल यांच्या सुचनेनुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येत आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे  सेवा करणाऱ्या नागरिकांची समिती गठीत करायची आहे. त्यानुसार इच्छुक नागरिकांनी आपल्या ओळखपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांमधुन जिल्हा कार्यकारणीची प्राथमिक स्वरुपाची निवड करण्यात येईल. त्यानंतर जिल्हा स्तरीय संघटना गठीत करण्यात येईल. समितीमध्ये निवड झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्यत्व स्विकारता येईल. अधिक माहितीसाठी  डॉ. प्राची तायडे(7798141367), डॉ. विनोद जवरे(9422325650) रविंद्र लहाने(9422884421) यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा. 

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या