कोरोना अलर्ट : प्राप्त 3862 कोरोना अहवाल
'निगेटिव्ह'; तर 98 पॉझिटिव्ह
- 129 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट
टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3960 अहवाल प्राप्त झाले आहेत.
यापैकी 3862 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 98 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 68 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा
समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 710 तर रॅपिड टेस्टमधील 3152
अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3862 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :10, बुलडाणा तालुका : कोलवड 1, येळगांव 1, रायगांव 1, मासरूळ
1, दहीद 1, मोताळा शहर : 3,मोताळा तालुका : खामखेड 1, बोराखेडी 2, पुन्हई 1,
रोहीणखेड 1, वडगांव 1, खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : जयपूर लांडे 2, गोंधनापूर 1,
कदमापूर 1, शेगांव शहर : 4, शेगांव
तालुका : जानोरी 1, दे. राजा तालुका : चिंचखेड 1,चिखली शहर : 8, चिखली तालुका : अमडापूर 1, गोद्री 2, कोलारा 1,
मुंगसरी 1, पिंपळवाडी 1, भोकर 1, पेठ 1, सातगांव भुसारी 2, रोहडा 1, कनारखेड 2, संग्रामपूर
तालुका : शेवगा 3, अकोला बु 1, सवडद 2,
मेहकर शहर :4, मेहकर तालुका : आंध्रुड 1, पेनटाकळी 4, दुर्गबोरी
1, मोहतखेड 1, हिवरखेड 1, जळगाव जामोद शहर :1, जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, नांदुरा
शहर : 1, नांदुरा तालुका : शेलगांव
मुकुंद 2, दादगांव 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : दे. कोळ 1, बाबुळखेड 1, शिवणी 1,
ब्राम्हण चिकना 1, परजिल्हा पिंप्री डोळी ता. पातूर 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात
98 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चांडोळ ता. बुलडाणा येथील 60
वर्षीय महिला व गुगळी ता. मोताळा येथील 72 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 129 रूग्णांनी
कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली
आहे.
तसेच आजपर्यंत 510401 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 84242 कोरोनाबाधीत
रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84242 आहे.
आज रोजी 1062 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 510401 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85709
कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84242 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सध्या
रूग्णालयात 832 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 635 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला
आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*****
कृषी
सेवाकेंद्र सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
बुलडाणा, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने,
कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबधित दुकाने, तसेच
कृषी विषयक सेवा आदी सकाळी 7 ते सायंकाळी 7
वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कृषी
निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
सुरु ठेवण्यास परवानगी होती. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे, असे
आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती
यांनी दिले आहेत.
*********
आर. आर पाटील सुंदर गाव स्पर्धेत
ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा
·
इच्छूक ग्रामपंचायतींनी स्वमुल्यांकन
अहवाल 20 जुन पर्यंत सादर करावा
·
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे
आवाहन
बुलडाणा, दि. 8 (जिमाका) : शासनाच्या ग्राम विकास विभागाने 20 मार्च 2021 रोजीच्या
शासन निर्णयानुसार आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे.
या योजनेकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी 10 जुन
2021 ते 31 डिसेंबर 2021 कालबद्धता निश्चित केलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक पंचायत
समिती मधील एका ग्रामपंचायतीला तालुका सुंदर गाव म्हणून घोषीत करण्यात येते. सदर ग्रामपंचायतीला रूपये 10 लक्ष तसेच
जिल्हा सुंदर ग्रामपंचायतीला रूपये 40 लक्ष पारितोषिक प्राप्त होणार आहे. सुरूवातीला
योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या गा्रमपंचायतींनी 20 जुन 2021 पर्यंत स्वमुल्यांकन अहवाल पंचायत
समितीला सादर करावयाचा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी या
योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा
परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.
*********
No comments:
Post a Comment