Friday, 18 June 2021

DIO BULDANA NEWS 18.6.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2243 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 35 पॉझिटिव्ह

  • 48 रूग्णांना मिळाली सुट्टी
  •  आज एकही मृत्यू नाही

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2278 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2243 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपीड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 344 तर रॅपिड टेस्टमधील 1899 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2243 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :4, बुलडाणा तालुका : सावळा 1, येळगांव 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : पेनसावंगी 2, गांगलगांव 1, आमखेड 1, अंत्री खेडेकर 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : तांदुळवाडी 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : जिगाव 2,  दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहा 1, भिवगण 1, आळंद 2, निवडुंगा 1, जळगांव जामोद तालुका : खोपडपट्टी 1,  लोणार तालुका : महारचिकना 1, मेहकर तालुका : माऊतखेड 1, सि. राजा तालुका : नसिराबाद 1, शिवणी टाका 1, परजिल्हा रिसोड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रूग्ण आढळले आहे. कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही.

      तसेच आज 48 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 542575 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85419 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85419 आहे.

  आज रोजी 1770 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 542575 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86168 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85419 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 653 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

********

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे 21 जुन रोजी आयोजन

  • आयोजनाबाबत सभा संपन्न

           बुलडाणा,(जिमाका) दि.18 : गेल्या कित्येक दशकांपासुन भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झालेला आहे.  संयुक्त राष्ट्रांनी 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने दि.17 जुन 2021 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार  किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक), आरोग्य भारतीचे डॉ.राजेश्वर उबरहंडे, क्रीडा भारतीचे सदानंद काणे,  बाळ आयचित, रविंद्र गणेशे,  भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक एस.पी.आठवले, आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशांत लहासे, योगांजली योगवर्ग योगविद्या धाम नाशिकच्या सौ.अंजली परांजपे, आयुष मंत्रालयाच्या डॉ.मंजु राजेजाधव, पी.आर.उपर्वट अध्यक्ष बुलडाणा जिल्हा योग असोसिएशन व तेजराव डहाके सचिव, बुलडाणा जिल्हा योग असोसिएशन, नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, एन.बी.धंदर, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रविंद्र धारपवार क्रीडा अधिकारी, विजय बोदडे यांचे उपस्थितीत सभा पार पडली.

सभेमध्ये जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक-युवती, नागरीकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे तसेच योगाचा प्रसार व प्रचार करणे याकरीता आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधुन दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजेपर्यंत कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही ऑनलाईन पध्दतीने कोरोना नियमाचे पालन करुन आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.  सदर उपक्रम अत्यंत चांगल्याप्रकारे राबविण्याकरीता तसेच सर्वात जास्त सहभाग घेण्याकरीता सामान्य योग प्रोटोकॉलवर आधारीत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्य./प्राथ. कार्यालय, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र विविध क्रीडा मंडळे, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, बुलडाणा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व योगक्षेत्रात विविध कार्यरत संस्था संयुक्त विद्यमाने युवक-युवती, योगाप्रेमी नागरीक, अधिकारी/कर्मचारी यांचे करीता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.

            त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था / संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये यांना ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे.  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा द्वारे योग दिनाचे औचित्य साधुन गुगल मिटद्वारे ऑनलाईन पध्दतीने दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे.  त्याबाबतची गुगल मिट लिंक  https://meet. google.com.ftx-xsnk-tbn तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणाचे फेसबुक पेज लाईव्ह सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  त्यानुसार या कार्याक्रमात जिल्ह्यातील नागरीक, युवक युवती, विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होता येईल.

            तसेच महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यालय, क्रीडा मंडळे यांना त्यांचे स्तरावर ऑनलाईन योगदिन साजरा करणेबाबत गुगलमिट, झुम ॲप व इतर व्हर्च्युअल पध्दतीने जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात यावे. त्याअनुषंगाने बुजिल्ह्यातील सर्व शाळा / महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी योगप्रेमी नागरीक, खेळाडू यांनी दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 या वेळेत ऑनलाईन, आपआपल्या घरी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सामुहीक योग प्रात्यक्षीक करुन तसा उपस्थितीचा सविस्तर अहवाल, कार्यक्रमाचे फोटो, योगास्थळ, सहभागी संख्या, इत्यादी बाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी असेही सभेमध्ये ठरले.

            तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षीक सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथील हॉलमध्ये करण्यात येईल.  या प्रात्यक्षीक कार्यक्रमासाठी सौ.अंचली परांजपे व प्रशांत लहासे व योगक्षेत्रात काम करणारे योगप्रेमी उपस्थित राहतील.  तसेच प्रोजेक्टरवर लाईव्ह फेसबुक पेजद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक, योग प्रेमी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.  तर या तांत्रीक बाबीसाठी कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, आयुर्वेद महाविद्यालयातील कर्मचारी हे काम पाहतील.  या सभेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले,  असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                         ****************

 

                               जळगांव जामोद वन परिक्षेत्रातील वृक्ष लागवडीचे काम नियमानुसारच

  • 33 कोटी वृक्षलागवडीमधील वृक्षारोपणात कुठलाही गैरप्रकार नाही

     बुलडाणा,(जिमाका) दि.18 : या वन परिक्षेत्रात 33 कोटी  योजनेचा बट्टयाबोळ असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र जळगांव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील एकूण लागवड करण्यात आलेल्या 2 लक्ष 61 हजार रोपांची माहे मे 2021 या तृतीय वर्षातील जीवंत रोपे सरासरी टक्केरी ही 80 टक्के पेक्षा अधिक आहे. या रोपांची माहिती छायाचित्र व चित्रफीतीसह mahaforest.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील वृक्ष लागवड ही बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, मजूर कामगार सहकारी संस्था यांचेमार्फत काम वाटप करूनच नियमानुसारच करण्यात आले आहे. या वृक्षलागवडी संदर्भातील सर्व कामे वेळोवेळी त्यांचे मार्फत करून घेण्यात आलेली आहे. परिक्षेत्रातील 33 कोटी वृक्षलागवड यशस्वी असून कुठलाही गैरप्रकार सदर कार्यालयामार्फत झालेला नाही, असा खुलासा वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जळगाव जामोद यांनी केला आहे.

*******

 

शिकाऊ चालक परवाना ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रणाली सुरू

  • गैरवापर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणार

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑन लाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जुन पासून सुरु करण्यात आली आहे. सदर कार्यप्रणालीमध्ये महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी या कार्यालयारा प्राप्त झाल्या आहेत.

   वास्तविक केंद्रिय मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुजप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश हा की संबंधित अर्जदारास वाहतूक नियम चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदारीचे महत्व याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. सदर प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास सदर परिक्षेचे महत्त्व पटवून द्यावे तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही,  याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर आज अखेर राज्यात १६ हजार ९२० शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे 300 नवीन वाहन नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच या सदर लोकाभिमुख सोयी सुविधांचा गैरवापर होणार नाही,  यासाठी प्रणालीमध्ये अवश्यक त्या सुधारणा यथास्थिती करण्यात येत आहेत. तथापि, सध्या उपलब्ध असलेल्या ऑन लाईन सुविधांचा गैरवापर करणा-या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर अवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

   या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा, कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल अशी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल,  इंटरनेट कॅफे सदर सविधेचा गैरवापर करतील अशा संस्थांविरुध्द पोलीस कारवाई तर केली जाईल पण या व्यतिरिक्त, महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करणार आहे. नागरिकांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

   सदर प्रणालीमध्ये नागरिकांना येणा-या काही इतर अडचणी जसे की, आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहीती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होत असल्यास अथवा त्या प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

******

No comments:

Post a Comment