DIO BULDANA NEWS 11.5.2021

बुलडाणा डाक विभागात 56 पदांची भरती; 26 मे अर्जाची अंतिम मुदत बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : भारतीय डाक विभागात जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, असि. ब्रँच पोस्टमास्टर, डाकसेवक अशा एकूण पदांची ऑनलाईन भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या कार्यालयातंर्गत जिल्ह्यात 56 पदांची भरती होणार आहे. या पदांविषयी माहिती, नियम व अटी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत 26 मे 2021 आहे, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे. *** पाणी टंचाई निवारणार्थ 40 विंधन विहीरी मंजूर • बुलडाणा तालुक्यातील 25 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना बुलडाणा, (जिमाका) दि.11: पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील 25 गावांमधील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार विंधन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे. विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. गावे व मंजूर विंधन विहीरी : मौंढाळा 1 विंधन विहीर, साखळी बु 2 विंधन विहीर, भादोला 2 विंधन विहीर, देऊळघाट 3 विंधन विहीर, माळविहीर 1 विंधन विहीर, सव 2, तांदुळवाडी 1, उमाळा 1, येळगांव 1, सुंदरखेड 3, इरला 1, भडगांव 1, ढासाळवाडी 1, पिं. सराई 2, सैलानी 2, गुम्मी 2, धाड 2, दुधा 1, चिखला 1, रायपूर 2, अंभोडा 1, घाटनांद्रा 1, पाडळी 2,डोंगरखंडाळा 3 व मासरूळ गावासाठी 1 विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण 40 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या