अत्यावश्यक सेवांमध्ये सवलतीसह कडक निर्बंध लागू
बुलडाणा, (जिमाका) दि 12 : कोविड -19 च्या अनुषंगाने दिनांक 10 मे 2021 ते दिनांक 20 मे 2021 पर्यंत कडक निर्बंधाबाबत आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये सवलती देवून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
पेट्रोलपंप : ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन केवळ शेतक-यांना त्यांच्या शेतातील मशागतीची (नांगरणी, वखरणी, गाळ टाकणे व इत्यादी) कामे तसेच मालाची वाहतुक करण्याकरिता ट्रॅक्ट्रर्सना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. कोर्टाची कार्यालयीन कामे सुरु असल्याने वकीलांना पेट्रोल/डिझेल देण्यात यावे. बँकिंग: रुग्णालये, गॅस वितरण सेवा, ऑक्सीजन पुरवठा, औषधी दुकाने, यांचेकडे तसेच पेट्रोल पंपावरील जमा होणारी रक्कम बँकेत जमा करणे या करिता संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता दिनांक 10 मे ते दिनांक 20 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यानचा वेळ देण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी : दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता) विदयुत पारेषण इत्यादी सेवा सुरळीतपणे राहावी या करिता सदर सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना कामे करता येईल. संबंधित आस्थापना यांनी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्याचे दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतुक व वाटप अनुज्ञेय राहील. हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते दुपारी 12 व रात्री 7 ते रात्री 9 या दरम्यान सुरु राहील. अत्यावश्यक कामकाजाकरिता व कोविड च्या अनुषंगाने कामकाज करण्याकरिता आवश्यक असणारे विभाग/ कार्यालये सुरु राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिले आहे
*****
रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा करावी
- राज्य शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी
बुलडाणा,(जिमाका) दि.12 : राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी दि. 14 एप्रिल पासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून 13 किंवा 14 मे चंद्रदर्शनानुसार रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मात्र सध्या कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना कोरोना रूग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. कोविड या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम 144 लागू आहे. त्यामुळे संचारबंदी कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
--
कोरोना अलर्ट : प्राप्त 4539 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1143 पॉझिटिव्ह
- 456 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5682 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 920 व रॅपीड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 2304 तर रॅपिड टेस्टमधील 2235 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4539 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका : 117, खामगांव शहर व तालुका : 114, शेगांव शहर व तालुका : 74, दे. राजा शहर व तालुका : 82, चिखली शहर व तालुका :79, मेहकर शहर व तालुका : 98, मलकापूर शहर व तालुका : 47, नांदुरा शहर व तालुका :137, लोणार शहर व तालुका : 110, मोताळा शहर व तालुका :62, जळगाव जामोद शहर व तालुका :81, सि.राजा शहर व तालुका :91, संग्रामपूर शहर व तालुका : 51. अशाप्रकारे 1143 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सुटाळा बु खामगांव येथील 65 वर्षीय महिला, बोथाकाजी ता. खामगांव येथील 56 वर्षीय महिला, भालखेड ता. मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष, जळगाव जामोद येथील 80 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 456 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 394659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 68626 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 68626 आहे.
आज रोजी 2996 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 394659 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 73878 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 68626 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4762 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 490 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
****************
महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके
व बियाणे मिनिकीट या घटकासाठी अर्ज करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी दि. २० मे, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. २० मे, २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. शेतकरी बांधवांनी mahadbtit या पोर्टलवर अर्ज करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके राबविण्यात येत आहे.
जिल्ह्याकरीता कडधान्य पिके, तृणधान्य, गळीत धान्य, व्यापारी पिके (कापूस), बियाणे वितरण केलेल्या जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. २०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रती किलो. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. 5०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. २५/- प्रती किलो. संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. १००/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. ३०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. 15/- प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षाचे वाणास रु.१२/- प्रती किलो. एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
सोयाबीन,बाजरी,ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. बियाणे मिनिकीट मध्ये जिल्ह्यात तूर, मूग, उडीद या पिकासाठी असणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४ किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशी आहे मिनीकीट
तूर - रु. ४१२/- प्रती ४ किलो मिनिकीट, मुग - रु. ४०७/- प्रती ४ किलो मिनिकीट, उडीद - रु. ३४९/- प्रती ४ किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.
No comments:
Post a Comment