Wednesday, 2 March 2022

DIO BULDANA NEWS 2.3.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 127 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 04 पॉझिटिव्ह

  • 9 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 131 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 127 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 04 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 04 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 99 तर रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 127 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  लोणार शहर : 2, लोणार तालुका : देऊळगांव कुंडपाळ 1, परजिल्हा :  लोणवडी ता. बोदवड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 04 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 9 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 800234 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98186 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98186 आहे.  आज रोजी 490 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 800234 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98930 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98186 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 56 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन विषयक पाच दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) मुंबई ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  पाच दिवसीय निवासी शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन विषयक तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, कृषी विज्ञान केंद्राचे  विषयतज्ञ मनीष यदुलवार, डॉ. भारती तिजारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 28 फेब्रुवारी रोजी पार पडले.

    प्रशिक्षण कार्यक्रमास बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 60 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.  प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी नरेंद्र नाईक यांनी संरक्षित वातावरणातील शेती बद्दलचे महत्त्व सांगून ही बदलत्या काळाची गरज असल्याचे सांगितले.  शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करताना त्यामधील तांत्रिक ज्ञान घेऊन यामध्ये करायच्या भाजीपाला व फुल शेती येथील सखोल ज्ञान घेऊन हायटेक शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.  संतोष डाबरे यांनी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संरक्षित शेती मधील योगदान याविषयी मार्गदर्शन करून भविष्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे सांगितले.  हेमंत जगताप यांनी संरक्षित शेती प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेण्याबाबत सर्व पोकरा अधिकारी वर्गांचे आभार मानले व संरक्षित शेती करताना शेतकऱ्यांनी कोण कोणत्या प्रकारचे डिझाईन्स व त्याला येणारा खर्च व अनुदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता कृषी विज्ञान केंद्रचे प्रमुख डॉ.अनिल तारू, प्रविण देशपांडे, मनीष यदुलवार, डॉ.जगदीश वाडकर, राहुल चव्हाण, डॉ.भारती तिजारा या सर्वांचे सहकार्य लाभले. संचालन व आभार प्रदर्शन हेमंत जगताप यांनी केले. 

                                                                                    *****

 

 

स्मार्ट प्रकल्पातंर्गत लाभ देण्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावे

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज सादर करू नये

बुलडाणा, (जिमाका) दि.10 : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. स्मार्ट प्रकल्पामध्ये समुदाय आधारीत संस्था अर्ज करू शकतात. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्थापीत प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापीत लोकसंचालीत साधन केंद्र यांचा समावेश आहे.

   जाहीराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर कॉल फॉर प्रोपोजल या टॅबवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतसथळावरून डाऊनलोड करून प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात तसेच लोकसंचालीत साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे. या अगोदर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे कृषि उपसंचालक वि.रा बेतीवार यांनी कळविले आहे.

                                                                        ******

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांनी प्रमाणपत्र समर्पीत करावे

  • जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच कांही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून बोगस क्रीडा प्रमाणपत्र/बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना चा शासन निर्णय धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे, २०२२ पुर्वी समर्पीत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात  येतील.

 मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल.

बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. 31 मे, 2022 पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

                                                            *****

शासकीय हरभरा खरेदी सुरू; नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी माल आणावा

  •  जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5230 रूपये प्रति क्विंटल हमी भाव

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5230 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

     हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संग्रामपूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, माँ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी केंद्र सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 1 मार्च 2022 रोजी पासून हरभरा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

   हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 ऑनलाईन पिक पेरासह, बँक पासबुकाची आधार लिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करीता नोंदणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येतील, त्या शेतकऱ्यांनी आपला माल या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेवून यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                        **********

सायप्रिनस कार्प माशांचा प्रजनन हंगाम सुरू

· मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी अर्धबोटुकली, मत्स्यबोटुकलीची मागणी करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : सन 2021 या आर्थिक वर्षाचा सायप्रिनस कार्प माशांचा प्रजनन हंगाम फेब्रुवारी 2022 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे सुरू करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अर्धबोटुकली / मस्त्यबोटुकली प्रकार मत्स्यकास्तकारांना माहे मार्च 2022 च्या शेवटच्या आठवड्यात विक्रीस उपलब्ध होत आहे.

   जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, शेततळी लाभधारक शेतकरी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी त्यांचे तलाव / शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी अर्धबोटुकली, मत्स्यबोटकलीची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच कार्यालयाच्या 07262-242254 क्रमांकावर संपर्क साधून मत्स्यजिरे पुरवठ्याबाबतची माहिती घेवून पुरवठ्याबाबत वेळ व दिनांक घेण्यात यावा. मत्स्यबीज मागणी नोंदविण्यासाठी इच्छूकांनी सहाय्यक आयुक्त म. वि जयस्वाल यांच्या 9881801420, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि.मा साळुंके यांच्या 9860809711, इ. तू देवकत्ते यांच्या 8856929431 क्रमांकावरही संपर्क करावा.

    मच्छिमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक लाभधारक शेतकरी यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज केंद्रामधून मत्स्यबीज खरेदी करणे बंधनकारक व अनिवार्य आहे. तसेच मत्स्यजीरे खरेदी केलेली पावती मत्स्यबीज खरेदी करणाऱ्यांकडे असणे बंधनकारक आणि अनिवार्य आहे. बाहेरच्या जिल्हा, राज्यात मत्स्यबीज खरेदी करण्यासाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. विनापरवानगी मत्स्यबीज खरेदी केल्याचे आढळून आल्यानंतर शासन धोरणानुसार कारवाई होईल. तसेच मत्स्यबीज संचयन पंचनामे करणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ देते वेळेस अडचण निर्माण झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्व मच्छीमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी इष्टतम मस्त्यबीज संयचन आणि अपेक्षीत मस्त्योत्पादन घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. जयस्वाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत मत्स्यबीजाचे प्रकार व दर

बिजाचा प्रकार : मत्स्यजीरे- आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. मत्स्यबीज- आकार 20 ते 25 मि.मी, दर 125 रूपये प्रति हजार. अर्ध बोटुकली- आकार 25 ते 50 मि.मी, दर 250 रूपये प्रति हजार. बोटुकली- आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 500 रूपये प्रति हजार. तसेच पॅकिंग खर्च 15 रूपये प्रति डबा अथवा बॅगप्रमाणे आहे.

*********

टपाल जीवन योजनेसाठी अर्ज करावे; अधिक्षक डाकघर यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेतंर्गत जिल्ह्याच्या अंतर्गत टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता यांची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधिक्षक बुलडाणा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. अभिकर्ता भरतीकरीता वय वर्ष 18 ते 50 असावे, इयत्त 10 वी उत्तीर्ण असावी, बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षीत युवा, माजी जीवन सल्लागार इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर, उममेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रूपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल, जी एनएससी अथवा केव्हीपी च्या स्वरूपात राहील. प्रशिक्षण पूर्तता नंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल, जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रूपांतरीत केल्या जाईल. आयआरडीएचा परवाना परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षाचे आत पास करणे अनिवार्य असेल. निवड झलेल्या उमेदवारा टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल. अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी अधिक्षक डाक घर कार्यालय, बुलडाणा येथे विहीत नमुन्यातील अर्ज आणि इयत्ता 10, 12 वीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र व अन्य संबंधित दस्तऐवज घेवून 12 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून दु 2 वाजेपर्यंत  उपस्थित रहावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

                                                                                                **********

--

No comments:

Post a Comment