छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांचा दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. २७ : छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेष बघेल दिनांक २८ मार्च २०२२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता रायपूर येथून विमानाने अकोलाकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व मोटारीने शेगाव कडे प्रयाण, दुपारी १२.३० वाजता शेगाव येथे आगमन संत गजानन महाराज मंदिर दर्शन, दुपारी १ वाजता ओबिसी समाज अधिकार संमेलनास उपस्थिती, दुपारी २.३० वाजता शेगाव येथून मोटारीने अकोला कडे प्रयाण, दुपारी ३ वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व विमानाने स्वामी विवेकानंद विमानतळ रायपूर (छत्तीसगड) येथे आगमन करतील.
*****
महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांचा दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. २७ : राज्याचे महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ५.१० वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व बुलडाणा कडे प्रयाण, सकाळी ६.१५ वाजता रेसिडेन्सी क्लब, बुलडाणा येथे आगमन व राखीव, सकाळी ८ वाजता बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत चर्चा, सकाळी ८.३० वाजता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवास स्थानी कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, बुलडाणा मंडळास भेट, सकाळी ८.४५ वाजता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवास स्थानी मोताळा नगर पंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्य यांच्या समवेत भेट आणि चर्चा, सकाळी ९.३० वाजता बुलडाणा येथून पळसखेडकडे प्रयाण, सकाळी १०.१५ वाजता पळसखेड सपकाळ येथे नंदकुमार पालवे व आरती पालवे यांच्या सेवा संकल्प संस्थेला भेट, सकाळी १०.४५ वाजता पळसखेड सपकाळ येथून शेगावकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता शेगाव येथे आगमन व स्व. गजाननदादा पाटील मार्केट वॉर्ड मध्ये आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनास उपस्थिती, सोयीनुसार शासकीय वाहनाने अमरावती कडे प्रयाण करतील.
******
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे २८ मार्च रोजी आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. २७ : कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता महाविद्यालय क्रीडांगण, मोठी देवी मंदिराच्या मागे, बुलडाणा या ठिकाणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी हा उद्देश या प्रदर्शनीचा असून या महोत्सवात शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, विज्ञान, योजना, मार्केटिंग इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच धान्य महोत्सवात आपण विविध प्रकारचे धान्य थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकणार आहात. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य याचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांसाठी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली असणार आहे. आपण सर्वांनी प्रदर्शनीस अवश्य भेट देऊन शेतकऱ्यांकडील उत्पादीत सेंद्रीय माल खरेदी करावा. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment