तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : शासन निर्णय 16 जानेवारी 1958 व 6 ऑगस्ट 1958 नुसार विहीत करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याकरीता सन 2022 साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) गुरूवार 11 ऑगस्ट 2022, पोळा शुक्रवार 26 ऑगस्ट 2022 व लक्ष्मीपुजनचा दुसरा दिवस मंगळवार, 25 ऑक्टोंबर 2022 रोजी असलेल्या सुट्टयांचा समावेश आहे. स्थानिक सुट्टी ही संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याकरीता लागू असणार आहे. मात्र दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागाने कळविले आहे.
******
पोस्ट ऑफीसेस 100 टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : या 2022 वर्षामध्ये देशातील सर्व 1.5 लाख पोस्ट ऑफीसेस 100 टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार आहे. त्यामुळे आर्थिक समावेश साध्या होऊ शकणार आहे. तसेच नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएमद्वारे खात्यांमध्ये व्यवहार करणे शक्य होणार आहे. पोस्ट ऑफीस खाती आणि बँक खाती यांच्यामध्ये निधीचे ऑनलाईन हस्तांतरण देखील शक्य होईल. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटर-ऑपरेबिलीटी आणि आर्थिक समावेशन सुविधा उपलब्ध होणार आहे, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अंतिम ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार उपलब्ध पदांनुसार व त्या त्या पदाची सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषद बुलडाणाचे संकेतस्थळ www.zpbuldhana. maharahtra.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सदर निवडीबाबत ज्येष्ठता यादीतील उमेदवारांचे काही आक्षेप, हरकती असल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद कार्यालयास 17 मार्च 2022 पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावे. सदर निवड यादी तात्पुरती असून प्राप्त होणाऱ्या हरकती, आक्षेपांची पडताळणी नंतरच अनुकंपाधारक उमेदवारांची निवड यादी अंतिम करण्यात येईल. याबाबत सर्व अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण मिळणार
· 1000 रूपये दरमहा विद्यावेतन
· 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : राज्य शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि. अमरावती येथे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा 1000 रूपये विद्यावेतनही देण्यात येते. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.
या प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक असून त्याचे वय 1 एप्रिल 2022 रोजी किमान 18 वर्ष पुर्ण परंतु 15 जुलै 2022 रोजी त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेले नसावे. तसेच त्याने किमान एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तो सद्या कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. तरी सदर पात्रतेच्या इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रासाठी 28 मार्च 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे लालपूल जवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती येथे अर्ज सादर करावे.
अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे http://rojgar.mahaswayam.in संकेतस्थळावरील ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड आदी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करू नये. इच्छूक उमेदवार https://bit.ly/35Jh49r या लिंकवर सुद्धा अर्ज करू शकतात. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अचलपूर, जि. अमरावती यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त “जागर करीअरचा” मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : स्वातंत्रयाचा अमृत महोत्सवनिमित्त देशभरात व राज्यात प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनूषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्या संयूक्त विद्यमाने आयोजित “जागर करीअरचा” कार्यक्रमात महास्वयंम वेबपोर्टलवरील सुविधा व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यपध्दती या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा 16 मार्च रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथे मोठया उत्साहात पार पडली.
जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थी यांचेकरीता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जिल्हयातील युवक व युवती मोठया प्रमाणात उपस्थित होते. जागर करीअरचा या मार्गदर्शन कार्यक्रमात कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम या वेबपोर्टलवरील उपलब्ध सुविधा आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विभागाच्या महास्वयंम या वेबपोर्टलवरील उपलब्ध सुविधा या विषयावर जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सदर पोर्टलवर सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती विनामुल्य नोंदणी करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवार त्यांचे लॉगीनमधून महास्वंयम पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदांकरीता अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे सदर पोर्टलवर नियोक्ता त्यांचे आस्थापनेची विनामुल्य नोंदणी करू शकतात. नियोक्ता त्यांचे लॉगीनचा उपयोग करून त्यांचे Vancancy Notify करू शकतात याबाबत सांगीतले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर येथील प्राचार्य एस.के.जाधव यांनी उपस्थित उमेदवार युवक व युवती यांना करीअर विषयक मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयातील नंदू मेहेत्रे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक व इतर सर्व कर्मचारी तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथील श्री.भोजने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment