कोरोना अलर्ट : प्राप्त 299 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 05 पॉझिटिव्ह
- 3 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 304 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 299 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 05 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 101 तर रॅपिड टेस्टमधील 198 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 299 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा शहर : 1, बुलडाणा तालुका : पांगरी 1, बुलडाणा शहर : सुदंरखेड 1, मलकापूर तालुका : धरणगांव 1, परजिल्हा : औरंगाबाद 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 05 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 802170 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98238 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98238 आहे. आज रोजी 96 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 802170 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98970 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98238 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
प्रलंबित बदल अर्जांच्या निपटाऱ्यासाठी 25 मार्चपर्यंत विशेष मोहिम
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलडाणा येथे अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 14 ते 25 मार्च 2022 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यापूर्वीही अशा प्रकारची मोहिम राबविण्यात आली आहे. विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच विश्वस्तांनी आपले प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त प्र. नि आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आयटीआय येथील भंगार साहित्य खरेदीसाठी निवीदा आमंत्रित
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालयातील, कार्यशाळेत प्रात्याक्षिकामधून निर्माण झालेला स्क्रॅप तसेच प्रात्याक्षिक करीत असताना तुटलेली हत्यारे व अवजारे यांची विक्री भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या खरेदीदाराकडून करावयाची आहे. त्यासाठी निवीदा आमंत्रित करण्यात आल्या आहे. विक्री करावयाच्या भंगार साहित्य तसेच तुटलेले हत्यारे, अवजारांची यादी, निविदा अर्ज संस्थेच्या भांडार विभागात भांडारपालाकडे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. निविदेची किंमत 100 रूपये असून खरेदीदारास 17 मार्च 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपावेतो उपलब्ध आहे. वस्तूची संख्या कमी – अधिक अथवा निवीदा रद्द करण्याचा अधिकार प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांनी राखून ठेवलेला आहे, असे प्राचार्य पी. के खुळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
एसटी च्या विभागीय नियंत्रक कार्यालयात महिला दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी 11 वाजता विभाग नियंत्रक कार्यालय येथे महिलांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच याप्रसंगी अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांपैकी काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, असे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
बांधकाम कामगारांना डिबीटीद्वारे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ
- बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी
- कामगाराची कुणी फसवणूक केल्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी
बुलडाणा,(जिमाका) दि. 9: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने ऑनलाईन खात्यात जमा करण्यात येतो.
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी स्वत:ची नोंदणी करण्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह त्यामध्ये छायाचित्रासह ओळखीचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, स्वयं घोषणापत्र, 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे बँकेचे पासबुकची छायांकित प्रत, आधार संमती पत्र आदींचा समावेश असावा. तसेच नुतनीकरणकरीता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा. याकरिता नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 1 रूपया प्रती माह प्रमाणे 12 रूपये एक वर्षाचे भरून पावती घ्यावी. या व्यरितिरिक्त कोणतेही शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांकरीतासुद्धा बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
लाभाचे अर्ज तपासणी नंतर लाभाची रक्कम बांधकाम कामागारांच्या खात्यात परस्पर डीबीटी पद्धतीने मंडळ स्तरावरून वर्ग करण्यात येते. त्रयस्थ व्यक्तीच्या मोहाला बळी पडू नये. कोणत्याही कामगाराची जर फसवणूक होत असेल, तर त्यांनी संबंधीतांविरूद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment