मतदार यादी निरीक्षक म्हणून डॉ. निधी पांडे यांचा जिल्हा दौरा

 

बुलडाणा, दि. २५ (जिमाका): दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यास तीन भेटी देणार असून, गुरुवार (दि.३०) रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौ-यावर येत प्रथम भेट देणार आहेत.

 

या भेटीच्या अनुषंगाने दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवार (दि.३०) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये राजकीय पक्षांसोबत बैठक घेतील.

 मतदार यादी निरीक्षक डॉ. पांडे बुलढाणा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांनाही भेटी देणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या