लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; शेतजमीन मालकी असणाऱ्या मातंग समाजातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;

शेतजमीन मालकी असणाऱ्या मातंग समाजातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले

 

बुलडाणा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लोकांच्या नावे शेतजमीन आहे, त्यांच्याकडून दि. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. जमीन मालकी असणाऱ्या लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे शेतीचा सातबारा, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो दोन कागदपत्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या