कोरोना अलर्ट : प्राप्त 2063
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह
- 106 रूग्णांना मिळाली
सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड
अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2118 अहवाल प्राप्त झाले
आहेत. यापैकी 2063 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले
आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपीड टेस्टमधील 9
अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1305 तर रॅपिड
टेस्टमधील 758 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2063 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह
आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर
: 1, बुलडाणा तालुका : भडगांव 1, मलकापूर तालुका : वाकोडी 1, सिं. राजा तालुका : किनगांव राजा 2,
कुंबेफळ 1, संग्रामपूर
तालुका : बोरखेड 1, दे.
राजा शहर : 2, दे.
राजा तालुका : नारायणखेड 1, पांगरी 1, पिंपळगांव चि 4, जांभोरा 2, खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : गोंधनापूर
1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : अंबाशी 1, रस्तळ 1, इसोली 1, सातगांव भुसारी 1, शेगांव
शहर : 3, शेगांव तालुका : मनसगांव 3,
गोळेगांव 1, जानोरी 1, पलोदी 1, भोनगांव 1, पळशी 1, मेहकर
तालुका : खामखेड 1, जळगांव
जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1 , लोणार शहर
: 2, लोणार तालुका : येवती 1, आरडव 1, परजिल्हा
चिंचबा ता रिसोड 1, जाफ्राबाद 2, नागड ता.
बाळापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या
आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा
येथील 70 वर्षीय महिला, केसापूर ता. बुलडाणा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा
मृत्यू झाला आहे.
तसेच आज 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच
आजपर्यंत 531630 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85102
कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण
संख्या 85102 आहे.
आज रोजी 764
नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 531630
आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86008 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85102
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 257
कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 649 कोरोनाबाधीतांचा
मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*************
चिखली – धाड राष्ट्रीय महामार्ग
कामासाठी ढालसावंगी जवळील वन क्षेत्रात परवानगी
बुलडाणा,(जिमाका)
दि.14 : चिखली – हातणी-धाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
753 एम या रस्त्याकरीता बुलडाणा वन विभागातील मौजे ढालसावंगी ता. बुलडाणा येथील 4.844
हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र शासनाची
तत्वत : मंजुरी प्राप्त झालेली आहे. तसेच केंद्र शासनाकडील 7 मे 2015 च्या
पत्रातील मार्गदर्शक सुचनांना विचारात घेवून राज्य शासनाने 1 जुलै 2015 चे
परिपत्रकान्वये अटी व शर्तींचा अधिन राहून प्रकल्प यंत्रणेस बुलडाणा वनविभागातील एकूण
4.844 हेक्टर प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त आहे.
मंजूरी प्राप्त असलेल्या अमरावती वन वृत्तातील बुलडाणा वन विभागातील 4.844 हेक्टर वनक्षेत्रावरील
एकूण 592 वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राचे मर्यादेत प्रकल्पाची
कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यासाठी
केंद्र शासनाने सदर प्रकल्पास वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत अटी नमूद करून
तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. सदर मंजूर केलेल्या वन क्षेत्रातच प्रकल्प यंत्रणा
म्हणून वनक्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रकल्प यंत्रणेकडून केंद्र
शासनाच्या व राज्य शासनाच्या नमूद कोणत्याही अटींचा भंग करण्यात येवू नये. तसे केल्यास
प्रकल्पाचे काम थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील
वृक्षतोडीचे कामे सुरू करतांना सदरची कामे वनखात्याच्या विहीत कार्य पद्धतीनुसार खात्यामार्फत
करण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*********
अनलॉकनंतर
एस टी महामंडळाच्या फेऱ्या पुर्ववत सुरू
बुलडाणा,(जिमाका)
दि.14 : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉकडाऊनचा
निर्णय घेतला. त्यामुळे एस टी महामंडळाची प्रवाशाी वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात
आली होती. ही प्रवाशी वाहतूक अनलॉक निर्णयानंतर पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील
बुलडाणा, चिखली, खामगांव, मलकापूर, जळगांव जामोद, मेहकर व शेगांव आगारांनी विविध
मार्गावरील प्रवाशी फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.
असे
आहे आगार निहाय फेऱ्यांचे नियोजन
बुलडाणा
: मलकापूर सकाळी 7, 7.30,
8,8.30, 9,9.30,10,11, दुपारी 12, 1, 2 व 3. मेहकर - सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 12, 2, 3, 4 व सायं 5. नागपूर
– सकाळी 7.30 वा, अमरावती – सकाळी 6.30, 10.45 वा, औरंगाबाद – सकाळी 9.30, सायं 5
वा, जालना – सकाळी 8, दु 2 वा, अकोला – सकाळी 8.30, दु 12.30 वा. चिखली :
औरंगाबाद- सकाळी 6.30, 8.30, दु 2, 4 वा, बुलडाणा – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12,
2, 4 वा. जालना – सकाळी 7.30, 9.30, दु 12, 2 वा, अकोला- सकाळी 8, 10, दु 1 व 3
वा. खामगांव
: अकोला – सकाळी 7, 10, 11, दु 2 वा, मेहकर – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12,
2, 3, 4, सायं 5 वा. बुलडाणा – सकाळी 7.30, 8, 9, दु 3, 4, सायं 5, शेगांव- सकाळी
7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11, दु 3, 4 वा. धुळे- सकाळी 8 व 10 वा, जळगांव
खां – सकाळी 7, औरंगाबाद- स 9.30, दु 12 वा, मेहकर
: बुलडाणा- सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12, 2, 3, 4, सायं 5 वा, खामगांव- सकाळी
7, 8, 9, 10, 11, दु 3, 4 व सायं 5 वा, जळगांव खां- सकाळी 7, 9, 11 वा, नागपूर-
सकाळी 7.30 वा, मलकापूर : औरंगाबाद-
सकाळी 6.30, 8.30, 9.30, 11.30, दु 12.30, सायं 5.30 वा, अमरावती- सकाळी 9, दु 12,
4 वा, अकोला- सकाळी 7.30, 9.30, 11.30 व दु 2.30 वा, बुलडाणा- सकाळी 7, 7.30, 8,
8.30, 9, 9.30, 10, 11, दु 12, 1, 2 व 3 वा, जळगांव
जामोद : बुलडाणा- सकाळी 8, 10, दु 12, 4 वा, नांदुरा - सकाळी 7, 8.30, 9,
9.30, 10.30, 11, दु 12, 3, 4 व सायं 5 वा, शेगांव- सकाळी 7, 8, 9, 10, दु 12, 2,
4 व सायं 5 वा, औरंगाबाद- सकाळी 7.30 व दु 2.30 वा, शेगांव : खामगांव – सकाळी 7, 7.30, 8,8.30, 9,9.30,10,11, दुपारी 3 व
4 वा, अकोला- सकाळी 7, 10,11, दुपारी 2 वा ,जळगांव जामोद- सकाळी 7, 8, 9, 10, दु
12, 2, 4 व सायं 5 वा, औरंगाबाद -सकाळ 6.15 व 8.30 वा, अमरावती -–सायं 4.45 वा, नागपूर-
सकाळी 10.30 वा, चंद्रपूर -–सकाळी 9.30 वा.
************
महाराणा
प्रताप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा,(जिमाका)
दि.14 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात दिनांक 13 जुन रोजी नायब तहसिलदार श्री. करे यांनी पुष्पहार
अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री साठे
आदी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment