Thursday, 18 March 2021
DIO BULDANA NEWS 18.3.2021
बुलडाण्यात कोविड रूग्णांसाठी जम्बो हॉस्पीटल उभारणार
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
प्रत्येक तालुक्याला कॉर्डीयाक ॲम्बुलन्सची सुविधा देणार
चार ठिकाणी ऑक्सीजन टँकची उभारणी करावी
बुलडाणा, (जिमाका) दि 18 : कोविड साथरोग आजाराचे वाढते रूग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड साथरोगावर नियत्रण मिळविण्यासाठी व रूग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पीटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दे. राजा, मलकापूर, खामगांव व शेगांव येथे ऑक्सीजन टँक उभारण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, या ठिकाणी कोविड रूग्णांची संख्या बरीच असते. त्यामुळे या चारही ठिकाणी शासकीय रूग्णांलयामध्ये ऑक्सीजन टँकची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून तेथील रूग्णांना गरजेनुसार तातडीने ऑक्सीजन उपलब्ध करून देता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्डीयाक रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजूरातीसाठी पाठवावा. कोविड रूग्णांवर प्रभावी असलेले रेमेडेसिवीर इंजेक्शनचे दर नियंत्रणात ठेवावे. या इंजेक्शनचे दर 1100 ते 1200 रूपयादरम्यान नियंत्रणात ठेवावे. जिल्ह्यात पुढील रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता ऑक्सीजन बेड व अन्य आरोग्यविषयक सुविधा तयार ठेवाव्या. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
ते पुढे म्हणाले, हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालयासाठी मनुष्यबळाचा आकृतीबंध तयार करून पाठवावा. त्याला मंजूरात घेता येईल. सध्या कोविड तपासणीचा वेग चांगला आहे. त्यासाठी कॅम्प घेणे, सुपर स्प्रेडरचा शोध घेणे आदी कारणे महत्वाची आहेत. तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याच धर्तीवर आता लसीकरणासाठी काम करावे. कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचा अवलंब करीत शिबरे आयोजित करून लसीकरण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाचा आढावा नियमितरित्या घेण्यात यावा. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.
*****************
कोरोना अलर्ट : प्राप्त 5193 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 885 पॉझिटिव्ह
• 433 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 6096 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 885 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 435 व रॅपीड टेस्टमधील 450 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 655 तर रॅपिड टेस्टमधील 4538 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 5193 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका : 119, खामगांव शहर व तालुका : 129, शेगांव शहर व तालुका : 31, दे. राजा तालुका व शहर : 85, चिखली शहर व तालुका : 51, मेहकर शहर व तालुका : 10, मलकापूर शहर व तालुका : 124, नांदुरा शहर व तालुका : 85, लोणार शहर व तालुका : 26, मोताळा शहर व तालुका : 32, जळगांव जामोद शहर व तालुका : 87, सिं. राजा शहर व तालुका : 92 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 14 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 885 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 433 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 172451 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23116 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23116 आहे.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 172451 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 27805 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 23116 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4460 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 229 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
********
पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
बोथाकाजी आरोग्य केंद्राला दिली अकस्मात भेट
बुलडाणा,(जिमाका) दि.18 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 17 मार्च 2021 रोजी खामगांव तालुक्यातील बोथाकाजी प्राथमिक आरोग्य केंद्राला अकस्मात भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य व्यवस्थांची पाहणी केली. तसेच लसीकरण कक्षामध्ये लसींचा साठा, सुरू असलेले लसीकरण याबाबत माहिती पालकमंत्री यांनी घेतली. लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणून लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सुचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या. येथील बाह्य रूग्ण विभाग, आंतर रूग्ण विभाग, औषध भांडार आदींचीही पाहणी केली. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment