दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे पुणे येथून जादा फेऱ्या

 

दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे पुणे येथून जादा फेऱ्या

 

बुलढाणा दि. 8 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग बुलडाणा यांचेकडून  पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी पुणे येथून बुलडाणा विभागामध्ये प्रवाशांना दिवाळी उत्सवात जाणे-येणे करीता जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. दि. 11 नोव्हेबरपर्यंत पुणे येथून सुटणाऱ्या जादा फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीमव्दारे PUNECNT या कोडव्दारे करता येणार आहे. ऑनलाईन रिझर्वेशनकरीता प्रवाशांनी www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर किंवा एमएसआरटीस मोबाईल रिझर्वेशन ॲपव्दारे बुकींग करावी.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या