Friday, 4 March 2022

DIO BULDANA NEWS 4.3.2022

 बाल न्याय मंडळाच्या फिरत्या बैठकीचे जळगांव जामोद येथे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये बाल न्याय मंडळाच्या फिरत्या, तात्पुरत्या बैठकीचे आयोजन 5 मार्च 2022 रोजी पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार विषयांवर चर्चा करण्यात येईल. तरी नागरिकांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी प्रसिद्धीर पत्रकान्वये केले आहे.

                                                            *******

मार्च महिन्याच्या ई लोकशाही दिनाचे 7 मार्च रोजी आयोजन

  • मोबाईल क्रमांक 9823465599 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.4: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सध्याच्या कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे मार्च महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवार दि. 7 मार्च रोजी या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9823465599 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

    तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

*****

निवासी व अनिवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी खेळनिहाय शोध मोहीम करीता अर्जास मुदतवाढ

  • सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवड

             बुलडाणा,(जिमाका) दि.4: महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजननिवासअद्यावत क्रीडा सुविधाक्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना पुरविण्यात येतात.   सन 2022-23 या वर्षी राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये 19 वर्षाखालील खेळाडूंची निवड करण्यात येत असुन क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्यपुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा यांच्या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने संचालनालयाचे अंतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनींची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्यप्राप्त  खेळाडूंची शोध मोहीम राबविली जात आहे.  यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे.  राज्यातील एकुण 9 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्या वतीने भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.  यासाठी विभागीय स्तरावर आर्चरीज्युदोहॅण्डबॉलॲथलेटीक्सबॉक्सिंगबॅडमिंटनशुटींगकुस्तीहॉकीटेबल टेनिसवेटलिफ्टींगजिम्नॅस्टीक या चाचण्यांचे आयोजन करुन खेळाडूंची राज्यस्तर चाचणीकरीता निवड केली जाणार आहे.  यासाठी खेळाडूंचे वय 19 वर्षाआतील असणे आवश्यक आहेतो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.  निवासी व अनिवासी क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडूकडे सहभागी झालेल्या राज्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रेआधारकार्ड तसेच नगर पालीका / ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म तारखेचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  योग्यता प्राप्त खेळाडू मुले व मुली यांनी आपला विहीत नमुण्यातील प्रवेश अर्ज द्वि प्रतीत आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसह मोबाईल नंबरई-मेल आयडीसंपुर्ण पत्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा येथे दि.20 मार्च 2022 पर्यंत सादर करावा.  या अगोदर ज्यांनी अर्ज सादर केले आहेत.  त्यांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही.

            तरी बुलडाणा जिल्ह्यातील पात्र संबंधीत खेळातील 19 वर्षाआतील खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा येथुन अर्ज प्राप्त करुन घेऊनआवश्यक कागदपत्रांसह दि.20 मार्च 2022 पर्यंत सादर करावा.  तसेच बुलडाणा जिल्ह्यातील उपरोक्त खेळाच्या एकविध संघटनेने सुध्दा आपल्या खेळातील खेळाडूंना या योजनेबाबत अवगत करुन उत्कृष्ठ व दर्जा प्राप्त खेळाडूंना शासनाची निवासी व अनिवासी क्रीडा प्रबोधिनी योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहीत करावे व अधिक माहितीकरीता अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक मो.नं.9970071172 यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment