Thursday, 20 May 2021
DIO BULDANA NEWS 20.5.2021
कोरोना अलर्ट : प्राप्त 4946 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 591 पॉझिटिव्ह
• 759 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4946 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 591 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 367 व रॅपीड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 952 तर रॅपिड टेस्टमधील 3994 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4946 अहवाल निगेटीव्ह आहेत.
तालुका निहाय पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, साखळी खु 1, सुंदरखेड 1, पिं. सराई 2, चांडोळ 2, करडी 2, देवपूर 1, वरूड 1, धाड 4, शिरपूर 1, डोंगर खंडाळा 1, हतेडी 2, केसापूर 1, सागवन 1, खुपगांव 1, इजलापूर 1, कुलमखेड 1, पाडळी 1, वरवंड 1, रायपूर 1, मोताळा तालुका : लिहा 1, पिं देवी 2, दाभाडी 1, घुसर 1, उबाळखेड 5, चावर्दा 1, खामगांव शहर :21 , खामगांव तालुका : भालेगांव 1, पारखेड 2, वर्णा 1, पळशी बु 1, शिरजगांव दे 3, नायदेवी 1, टेंभुर्णा 1, उमरा 1, करमाळा 2, राजनखेड 1, माळेगांव 1, शेगांव शहर :32, शेगांव तालुका : चिंचोली 2, पहुरजिरा 5, आडसूळ 2, पहुरपूर्णा 1, जलंब 1, जोगलखेड 1, गायगाव 4, जवळा 1, तिंत्रव 1, भास्तन 19, वरूड 1, नागझरी 1, शिरसगांव निळे 1, कळंबी 2, टाकळी धारव 2, बोंद्री 2, मच्छींद्रखेड 1, चिखली शहर : 25, चिखली तालुका : किन्होळा 3, मेरा बु 6, बोरगांव काकडे 1, करणखेड 1, शेलूद 1, भालगांव 1, पिं. उंडा 1, पेठ 1, दे. घुबे 1, लोणी लव्हाळा 2, चांधई 1, करतवाडी 1, वळती 1, वर्दडा 2, माळशेंबा 1, वाडी 1, मेरा खु 1, किन्ही सवडत 1, जांभोरा 1, मलकापूर शहर :17 , मलकापूर तालुका : भाडगणी 3, लासुरा 1, झोडगा 3, वाघुड 12, वरखेड 2, माकनेर 2, लोणवडी 3, बेलाड 1, मोरखेड 1, तांदुळवाडी 3, दे. राजा शहर :2 , दे. राजा तालुका : पिंपळगांव 1, निमखेड 1, सावखेड भोई 1, सिनगांव जहा 1, अंभोरा 2, जांभोरा 1, अंचरवाडी 1, दे. मही 2, निमागांव वायाळ 1, असोला 1,
सिं. राजा शहर :3 , सिं. राजा तालुका : लिंगा 1, गुंज 4, साखरखेर्डा 1, ताडेगांव 2, रूमना 3, चांगेफळ 1, देवखेड 1, सेलू 3, पिं. लेंडी 1, बोरखेडी 1, हिवरा गडलिंग 2, पिं. सोनारा 1, मेहकर शहर :5 , मेहकर तालुका : डोणगांव 1, लोणी 5, गजरखेड 1, आरेगाव 1, भोसा 14, मिस्कीनवाडी 4, नागझरी 1, बाऱ्हई 1, करंजी 1, घाटबोरी 1, लोणी गवळी 1, सोमठाणा 2, मारोती पेठ 1, शहापूर 3, हिवरा साबळे 1, थार 2, कळपविहीर 1, हिवरा आश्रम 1, अंजनी 1, मुंदेफळ 1, उमरा दे. 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : कथरगांव 1, काकनवाडा 4, वरवट 2, पळशी 4, काटेल 1, चौंढी 1, शेवगा 6, सगोडा 1, चांगेफळ 2, जस्तगांव 1, दानापूर 1, सोनाळा 2, टुनकी 1, वसाडी 1, बोरखेड 2, बावनबीर 1, उमरा 1, वानखेड 1, तिवाण 1,
जळगांव जामोद शहर :12, जळगांव जामोद तालुका : मांडवा 5, पिं. काळे 1, वडशिंगी 3, वडगाव गड 1, सुनगाव 3, मि. गवळी 1, इलोरा 1, चावरा 3, धानोरा 1, खांडवी 1, खेर्डा 1, करणवाडी 1, हिंगणा नवे 1, भेंडवळ 2, मडाखेड 1, कुरणगड 7, निंभोरा 12, नांदुरा शहर :13, नांदुरा तालुका : पिं. खुटा 2, खडतगांव 1, दादगांव 1, सावंगा 1, पिं. देशमुख 2, शेंबा 1, पातोंडा 1, महाळुंगी 3, शेलगांव मुकूंद 1, फुली 1, तिकोडी 1, खैरा 3, पिं. अढाव 1,निमगांव 2, मामुलवाडी 1,माहुली 1, पलसोडा 1, वळती 4, लोणार शहर :5 , लोणार तालुका : पळसखेड 2, शारा 3, चिखला 4, दाभा 1, दे. कोळ 3, सरस्वती 2, सोमठाणा 1, कारेगांव 1, वडगांव 2, पिं. खुटा 1, टिटवी 3, पिंपळनेर 3, आरडव 1, वडगांव तेजन 2, सुलतानपूर 1, परजिल्हा बाळापूर 8, अकोला 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 591 रूग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पारपेठ मलकापूर येथील 50 वर्षीय महीला, एकलारा ता. शेगाव येथील 60 वर्षीय महिला, सुनगांव ता. जळगांव जामोद येथील 55 वर्षीय पुरूष व मेहकर येथील 44 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 759 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 436175 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 74668 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 74668 आहे.
आज रोजी 3398 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 436175 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 80535 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 74668 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5331 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 536 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***************
कोविड १९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी
जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना
बुलडाणा,(जिमाका) दि.20 : कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व बालकांचे संरक्षण करण्यासठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली आहे. शासन निर्णयास अनुसरून जिल्ह्यात या कृती दलाची जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली.
याबाबत टास्क फोर्सची गुगल मीटच्या माध्यमातून १९ मे रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आई वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचा व ज्यांचे आई वडील किंवा पालक कोरोना या आजाराच्या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल असून निवारा आणि मदतीची अत्यावश्यक गरज आहे अशा बालकांचा शोध घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले जिल्ह्यात अशा बालकांसाठी ० ते ०६ या वयोगटासाठी शिशुगृह व ०६ ते १८ वयोगटासाठी बालगृह निश्चित करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले. संकटात सापडलेल्या अशा बालकांची माहिती चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर देण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
तसेच बालकांच्या संविधानिक व बाल हक्कांच्या संरक्षणासाठी कृती दलामार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस विभाग यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णालये, खाजगी दवाखाने तसेच कोविड सेन्टर येथे महिला व बाल विकास विभागाचे मदत क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे आवाहन या कृती दला मार्फत करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी कोरोना काळात संकटात सापडलेल्या बालकांची माहिती खालील क्रमांकावर द्यावी. इतर संस्था, व्यक्ती किंवा खोट्या संदेशांना बळी पडू नये. दोन्ही पालक मृत्यू पावलेले व ज्यांना अत्यावश्यक निवाऱ्याची गरज आहे, अशा बालकांची माहिती तात्काळ नजीकच्या जिल्हा बाल कल्याण समितीला व चाईल्ड लाईन टोल फ्री १०९८ क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बालकांसाठी जिल्हा स्तरावर कार्यरत यंत्रणा
चाईल्ड हेल्प लाईन १०९८ (२४ तास), महिला व बालविकास विभाग मदत संपर्क - ८३०८९९२२२२ / ७४०००१५५१८, बाल कल्याण समिती बुलडाणा - ८३८०९४०७७८, ८८०५५२०३०८, ९४२३७४८०१९, ९४२१६५५७१४५, बालगृह- ९९६०३३८०००, शिशुगृह- ९४२२८८१९३२, ७४९८५४३६३५, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ८९७५६००६३१, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बुलडाणा – ९४२१५६६८३४.
********
रूग्णवाहिकांचे दर निश्चित; अवाजवी दर आकारल्यास कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रूग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रूग्ण वाहिका धारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्यया तक्रारी येत आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडून रूग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा रूग्णवाहिका धारकाने जादा दर आकारल्यास तात्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी mh28@mahatranscom.in वर तक्रार नोंदवावी.
त्याचप्रमाणे सर्व रूग्णवाहिका धारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये रूग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाईल क्रमांक, आकारलेले भाडे व रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. सदर भाडे दरपत्रक रूग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकास बंधनकारक आहे. खाली दिलेल्या भाडे दरापेक्षा जास्त दर आकरणी करणाऱ्या वाहन मालकावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांचे आदेशानुसार प्रस्तावीत दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
असे आहे अधिकृत दर
रूग्ण्वाहिका (चार चाकी करीता) :
भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी पर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर, विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1000 रूपये प्रति कि.मी 4 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे,
भाडे दर 12 तास / 80 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी च्या वरचे प्रति कि.मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1600 रूपये प्रति कि.मी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1700 रूपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे,
भाडे दर 24 तास / 120 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 2400 रूपये प्रति कि.मी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2500 रूपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे
रूग्ण्वाहिका (सर्व सुविधा उपलब्ध असणारी) :
भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी पर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर, विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 2100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2100 रूपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे,
भाडे दर 12 तास / 80 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी च्या वरचे प्रति कि.मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 3100 रूपये प्रति कि.मी 38.75 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 3100 रूपये प्रति कि. मी 38.75 रूपये प्रमाणे,
भाडे दर 24 तास / 120 कि.मी साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी च्या वरचे प्रति कि. मी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 4600 रूपये प्रति कि.मी 38.75 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 4600 रूपये प्रति कि. मी 38.75 रूपये प्रमाणे दर असतील.
00000
जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 422 रेमडेसिवीरचे वितरण
बुलडाणा, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 मे रोजी 422 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली.
आज 20 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 15, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 6, निकम हॉस्पीटल 7, जाधव पल्स हॉस्पीटल 0, सहयोग हॉस्पीटल 10, आशिर्वाद हॉस्पीटल 25, सिद्धीविनायक हॉस्पीटल 12, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 0, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 2, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 1, सुश्रुत हॉस्पिटल 3, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 8 , रेड्डी हॉस्पीटल 0, कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 6, चिखली : योगीराज हॉस्पीटल 30, हेडगेवार हॉस्पीटल 5, गुरूकृपा हॉस्पीटल 0, तायडे हॉस्पीटल 19, दळवी हॉस्पीटल 21, पानगोळे हॉस्पीटल 15, खंडागळे हॉस्पीटल 10, गंगाई हॉस्पीटल 0, जैस्वाल हॉस्पीटल 10, ओम गजानन हॉस्पिटल 4, सावजी हॉस्पीटल 23, अनुराधा मेमोरियल 10, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 4, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 7, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 8, आशिर्वाद हॉस्पीटल 2, सिटी केअर 9, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 20, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 20, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 10, शामसखा हॉस्पीटल 13, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 9, चव्हाण 7, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 16, साई 0, झिऑन हॉस्पीटल 2, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 0, मापारी हॉस्पीटल 0, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 5, गोविंद क्रिटीकल 9, श्री. गजानन हॉस्पीटल 0, अजंता हॉस्पीटल 2, मेहकर मल्टीस्पेशालीटी 0, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 2, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 2, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 8, मी अँड आई हॉस्पीटल 5, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 0, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 4, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 0, असे एकूण 422 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.
*******
पाणी टंचाई निवारणार्थ दोन गावांसाठी टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि.20 : बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड व नांदुरा तालुक्यातील कोलासर, सांगवा या दोन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सुंदरखेड येथील 13317 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 2 लक्ष 62 हजार 940 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. कोलासर, सांगवा येथील 934 लोकसंख्येसाठी एक टँकर 18 हजार 680 लीटर पाणी पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा व मलकापूर यांनी कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment