लाखमोलाची
बियाणे विक्री…
- सोयाबीन बियाणे विक्रीतून खरीप हंगामापूर्वीच
लाखाचे उत्पन्न
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : मागील वर्षी
झालेला मुसळधार पाऊस.. काढणीच्या वेळी आलेला पाऊस.. यामुळे सोयाबीन बियाणे उगवणक्षम
व दर्जेदार मिळण्याची साशंकता यावर्षी निश्चितच वाढलेली होती. त्यामुळे या
वर्षीच्या खरीपात सोयाबीनचे कुठले बियाणे पेरावे या विंवचनेत बळीराजा होता. कृषि
विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक
प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे म्हणून ठेवले. घरचे बियाणे
पेरण्याच्या आवाहनाला शेतकरी बांधवांनी प्रतिसाद देत घरचे बियाणे पेरण्याकडे कल
वाढविला. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे सोयाबीन कृषि विभागाच्या
सुचनेनुसार दर्जेदार साठवण करीत उगवणक्षम ठेवले. अशा शेतकरी बांधवांनी या खरीप
हंगामात लाखमोलाची बियाणे विक्री केली आहे.
चिखली तालुक्यातील किन्होळा, मंगरूळ नवघरे व
अंबाशी येथील शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे विक्रीतून खरीप हंगामापूर्वीच
लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. कृषि विभागाने सोयाबीन शेतमाल पुढील वर्षी बियाणे
म्हणून वापरण्यासाठी काही सूचना शेतकरी बांधवांना दिल्या. त्यानुसार किन्होळा
येथील किसन कोंडुबा बाहेकर, मंगरूळ नवघरे येथील नितीन रविंद्र तांबट व अंबाशी
येथील प्रतापराव श्रीधरराव देशमुख यांनी आपल्या शेतातील सोयाबीन कृषि विभागाच्या
सुचनांनुसार बियाण्यासाठी घरीच व्यवस्थित रित्या साठवण केले. त्यामुळे या खरीप
हंगामात त्यांच्या सोयाबीनला बियाणे म्हणून अधिक पसंती मिळाली.
किन्होळ्याचे
किसन बाहेकर यांनी 20 शेतकऱ्यांना 55 क्विंटल बियाणे विक्रीतून 4 लक्ष 40 हजार
रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी 8 हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे बियाणे
विक्री केली आहे. तर मंगरूळ नवघरे येथील
नितीन तांबट यांनी 12 शेतकऱ्यांना 32.80 क्विंटल बियाणे विक्रीतून 3 लक्ष 28 हजार
रूपये मिळविले आहे. श्री. तांबट यांनी 10 हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळविला
आहे. तसेच 11 शेतकऱ्यांच्या 15 क्विंटल
बियाणे विक्रीतून अंबाशीच्या प्रतापराव देशमुख यांनी 1 लक्ष 20 हजार रूपयाचे
उत्पन्न प्राप्त केले. त्यांनी 8 हजार
रूपये प्रति क्विंटल दर प्राप्त करून उत्पन्न मिळविले आहे.
चिखली
तालुका कृषी कार्यालयाने सोयाबीन उपलब्धतेची यादी तयार करून दिल्यामुळे विविध ठिकाणच्या
शेतकऱ्यांनी संपर्क करून सोयाबीन बियाणे हे कमी कालावधीमध्ये योग्य दरामध्ये
विकल्या गेले. सदर बियाणे हे बाजारामध्ये विकले असता प्रति क्विंटल 6 हजार रूपये दराने विकल्या गेले असते. मात्र कृषि
विभागाने केलेल्या प्रचार – जनजागृतीमुळे प्रति क्विंटल 8 ते 10 हजार रूपये प्रति
क्विंटल प्रमाणे दर मिळाला. त्यामधून प्रति क्विंटलमागे जास्तीचा दर मिळाला. तसेच
विशेष म्हणजे ग्राहक शोधण्याची गरज पडली नाही. तरी शेतकरी बांधव यावर्षीसुद्धा
उत्पादीत सोयाबीन माल कृषि विभागाच्या सुचनेनुसार साठवण करून पुढील वर्षी बियाणे
म्हणून विक्री करू शकता. घरच्या घरी उगवणक्षम बियाणे तयार करावे व खर्चात बचत
करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
जुन महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा
- आरोग्य विभागातर्फे हिवताप जनजागृती
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : आरोग्य विभागातर्फे जुन-2021 हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून
साजरा करण्यात येत आहे. या महिन्या विविध
कार्यक्रमा अंतर्गत घरोघरी डेंगू, मलेरीया विषयी कंटेनर सर्व्हेक्षण सुरु करण्यात
आल आहे. आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जावून माहिती पत्रक वाटप करुन डास अळी
सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे कार्यक्रम करीत आहे. विशेष डासामार्फत प्रसारीत
होणारे हत्तीरोग, डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया या रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित
कार्य शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितिन तडस, जिल्हा
आरोग्य अधिकारी, डॉ.बाळकृष्ण कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी, शिवराज चौहाण यांचे
मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येत आहे. साथरोग नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून
नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणे करुन या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे
शक्य होईल. डेंग्यु सारख्या रोगावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे तसेच हा रोग
जिवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक योजना राबविणे हा एकच योग्य मार्ग आहे.
सध्या पावसाळा असल्यामुळे डासांची पैदास होवून आजार पसरण्याची भिती वाटत आहे.
डासांमार्फत होणारे आजार दूर करण्या करिता आरोग्य विभाग सज्ज आहे.
आशा बळकटी करणात अशांना रक्त नमुना घेणे,
कंटेनर सव्हेक्षण करणे, डास उत्पत्ती स्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या
गॅस पाईपला जाळया बसविणे या विषयी माहिती देण्यात आली. नागरिकांनी एक दिवस कोरडा
दिवस पाळावा, झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावे, दाराला व
खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, ताप आल्यास रूग्णालयाशी संपर्क साधावा, भंगार
साहित्य, टायर्स, कुलर्स, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे,
मडके आदी सर्व वस्तू नष्ट कराव्यात. या मोहिमेत आरोग्य सहायक श्री. पाखरे, आरोग्य
सेवक श्री. बाहेकर, श्री. जुमडे, श्री. वनारे, श्री. जाधव, श्री. पडोळकर, श्री.
इंगळे आदीनी सहभाग घेतला.
**********
कोरोना अलर्ट : प्राप्त 3047 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह';
तर 53 पॉझिटिव्ह
• 61
रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.17 :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या
अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3047 अहवाल कोरोना
निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपीड टेस्टमधील 21 अहवालांचा समावेश आहे.
निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 609 तर रॅपिड टेस्टमधील 2438 अहवालांचा
समावेश आहे. अशाप्रकारे 3047 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका :कोलवड 1, येळगांव 2, संग्रामपूर तालुका : शेगांव तालुका : मनसगांव 2, वरूड 1, पहुर पुर्णा
1, मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1, सावरगांव 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका :
तांदुळवाडी 1, उमाळी 1, उमरखेड 2, चिखली शहर : 4, चिखली तालुका : उंद्री 1, मलगी
1, पेनसावंगी 2, कव्हाळा 1, सिं .राजा
तालुका : रताळी 2, वर्दडी 1, किनगांव राजा 1, वडाळी 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1,उंबरखेड 1, मेहकर शहर : 2, खामगांव शहर : 1, खामगांव
तालुका : कवडगांव 1, कुंबेफळ 1, किन्ही महादेव 1, जनुना 1, दिवठाणा 3, बोरी अडगांव
1, जळगांव जामोद शहर :5, जळगांव जामोद
तालुका : आसलगांव 1, लोणार तालुका : पिंप्री
खंडारे 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या
आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण
आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान काँग्रेस नगर, बुलडाणा येथील 56 वर्षीय महिला
व गांगलगांव ता. चिखली येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 61 रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 540332 रिपोर्ट निगेटिव्ह
प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85371 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना
निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85371 आहे.
आज रोजी 1421 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात
आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 540332 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86133
कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85371 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे
जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 109 कोरोना
बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच
आजपर्यंत 653 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment