Tuesday, 1 June 2021

BULDANA NEWS 1.6.2021

जिल्ह्यात ११२६ रूग्णांना मिळाली उपचाराची 'संजीवनी ' * महात्मा फुले जन आरोग्य योजना *योजनेविषयी तक्रार असल्यास १५५३८८ व १८००२३३२२०० क्रमांकावर संपर्क साधावा बुलडाणा, (जिमाका) दि. १: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्हयात राज्य आरोग्य हमी सोसायटी ,मुंबई मार्फत राबविण्यात येते. या योजने अंतर्गत कोविड व नॉन कोविड उपचार रोख रहित पद्धतीने अंगीकृत रुग्णालयातून करण्यात येतात. महात्मा फुले जनारोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात मेहकर मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, संचेती ह्रदयालय हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल चिखली, साई बालरुग्णालय खामगांव आदी खाजगी कोविड रुग्णालय आहेत. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय बुलडाणा , सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, उप जिल्हा रुग्णालय मलकापूर, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा अशा एकूण १२ कोविड रुग्णालयात योजने अंतर्गत उपचार होतात. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यातील १२ रुग्णालयात एकूण ११२६ रुग्णांनी योजने अंतर्गत उपचाराची संजीवनी मिळाली आहे . तसेच ४१६ रुग्णांनी श्वसन विकाराकरिता योजने अंतर्गत बाहेर जिल्ह्यातदेखील उपचार घेतला आहे. योजने अंतर्गत रेमदेसिवीर म इंजेकशन खर्च योजनेच्या पॅकेज मध्ये समाविष्ट नाही. तो खर्च रुग्णास करावा लागेल. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तक्रार नोंदणी व मदत म्हणून टोल फ्री नंबर १५५३८८ आणि १८००२३३२२०० वर संपर्क साधावा. तसेच ई-मेल वर तक्रार नोंदणीसाठी complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलचा उपयोग करावा. वरील कोविड रुग्णालय यादी प्रमाणे जर आपले रुग्णालय ह्या मधील असेल तर ह्या सर्व रुग्णालयात प्रवेश घेताच आपणास योजनेचे आरोग्य मित्र कक्ष आहेत. या कक्षातही लिखित स्वरूपात तक्रारी नोंद करता येते. रुग्णालय जर योजने मध्ये अंगीकृत नसेल तर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे भरारी पथक यांना आपली तक्रार द्यावी. तसेच बाहेर जिल्ह्यातील खाजगी कोविड हॉस्पिटल असेल तर त्या जिल्ह्यातील भरारी पथकास आपली तक्रार द्यावी . योजने अंतर्गत नॉन कोविड आजारांवर देखील उपचार करण्यात येतात. ही रुग्णालये पुढील प्रमाणे आहे : अमृत हृद्यालाय बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, आस्था हॉस्पिटल मलकापूर, सोनटक्के बाल रुग्णालय खामगाव, माउली डायलिसिस सेन्टर शेगाव, राठोड हॉस्पिटल मेहकर, धनवे बाल रुग्णालय चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली, सिल्व्हर सिटी खामगाव. तसेच केवळ डायलिसिस रुग्णांकरिता सुविधा ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद व ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल ता. संग्रामपूर येथे आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ****** लोकसहभागीय जलसाक्षरता अभियानांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात * भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा बुलडाणा कडून आयोजन बुलडाणा, (जिमाका) दि. १: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने राज्य स्तरावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलडाणा या कार्यालयाचे वतीने भूजल पुनर्भरण, ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद व जलसाक्षरता लोकसहभागीय चळवळ परिसंवाद तथा कार्यशाळा व चर्चासत्राचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने विहीर पुनर्भरण आणि लोकसहभागातुन ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद, छतावरील पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग ) अधिक प्रमाणात करण्यात यावे, यासाठी उदबोधन करण्यात आले. कार्यक्रमासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अमरावती विभागाचे उपसंचालक संजय कराड, यांनी विहिर पुनर्भरण या विषयावर सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीमती एस.जी.बैनाडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी जिल्हयाची भूपृष्ठीय व भूशास्त्रीय माहिती सादरीकरणाव्दारे सांगीतली व एस.एन. डव्हळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी लोकसहभागातुन ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद या विषयावर सादरीकरण केले. व्ही.जे.वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, बुलडाणा व उल्हास बंड, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी उपस्थितांच्या शंकांचे निराकरण केले. कार्यशाळेत, अटल भूजल योजनेत समाविष्ट असलेल्या मातोळा तालुक्यातील ग्रामपंचयती व जिल्हयातील इतर ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उत्सर्फुतपणे सहभागी झाले होते. उपस्थितांनी विहिर पुरर्भरण व भूजल पुनर्भरण करण्यास संमती दर्शविली. अशा प्रकारे सदर ऑनलाईन वेबिनार चर्चात्मक पध्दतीने यशस्विरित्या उत्साहात पार पडले कार्यशाळेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तायडे यांचे सहकार्य लाभले. वेबीनारमध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधी व अटल भूजल योजनेत समाविष्ट असलेले ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment