Thursday, 27 May 2021
DIO BULDANA NEWS 27..2021
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन
• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे
• 30 मेपर्यंत चालणार मेळावे
बुलडाणा,(जिमाका)दि.27 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 मे 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www. mahaswayam.gov.in व www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.
या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना रोजगार संधी सोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण वेबिनार द्वारे करण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन समारंभ 27 मे 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता. आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 3533 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 338 पॉझिटिव्ह
• 766 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3871 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3533 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 338 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 251 व रॅपीड टेस्टमधील 87 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1512 तर रॅपिड टेस्टमधील 2021 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3533 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 27, बुलडाणा तालुका : पळसखेड 1, साखळी 1, येळगांव 2, अजिसपूर 2, सागवन 2, सुंदरखेड 3, पांगरी 1, जांभरून 1, नांद्राकोळी 4, दहीद 1, अंत्री तेली 1, रूईखेड 1, रायपूर 2, गोंधनखेड 1, मातला 1, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : सारोळा पीर 6, मोलखेड 1, वाघजळ 1, गुगळी 1, लोणघाट 1, पिं. नाथ 2, गिरोली 1, कोथळी 2, इब्राहिमपूर 6, बोराखेडी 1, घुसर 1, खामखेड 3, रोहीणखेड 1, कोल्ही गवळी 1, चिंचखेड 1, वरूड 1, राजूर 1, महाल पिंप्री 1, धा. बढे 1, खामगांव शहर :15, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, पिं. राजा 1, कवडगांव 1, घारोड 1, कारेगांव 1, बोथा 2, पिं. गवळी 1, नांद्रा 1, वर्णा 2, उंबरा 1, हिवरखेड 1, पारखेड 1, नायदेवी 1, शेगांव शहर :20, शेगांव तालुका : तिंत्रव 4, पहुरजिरा 2, बोंद्री 3, जवळा 2, तिव्हाण 1, तरोडा 4, सांगवा 1, सवर्णा 1, खातखेड 1, माटरगांव 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : इसोली 1, डोंगर शेवली 1, हातनी 1, लोणी 1, सावरगांव डु 1, धोत्रा भणगोजी 1, मेरा बु 4, चांधई 1, कोलारा 2, येवता 1, कोनड 1, मलकापूर शहर : 8, मलकापूर तालुका : वरखेड 2, लासूरा 2, माकनेर 1, रणगांव 1, वडजी 1, दे. राजा शहर : 14, दे. राजा तालुका : सावखेड भोई 2, उंबरखेड 3, नंदखेड 1, किन्ही 1, सातेगांव 2, पिंपळगांव 1, टाकरखेड भा 1, नागणगांव 1, पांगरी 4, साठेगांव 1, सिनगांव जहा 4, गिरोली 1, कुंभारी 2, शिराळा 1, अंढेरा 1, जवळखेड 1, गोंधनखेड 2, कुंबेफळ 2, संग्रामपूर शहर : , संग्रामपूर तालुका : वानखेड 1, पळशी 1, धामणगाव 1, वरवट 2,
सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : विझोरा 1, झोटींगा 3, आगेफळ 2, धंदरवाडी 1, आंचली 1, असोला 1, बोराखेडी 2, डावरगांव 4, रूमना 1, वडाळी 1, शेंदुर्जन 1, सुलजगांव 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, जानेफळ 3, चोंढी 1, भोसा 1, मुलखेड 1, वर्दडी 2, मोहदरी 1, शहापूर 1, बोरी 1, जळगांव जामोद शहर : , जळगांव जामोद तालुका : पळशी सुपो 1, अकोला खु 2, पि. काळे 3, वडगांव गड 1, सुनगांव 3, काजेगांव 1, गाडेगांव 1, झाडेगांव 1, खांडवी 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : वसाडी 1, टाकरखेड 1, वडगांव डिघी 1, गाडेगांव 1, लोणवडी 1, हिंगणा बाळापूर 1, बरफगाव 1, शेलगांव मुकुंद 1, आमसरी 2, इसापूर 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : उटी 1, कोलखेड 1, साखरा 1, वढव 2, चिखला 2, सोमठाणा 1, दे. कोळ 1, भुमराळा 1, परजिल्हा सोयगांव 1, खरगोन (मध्य प्रदेश) 1, बाळापूर 3, तेल्हारा 1, अकोला 1, दर्यापूर 1, जाफ्राबाद 1, सेनगांव जि. हिंगोली 1, पातुर 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 338 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पारखेड ता. खामगांव येथील 65 वर्षीय महिला, जुनागांव बुलडाणा येथील 67 वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला, गजानन नगर चिखली येथील 33 वर्षीय पुरूष, चांडोळ ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला, मंगरूळ ता. चिखली येथील 71 वर्षीय महिला, नांदुरा येथील 27 वर्षीय महिला, म्हसला ता. बुलडाणा येथील 30 वर्षीय महिला व मिस्कीनवाडी ता. मेहकर येथील 53 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 766 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 465282 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 79379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 79379 आहे.
आज रोजी 2093 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 465282 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84070 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 79379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4102 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 589 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment