Tuesday, 15 March 2022

DIO BULDANA NEWS 15.3.2022

  


कलापथक कार्यक्रमांमधून शासकीय योजनांचा प्रचार...!

    बुलडाणा, (जिमाका) दि. 15 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रचार – प्रसारासाठी विविध प्रसिद्धी विषयक बाबींचा उपयोग करण्यात येतो. यावेळी मात्र नागरिकांमध्ये जात.. त्यांच्याच भाषेत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम व निर्णयांची माहिती कलापथक कार्यक्रमांमधून देण्यात येत आहे. त्यासाठी तीन संस्थांच्या माध्यमांतून प्रत्येक तालुक्यात कलापथक कार्यक्रमातून शासकीय योजनांचा प्रचार – प्रसार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात दाताळा, माकनेर, घिर्णी, उमाळी व वाघुड गावांमध्ये कलापथक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तर खामगांव तालुक्यात शिर्ला नेमाने, विहीगांव, अटाळी, आवार व आंबेटाकळी गावांत शासकीय योजनांची माहिती कलापथक कार्यक्रमातून पोहोचविण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील म्हसला बु, दुधा, जांब, धाड व चिखला गावांत हा शासकीय योजनांचा जागर पार पडला. अशाप्रकारे जिल्ह्यात  63 ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.

कलापथक कार्यकमासोबतच लोकनाट्य, पथनाट्य व वासूदेव  या पारंपारिक कलावंतांच्या भूमिकेतून ग्रामस्थांना मनोरंजक  पद्धतीने योजनांची माहिती करून देण्यात आली.  या कार्यक्रमांना प्रत्येक गावांमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिससादही मिळत आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती मिळत आहे. कलापथक संस्थांचे कलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन पद्धतीने  दिली. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, रमाई आवास योजना, कोविडने मृत्यूमुख्यी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपयांची आर्थिक मदत, पेयजल योजना, शिवभोजन थाळी योजना, महिला सशक्तीकरण आदी योजनांचा समावेश आहे.

  सिं. राजा तालुक्यातील दुसरबीड, राहेरी, पळसखेड चक्का व किनगांव राजा गावांत कार्यक्रमांना नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. कलापथक कार्यक्रमांमधून शासनाच्या विविध योजनांची माहिती आमच्या भाषेत मिळाली असल्याची बोलकी प्रतिक्रीया उपस्थित नागरिकांनी दिली आहे.

******

शालांत परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना

सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत अहवाल सादर करावा  

            बुलडाणा, (जिमाका) दि. 15  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.  त्यानुसार एकविध खेळाच्या राज्य संघटनेने क्रीडा व युवकसेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना सादर करावयाच्या स्पर्धा विषयक कागदपत्रांची यादी नमुद केली आहे.  त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धांचे रेकॉर्ड क्रीडा व युवक सेवा संचालनायाबरोबरच जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांना सादर करणे आवश्यक आहे.

            तथापी बऱ्याच एकविध खेळ राज्य संघटनाद्वारा संबंधीत स्पर्धांचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केले जात असल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या संबंधित खेळातील खेळाडूंचे क्रीडागुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव पडताळणी करुन पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची शिफारस करणे शक्य होत नाही.  त्यामुळे बऱ्याच वेळा क्रीडागुण सवलतीस पात्र असुनही अनेक खेळाडू विद्यार्थी क्रीडागुण सवलतीपासुन वंचित राहू नये याकरीता संबंधीत संघटनेद्वारा खालील बाबींची पुर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेकडे करणे आवश्यक आहे.

   आयोजित संबंधीत क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनाचे परिपत्रक, आयोजित संबंधीत क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या भाग्यपत्रीका (Copy of Draw), आयोजित संबंधीत क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे अंतिम निकालपत्र, आयोजित संबंधीत क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या नावाच्या प्राविण्यासहीत परिशिष्ट-10 मधील नमुन्यातील याद्यांच्या २ प्रति.  सदर कागदपत्रांवर राज्य संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांच्या शाईची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक आहे.

   एकविध खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या शाईच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र, संबंधीत एकविध खेळ जिल्हा संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा संघटना राज्य संघटनेशी संलग्नतेबाबतचे पत्र, जिल्हास्तर एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित संबंधीत स्पर्धेचा अहवाल सादर करावयाचा आहे. या बाबींचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दि.25 मार्च 2022 पुर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                                                                                ********

जिल्ह्यात 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह

· 20 मार्च रोजी जल दौडचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 15  जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2022 दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्साहाने भाग घेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन अधिक्षक अभियंता सु. व चौधरी यांनी केले आहे.

    सप्ताहाचे उद्घाटन दि. 16 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी काया्रलय बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. सप्ताहात 20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता जल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून साधारणपणे 2 ते 3 कि.मी लांब दौड घेण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन, पाण्याचे महत्व, काटकसर व जनमानसात याबद्दल जागृती निर्माण करून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा प्रामुख्याने उद्देश असल्याने सामान्य जनतेने वाटर रन स्पर्धा व इतर सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अधिक्षक अभियंता सु. व चौधरी यांनी केले आहे.

******

ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू

-          रूपेश खंडारे

  • जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 15  प्रत्येक बाजारपेठेला ग्राहकांच्या इच्छा आकांक्षांची पार्श्वभूमी असते. त्या परिसरातील ग्राहकांची मानसिकता, खर्चाची क्षमता, वर्गवारी या बाबींवर बाजारपेठे बऱ्याच अंशी अवंलबून असते. त्यामुळे ग्राहक कसाही असो, तो बाजारपेठेचा केंद्रबिंदू असतो, असे प्रतीपादन प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश खंडारे यांनी केले.  जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन आज तहसिल कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहा जिल्हा पुरवठा अधिकारी  विनोद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वाघ, जिल्हा ग्राहक न्याय मंचचे अध्यक्ष ॲड ढवळे, अन्न निरीक्षक श्री. वसावे, सहा. नियंत्रक वैद्यमापनशास्त्र नितीन कांबळे, प्राचार्य दिलीप सानप, ॲड सावजी आदी उपस्थित होते.

     भेसळीपासून ग्राहकांनी स्वत: चे संरक्षण करण्याचे आवाहन करीत श्री. खंडारे म्हणाले, भेसळीसारखा प्रकार हा आरोग्याशी खेळणारा आहे. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून भेसळ ओळखावी. तसेच ग्राहकांनी त्यांना  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 व 2009 मधील कायद्याने मिळालेले हक्क वापरावे. यावेळी त्यांनी दोन्ही कायद्यांमधील फरक समजावनू सांगितला.  याप्रसंगी नगीनदास बैरागी, माणिकराव सावळे, ॲड सावजी, जिल्हा ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष ॲड ढवळे, ॲड रत्नमाला गवई यांनी यावेळी ग्राहक हिताबाबत विचार व्यक्त केले. प्रासताविक सहा. पुरवठा अधिकारी विनोद पाटील यांनी केले.  कार्यक्रमाला सुनील बर्डे, श्री. अंधारे, माणिकराव सावळे, नायब तहसिलदार श्री. पवार आदींची उपस्थिती होती. संचलन ॲड गायत्री सावजी यांनी तर आभार प्रदर्शन देवानंद चाळगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत खैरनार, गजानन कोळेकर, समाधान जाधव, भिमराव जुमडे आदींनी प्रयत्न केले.

                                                                                **********


No comments:

Post a Comment