Tuesday, 15 June 2021

DIO BULDANA NEWS 15.6.2021

                      वाशिम येथील प्रयोगशाळा निर्मितीचे काम वेगाने पुर्ण करा

-         अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

·         म्युकर मायकोसिसच्या औषधाचा, विभागातील रिक्त पदांचा घेतला आढावा

·         विभागात अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करा

बुलडाणा,(जिमाका) दि.15 : राज्यात विभागाच्या प्रयोगशाळा मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे आहे. जनतेला चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ व औषधे मिळण्याकरीता विभागाच्या अधिपत्याखालील अत्याधुनिक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केल्यास विभागाचे कामकाज सुरळीतपणे होईल.  त्यामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सर्व जिल्ह्यांसाठी वाशिम येथे होणारी प्रयोगशाळा सोयीची ठरणार आहे. प्रयोगशाळेतील पदनिर्मितीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. या प्रयोगशाळेचे काम तातडीने पुर्ण करावे, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.

   अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथील विश्राम गृहात 14 जुन रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना मंत्री डॉ शिंगणे बोलत होते. यावेळी अमरावती विभागातील सह आयुक्त (अन्न) सुरेश अण्णापुरे, सह आयुक्त अशोक बरडे, सहा. आयुक्त श्री. घरोटे, सहा. आयुक्त (औषधे) विनय सुलोचने, सागर तेरकर, हेमंत मेटकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे आदी उपस्थित होते.

   अमरावती विभागात प्रतिबंधत्मक अन्न पदार्थ व गुटखा विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना देत मंत्री डॉ शिंगणे म्हणाले, राज्यामध्ये अवैध गुटखा, प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ विक्री रोखण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. तरी या प्रयत्नांना पुढे नेत अमरावती विभागात अवैध गुटखा विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारच्या कारवाई विभागात वाढवाव्यात.

      ते पुढे म्हणाले, म्युकर मायकोसिस आजार कोविड रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे कमी झालेला दिसत आहे. या आजारावरील औषधे महागडी असून त्याचे रेशनिंग आवश्यक आहे. म्युकर मायकोसिस वरील अँटी फंगल औषधांचा तुटवडा होवू देवू नये. ही औषधे शासकीय रूग्णालयांमार्फतच रूग्णांना देण्यात येत असून खाजगीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे.  तसेच दुध, अन्न पदार्थ तपासण्यात यावेत. भेसळीचे प्रमाण निदर्शनास आल्यास तपासणीचे प्रमाण वाढवावे.

  कोरोना विषाणू संसर्ग प्रभाव बघता अन्न पदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता पाळावी. उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करू नये. याबाबत विभागाने मोहिम राबवून अन्न पदार्थ तपासावेत. कुठेही अन्न पदार्थांमुळे अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री डॉ शिंगणे यांनी केले.    

                                                                        *********

कोरोना अलर्ट : प्राप्त 3065 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 35 पॉझिटिव्ह

  • 148 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3065 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपीड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 333 तर रॅपिड टेस्टमधील 2732 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3065 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : पळसखेड भट 1, शिरपूर 1,  संग्रामपूर तालुका : कुंभारखेड 1,    चिखली शहर : 2,  चिखली तालुका : पिंपळगांव 1, सवणा 1,  तेल्हारा 2, शेलगांव जहागीर 2, अंत्री खेडेकर 1, मंगरूळ नवघरे 2, एकलारा 1, करवंड 1,   मेहकर तालुका : सोनाटी 1,   जळगांव जामोद शहर : 7, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1 ,   लोणार तालुका : बिबी 2, पिंप्री खंडारे 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जानेफळ ता. मेहकर येथील 39 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 148 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 534695 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85250 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85250 आहे. 

  आज रोजी 1093 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 534695 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86043 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85250 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 143 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 650 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*************

 

मका खरेदी पुन्हा सुरू ; 30 जुनपर्यंत मुदत

·         14 खरेदी केंद्रांना मान्यता

बुलडाणा,(जिमाका) दि.15 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दराने मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या 30 जून पर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. तसेच मका खरेदीसाठी शासनाने 60 हजार क्विंटलटचे उदिष्ट दिलेले आहे.

   तसेच जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी 8924 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.  जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा संपन्न झाली.   त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मका खरेदीसाठी 14 खरेदी केंद्रांना तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगांव , मलकापूर, जळगाव जामोद व खानगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी  सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी  देऊळगाव राजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा केंद्र- वाडी या केंद्रांना मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा यांनी जिल्ह्यामध्ये उपरोक्त ठीकाणी मका खरेदी सुरु करण्याचे आदेश दिलेले आहे.

   त्यानुसार ज्या शेतकन्यांना खरेदीसाठी एस एम एस येतील.  त्यांनी वरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे  यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment