Thursday, 10 June 2021

DIO BULDANA NEWS 10.6.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 3978 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 42 पॉझिटिव्ह

  • 339 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4020 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3978 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपीड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 826 तर रॅपिड टेस्टमधील 3152 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3978 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, कोलवड 4,   मलकापूर शहर :1,  मोताळा तालुका : पुन्हई 3,    सिं. राजा तालुका : चिंचोली 2, दोंडगाव 1,   दे. राजा शहर : 1,   दे. राजा तालुका : कुंभारी 1, तुळजापूर 1, पांगरी 1, वाकड 1, किन्ही पवार 1,   खामगांव शहर : 2,     चिखली शहर : 2,  चिखली तालुका : कोलारा 1, काटोडा 1,  शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : मनसगाव 1,     संग्रामपूर शहर : 1, मेहकर तालुका : दे साकर्षा 1, गोमेधर 1, चिंचोली बोरी 1, दुधा 1, मोसंबेवाडी 2,  जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सुनगाव 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, चांदुर बिस्वा 1, लोणार शहर : 1,  लोणार तालुका : परजिल्हा कारंजा ता. बाळापूर 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 339 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 518383 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84719  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  84719 आहे. 

  आज रोजी 1294 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 518383 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85825 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84719 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 466 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 640 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*************

 

गहू, ज्वारी व हरभरा खरेदीला मुदतवाढ

·         30 जुनपर्यंत सुरू राहणार खरेदी

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने गहू व ज्वारी खरेदी 30 जुन पर्यंत सुरु करण्यात आली आहे.  गहू खरेदीसाठी शासनाने 7 हजार 485 क्विंटलचे उदिष्ट व ज्वारी खरेदीसाठी 13 हजार 500 क्विंटलचे उदिष्ट दिलेले आहे.

   तसेच जिल्ह्यामध्ये गहू खरेदीसाठी 254 दोतकऱ्यांनी नोंदणी केलेली असुन ज्वारी खरेदीसाठी 5928 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.  जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा संपन्न झाली असुन त्यानुसार जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी गहू खरेदीसाठी 9 केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच  संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा,  सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कंपनी, सुलतानपुर केंद्र- साखरखेर्डा यांचाही गहू खरेदी केंद्रामध्ये समावेश आहे. तसेच ज्वारी खरेदीसाठी 14 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेची विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपुर, शेगांव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कपनी, सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. चिखली,  माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी देऊळगावराजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र- वाडी या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

  त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यामध्ये उपरोक्त ठिकाणी गहू व ज्वारी खरेदी करण्याचे आदेश दिले आरहे. नाफेडची हरभरा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकरी हरभरा विक्री करण्यासाठी आपली नोंदणी करु शकले नाही. त्यामुळे शासनाने दि. 18 जुनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी वरील संस्थाकडे नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

*****

                             सैनिक मुलांचे वसतिगृह येथे पदभरती

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : सैनिक मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथील वसतिगृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर एक वर्षासाठी रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 50 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे. या पदांमध्ये सहाय्यक वसतिगृह अधिक्षक एक पद असून यासाठी हवालदार व त्यावरील माजी सैनिक आवश्यक आहे. स्वयंपाकीनचे तीन पदे आहेत. यासाठी माजी सैनिकांच्या पत्नीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सफाईवाला हे एक पद आहे. त्याकरीता माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन पाहीजे. चौकीदाराचे एक पद असून त्यासाठी माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन हवा आहे. तरी इच्छूकांनी 16 जुन 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                                                    ********

बालकामगार विरोधी दिनाचे 12 जुन रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या दि. 30 एप्रिल 2008 रोजीच्या निर्देशाप्रमाणे 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून सर्व जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधुन सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला व सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा, यांचे संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

  सदर कार्यक्रमाअंतर्गत विविध आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवण्यात येऊ नये यासाठी आस्थापना मालकांकडुन बाल कामगार कामावर ठेवणार नाही असे हमी पत्र लिहुन घेण्यात येणार आहे. तसेच पोस्टर कॉम्पीटीशन, कलाकारांच्या नजरेतुन बालकामगार अशा विविध कार्याक्रमांसह प्रशासकिय अधिकारी आणि NGO यांच्या समवेत कोविड-१९ चा प्रादुर्भाव बघता ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हयातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था, कारखाने व औद्योगीक आस्थापना मालकांनी, बाल कामगार कामावर ठेऊ नये, असे आवाहन राजु दे. गुल्हाने, सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला व  आ. शी. राठोड , सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

 

*****

 

शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 ते 19 जुनपर्यंत आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांच्या विद्यमाने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतीसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय / म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 ते 19 जून  2021 कालावधीत 5 दिवस दररोज 4 तासादरम्यान केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करावा हा आहे.

  सदर प्रशिक्षण कार्यक्रमात शेळी, कुक्कुट व गाय / म्हैस पालनाचे तंत्र, प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, उद्योग सुरू करण्यासठी संपूर्ण सहकार्य, उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन,   शासकीय योजनांची माहिती आदी प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.  प्रशिक्षणात प्रवेश घेवू इच्छिणारा उमेदवार हा किमान 5 वी पास, वय 18 ते 50 वर्ष असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. तरी प्रशिक्षण नोंदणीसाठी 15 जुन 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, MCED, दुरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा यांच्या 8275093201 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विभागीय अधिकारी योगेश डफाडे यांनी केले आहे.

******

पाणी टंचाई निवारणार्थ 53 विंधन विहीरी ; 23 कुपनलिका मंजूर

* 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना

बुलडाणा, दि‍.10 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील 25, चिखली तालुक्यातील 7, संग्रामपूरमधील 5, जळगांव जामोदमधील 5 व खामगांव तालुक्यातील 5 गावासाठी 53 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच  संग्रामपूर तालुक्यातील 7, जळगांव जामोद तालुक्यातील 5, शेगांव तालुक्यातील 6 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

   विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील सायाळा, आडगांव राजा, केशवशिवणी, किनगांव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, नागझरी, देऊळगांव कोळ, धांदरवाडी, धानोरा, दुसरबीड, हिवरखेड पुर्णा, वर्दडी खु, खामगांव, पिंपळगाव सोनारा, नशिराबाद, सोनोशीा, सुलजगाव, तडेगाव, उमनगाव, वडाळी, वाघजई, चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा, शेलगांव जहागीर, मनुबाई, बोरगाव वसु, खैरव, पांढरदेव, किन्होळा,  संग्रामपूर तालुक्यातील गुमठी, चिचारी, वसाडी नविन, वसाडी जुनी, शिवणी,  जळगांव जामोद तालुक्यातील निमखेडी, प्यारसिंग टपरी, चाळीस टपरी, गोमाळ, मेंढामारी, खामगांव तालुक्यातील हिवरा बु, जळका भडंग, पारखेड, ज्ञानगंगापूर या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर संग्रामपूर तालुक्यातील भोन जुने, भोन नविन, निवाणा, रूधाणा, एकलारा, आलेवाडी, जळगांव जामोद तालुक्यातील चालठाणा, सुनगांव, गोरखनाथ, ईसाई, शेगांव तालुक्यातील आडसूळ, भास्तन, डोलारखेड, घुई, कठोरा, सगोडा  या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment