Tuesday, 25 May 2021
DIO BULDANA NEWS 25.5.2021
खत विक्रेत्यांनी जुन्याच दरांनी खत विक्री करावी
कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. माहे एप्रिल 2021 पासून युरीया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहे. तरी काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.
ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारीत दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अरूण इंगळे यांच्या 7588619505 आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा येथील विजय खोंदील यांच्या 7588041008 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
असे आहेत रासायनिक खत कंपनीचे सुधारीत विक्री दर (प्रति बॅग 50 किलो)
खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको 1200 रू, जीएसएफसी 1200 रू, जय किसान 1200 रू, कोरोमंडल 1200 रू, महाधन 1200 रू, कृभको 1200 रू, 10:26:26 - इफ्फको 1175 रू, जीएसएफसी 1175 रू, जय किसान 1375 रू, कोरोमंडल 1300 रू, महाधन 1390 रू, कृभको 1300 रू, 12:32:16 - इफ्फको 1185 रू, जीएसएफसी 1185 रू, जय किसान 1310 रू, महाधन 1370 रू, कृभको 1310 रू, 20:20:0:13 - इफ्फको 975 रू, जय किसान 1090 रू, कोरोमंडल 1050 रू, आरसीएफ 975 रू, महाधन 1150 रू, कृभको 1050 रू, 19:19:19 - जय किसान 1575 रू. 28:28:00 - जय किसान 1475 रू, कोरोमंडल 1450 रू, 14:35:14 - जय किसान 1365 रू, कोरोमंडल 1400 रू, 24:24:0:85 - कोरोमंडल 1500 रू, महाधन 1450 रू, 15:15:15:09 - कोरोमंडल 1150 रू, 16:20:0:13 – कोरोमंडल 1000 रू, 15:15:15 – आरसीएफ 1060 रू, 14:28:00 – महाधन 1280 रू, 16:16:16 – महाधन 1125 रू, MOP - कृभको 850 रूपये.
*****
कोरोनाबाधीतांसाठी गृह अलगीकरण नाहीच; संस्थात्मक अलगीकरणाचा पर्याय
जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील कोविड 19 बाधीत रूग्ण आढळून येत आहे. सदर रूग्ण गृह अलगीकरण झाल्यानंतर अलगीकरणात न राहता गावात मुक्त संचार करीत असल्याने गा्रमीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड बाधीत रूग्ण आढळून येत असून रूग्ण गंभीर होत आहेत. त्यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना ग्रामीण भागामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबत निर्देशीत करण्यात आले.
त्यांच्याद्वारे ग्रामीण भागात आयसोलेशन केंद्र उभारून कार्यान्वीत करण्यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपायोजनेचा भाग म्हणून शहरी व ग्रामीण भागातील ज्या कोविड बाधीत रूग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना गृह अलगीकरण हा पर्याय न देता त्यांना सोयीस्कर अशा संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही स्वरूपात गृह अलगीकरण राहण्याकरीता परवानगी देण्यात येवू नये. जेणेकरून कोविड बाधीत रूग्णांपासून इतरांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस रामामूर्ती यांनी दिले आहे.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 4769 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 478 पॉझिटिव्ह
615 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5247 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4769 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 478 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 320 व रॅपीड टेस्टमधील 158 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1114 तर रॅपिड टेस्टमधील 3655 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4769 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :29, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 4, कोलवड 1, दुधा 1, अंत्री तेली 1, चांडोळ 1, दे. घाट 1, म्हसला 1, पिंपरखेड 1, रायपूर 1, मोताळा शहर :1 , मोताळा तालुका : सिंदखेड 1, माकोडी 1, लपाली 1, लिहा 1, पिं. नाथ 2, तांदुळवाडी 1, बोराखेडी 1, डिडोळा 3, अंत्री 1, किन्होळा 2, कोऱ्हाळा 1, पान्हेरा 1, खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : लोणी गुरव 1, अंबोडा 4, हिवरखेड 1, पारखेड 2, नागापूर 1, अटाळी 1, जनुना 1, पिं. राजा 1, शेगांव शहर : 11, शेगांव तालुका : जवळा 2, भोनगांव 1, खेर्डा 1, जवळा 2, दगडखेड 2, माटरगांव 1, भास्तन 1, पहुरजिरा 1, चिखली शहर :26, चिखली तालुका :किन्होळा 2, येवता 1, बोरगांव काकडे 2, दहीगांव 1, मेरा बु 2, लोणी लव्हाळा 1, उंद्री 1, सावरखेड 1, मंगरूळ 2, कनारखेड 1, कव्हाळा 4, टाकरखेड मु 1, मेरा खु 2, चांधई 1, खोर 2, बेराळा 1, अंचरवाडी 1, तेल्हारा 1, सावरगांव डु 2, वळती 4, शिंदी हराळी 1, काटोडा 2, मलकापूर शहर : 11, मलकापूर तालुका : वडोदा 1, वाकोडी 2, घिर्णी 1, वाघुड 2, धोंगर्डी 4, भाडगणी 3, वडजी 1, उमाळी 3, वरखेड 1, माकनेर 1, दे. राजा शहर :5, दे. राजा तालुका : दिग्रस 1, शिवणी आरमाळ 1, सावखेड नागरे 2, असोला 1, कुंभारी 1, पांगरी 2, दे. मही 3, बायगांव 1, सरंबा 1, अंढेरा 1, गुंजाळा 2, संग्रामपूर शहर : 4, संग्रामपूर तालुका : धामणगाव 1, वरवट 6, पळशी 9, वडगांव 1, चोंढी 1, काहोडी 1, अकोली 2, निवाणा 40, चांगेफळ 1, उमरा 3, काकनवाडा 1, मारोड 13, दानापूर 3, मनार्डी 1, काकनवाडा 1, मोमीनाबाद 1, जस्तगांव 1, खिरोडा 1, दुर्गादैत्य 5, वानखेड 5, आवार 1, पलसोडा 2,
सिं. राजा शहर :2 , सिं. राजा तालुका : बाळसमुद्र 1, दुसरबीड 1, साखरखेर्डा 4, ताडशिवणी 1, आंचली 1, बोरखेडी 1, रूमना 1, असोला 1, मलकापूर पांग्रा 1, रताळी 1, वाघाळा 1, शेंदुर्जन 1, गुंज 1, मेहकर शहर :5 , मेहकर तालुका : डोणगांव 2, रायपूर 1, पाथर्डी 1, अकोला ठाकरे 2, बोरी 3, कल्याणा 3, लव्हाळा 2, अंजनी बु 1, नायगांव दे. 1, लोणी 1, आरेगांव 1, खामखेड 1, कोयाळी 1, गोहेगांव 1,धोडप 1, जानेफळ 2, चौंढी 2, आंध्रुड 2, गोभणी 1, मोहना 1, विश्वी 10, भोसा 12, जळगांव जामोद शहर : 9, जळगांव जामोद तालुका : हिंगणा बाळापूर 1, निंभोरा 1, वडशिंगी 1, सुलज 1, आसलगांव 1, वडगांव गड 2, जामोद 6, पिं. काळे 9, हिंगणा 1, हाशमपूर 2, चावरा 2, नांदुरा शहर :7, नांदुरा तालुका : मामुलवाडी 1, महाळुंगी 1, पोटळी 1, वाडी 1, दादगांव 1, निमगांव 2, वडाळी 1, खुरकुंडी 1, वसाडी 1, अंबोडा 1, धानोरा 1, लोणार शहर : 6, लोणार तालुका : शारा 1, जांभूळ 1, चिखला 9, सरस्वती 1, टिटवी 2, बिबी 1, कि. जट्टू 1, परजिल्हा मोलखेडा ता. सोयगांव 1, बाळापूर 2, अकोला 2, रिसोड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 478 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वडशिंगी ता. जळगांव जामोद येथील 54 वर्षीय महिला, लाखनवाडा ता. खामगांव येथील 38 वर्षीय पुरूष, मलकापूर पांग्रा ता. सिं. राजा येथील 83 वर्षीय पुरूष, मिर्झा नगर बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष, चिखली येथील 75 वर्षीय महिला व शिवनगर नांदुरा येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 615 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 456297 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 78109 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 78109 आहे.
आज रोजी 2733 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 456297 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 83241 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 78109 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4559 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 573 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment