नांद्राकोळी येथील सोयाबीन शेतीला निविष्ठा व गुणनियंत्रक
संचालकांची भेट
- बिज प्रक्रिया केलेले सोयाबीन पीक व शेडनेटची पाहणी
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे नांद्राकोळी तालुक्यातील सुभाष बाबुराव
राऊत यांचे शेतावर संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 27
जुन 2021 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेडनेटची पाहणी व चर्चा केली. त्यामध्ये
लागवड करण्यात आलेल्या पिकॅडोर मिरची संदर्भत लागवड तंत्र, खत, एकात्मिक किड
व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन, विक्री व्यवस्था या संदर्भात चर्चा व मार्गदर्शन
केले.
तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये भेट देवून
सोयाबीन वाण एम ए यु एस 158 ची पाहणी केली. यावेळी उगवलेले सोयाबीन बिजांकुर हे
निळ्या रंगाचे आढळून आले. या विषयी शेतकऱ्यांशी चर्चेअंती घरच्या सोयाबीन बियाण्याला कार्बनडेन्झीम व
मॅन्कोझेब बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गावामध्ये
कृषी विभागाने घरचे बियाणे वापरणे, उगवण क्षमता चाचणी घेणे व बिज प्रक्रिया मोहीम
राबवून त्याचे महत्व शेतकऱ्यांना पटल्यामुळे गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी बिज
प्रक्रिया करुन सोयाबीन बियाणे पेरणी केल्याचे शेतकरी सुभाष बाबुराव राऊत यांनी
सांगितले.
बिज प्रक्रिया
मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालक यांनी शेतकऱ्यांचे व कृषी सहाय्यक यांचे कौतुक
केले. बुलडाणा उप विभागामध्ये बिजप्रक्रियेची 2411 प्रात्यक्षीके राबविली असून
त्यामध्ये 17000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी
शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. सदर भेटीच्या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी
अनिसा महाबळे, कृषी पर्यवेक्षक आर. जि. देशमुख, आर. टी. पवार, उपसरपंच मनोज जाधव,
ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य कृषी सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे गावातील
इतर शेतकरी उपस्थित होते, असे उपविभागीय कृषी
अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
कोरोना अलर्ट : प्राप्त 3559
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट
किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3569 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3559
अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 24 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश
आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 684 तर रॅपिड टेस्टमधील 2875
अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3559 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल
पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 3, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : पारखेड 2, सुटाळा
1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 3, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, वाढोणा
1, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, किन्ही
2, मलकापूर तालुका : उमाळी 4, बुलडाणा शहर : 2, लोणार तालुका : पळसखेड 1,
किनगांव जट्टू 1, देऊळगांव 1, रायगांव
1, भुमराळा 3, चिखली शहर : 2, चिखली तालुका : मुंगसरी 1, मोताळा तालुका : पुन्हई
1, संग्रामपूर तालुका : बोडखा 1, मेहकर
शहर : 1, परजिल्हा वाडेगांव ता. बाळापूर 1 संशयीत
व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 55 रूग्णांनी
कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली
आहे. तसेच आजपर्यंत 573780
रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85934 कोरोनाबाधीत
रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85934 आहे. आज रोजी 1723 नमुने कोविड
निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 573780 आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 86675 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85934
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय
प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 78 कोरोना बाधीत रूग्णांवर
उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663
कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली
आहे. ******* कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
बुलडाणा,(जिमाका) दि.30 :
रब्बी हंगाम 2020-21 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले
आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकऱ्यांचा सत्कार 1 जुलै 2021 रोजी
कृषी दिनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मंत्रालय, मुंबई येथे
करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील एक शेतकरी झूम
प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या सर्व शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री ना उद्धव
ठाकरे संवाद साधणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अंजनी बु ता. मेहकर येथील
शेतकरी पुरूषोत्तम श्रीपत अवचार यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM
या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी तालुक्यातील दोन पिकांमध्ये
उच्च उत्पादन घेणाऱ्या दोन शेतकरी व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना विशेष उपस्थित
करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि कृषी दिन
कार्यक्रम गुरुवार,दिनांक 1 जुलै रोजी दू. 12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे
आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन लाईव्ह प्रसारण, कृषी विभागाच्या
www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM यूट्यूब चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. तरी
शेतकरी बांधवांनी वरील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कार्यक्रमाचे थेट प्रसारण
पाहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ***** |
No comments:
Post a Comment