Tuesday, 29 June 2021

DIO BULDANA NEWS 29.6.2021

 मुसळधार पर्जन्यधारांनी जिल्हा चिंब....

  • सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पाऊस
  • कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यात 28 जुन रोजी मुसळधार पर्जन्यधारांची बरसात झाली. पावसाने सर्वत्र हजेरी लावत कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यदान केले. यामुळे निश्चितच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.  घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर घाटाखालील तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा उर्वरित पेरण्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.  सिं. राजा तालुक्यातील कोराडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात पाणी वाहत आहे.

   जिल्ह्यात आज 29 जुन 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस सि. राजा : 48.1 मि.ली (250.7 मि.ली), चिखली : 43.2 (234.5 मि.ली), मोताळा : 36.9 (113.4), बुलडाणा : 30 (130.3), मेहकर : 27.5 (259.9), दे. राजा: 26.3 (149), मलकापूर : 25.8 (69.4), लोणार : 24.2 (151), जळगांव जामोद : 19.4 (43.6), खामगांव : 13.3 (155.3), संग्रामपूर : 12.8 (115.3), नांदुरा : 12.1 (74.8) आणि सर्वात कमी शेगांव तालुक्यात : 6.6 (32.2) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 326.2 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 25.1 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 136.9 मि.ली आहे.

   बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोराडी मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे सांडवा वाहत आहे. रात्री 10.30 वाजेदरम्यान प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात 10 से.मी उंचीचा 8.76 क्युबीक मीटर प्रति सेकंद विसर्ग होत होता. त्यामुळे नदीकाठावरील मेहकर तालुक्यातील नागझरी, कल्याणा, नेमतापूर, फर्दापूर गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2725 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 26 पॉझिटिव्ह

  • 38 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 407 तर रॅपिड टेस्टमधील 2318 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2725 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : निवाणा 1, पळशी 1, सोनाळा 1, काकनवाडा 1, खामगांव शहर : 4,  खामगांव तालुका : जनुना 1, घाटपुरी 1, सुटाळा 1, दे. राजा तालुका : भिवगण 1, किन्ही 2, चिखली शहर : 1, चिखली तालुका : मेरा बु 1, लोणार तालुका : सावरगांव 1, भुमराळा 1, बिबी 1, पिंप्री खंडारे 1, शेगांव शहर :1, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : रईखेड टेकाळे 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 2,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 26 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान उपजिल्हा रूग्णालय, शेगांव येथे माळीपुरा, शेगांव येथील 75 वर्षीय महिला व स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे मातला ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 38 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 570221 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85879 आहे.

  आज रोजी 1513 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 570221 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86638 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

आजी व माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सुट

  • सैनिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी, विरपत्नी, विरपिता, संरक्षण दलातील शैर्य पदक धारक यांना शासन निर्णया नुसार मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील बरेच माजी सैनिकांनी या सुटचा लाभ घेतलेला नाही, असे दिसून आले आहे.

      तसेच जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी करा बाबत सर्व सैनिकांनी एकमेकांना सूचना देण्यात यावी. ग्रामीण भागातील माजी सैनिकांना याबाबत सुचना देण्यात याव्या. आजी सैनिकांना केवळ ग्रामीण भागा मध्ये मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आली आहे. या सवलतीसाठी त्यांनी युनिट मधून सर्विस करीत असले, तर प्रमाणपत्र सादर करावे. मालमत्ता करात सुट मिळणेकरीता नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती मध्ये मालमत्ता कर भरणा केलेली पावती,  ओळखपत्र, आजी

सैनिकांचे सर्विस प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच घर माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावाने असेल तर पी. पी. ओ. सह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्काळ या संधीचा लाभ घेण्या करीता कागद पत्रासह हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*******

अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

  • वळती येथील शाळा

    बुलडाणा, (जिमाका)दि.29 : चिखली तालुक्यातील वळती येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. ही शाळा सन 2012-13 पासुन सुरू झालेली आहे.  या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर शाळा ही शासकीय असून समाज कल्याण विभागा अंतर्गत संचालीत आहे.

   या शाळेला आय.एस.ओ नामांकन प्राप्त झाले आहे. शाळा ही तीन मजली असून सुसज्ज व स्वचछ वातावरणात आहे. शाळेत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके यासोबत संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य, भव्य ग्रंथालय, डिजीटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सुसज्ज जिम साहित्य सुविधा, संगणक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र संगणक कक्ष, मोफत अंथरून  आदी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेत विविध क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे आयोजन व मार्गदर्शन देण्यात येते. तसेच विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचे आयोजन, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येते.  प्रवेशासाठी अनु जाती 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व एसबीसी 2 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे. तरी इच्छूक पालकांनी त्वरित कार्यालयीन वेळेत शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक एम. एस जाधव यांनी केले आहे.

***********

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

• जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यानचा कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका)दि.29 : माहे जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.

       शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – जुलै 2021 मध्ये : जळगाव जामोद 5 जुलै, शेगाव 7 व 26 , मेहकर 8 व 28, खामगांव 9 व 30, चिखली 14, नांदुरा 19, मलकापूर 12 व 22, सिंदखेड राजा 23, लोणार 16 व देऊळगाव राजा येथे 15 जुलै रोजी होणार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 ऑगस्ट, शेगाव 5 व 26, मेहकर 9 व 27, खामगांव 11 व 30, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 12 व 23, सिंदखेड राजा 24, लोणार 18 व देऊळगाव राजा 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. सप्टेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 सप्टेंबर, शेगाव 7 व 27, मेहकर 9 व 29, खामगांव 14 व 30, चिखली 16, नांदुरा 21, मलकापूर 15 व 22, सिंदखेड राजा 24, लोणार 20 व देऊळगाव राजा 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 4 ऑक्टोंबर, शेगाव 5 व 26, मेहकर 8 व 28, खामगांव 11 व 29, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 12 व 22, सिंदखेड राजा 25, लोणार 18 व देऊळगाव राजा 14 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 8 नोंव्हेबर, शेगाव 9 व 26, मेहकर 11 व 29, खामगांव 12 व 30, चिखली 16, नांदुरा 22, मलकापूर 15 व 23, सिंदखेड राजा 25, लोणार 18 व देऊळगाव राजा 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये : जळगाव जामोद 6 डिसेंबर, शेगाव 8 व 27, मेहकर 9 व 29, खामगांव 10 व 30, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 14 व 22, सिंदखेड राजा 24, लोणार 17 व देऊळगाव राजा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

No comments:

Post a Comment