Sunday, 7 March 2021

DIO NEWS BULDANA 7.3.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1568 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 379 पॉझिटिव्ह

  • 338 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1947 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1568 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 379 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 274 व रॅपीड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 875 तर रॅपिड टेस्टमधील 693 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1568 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव तालुका : गौलखेड 1, घुई 1, चिंचोली 13,  शेगांव शहर : 20, बुलडाणा शहर : 40, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 3, तांदुळवाडी 1, पळसखेड भट 1,  चिखली शहर : 28,  चिखली तालुका : लोणी लव्हाळा 1, अमडापूर 2, किन्होळा 1,  शेलगांव 1, चांधई 1, सवणा 1, मेरा 1, शिरपूर 2,  खामगांव शहर : 28, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बु 1, आडगांव 2,  श्रीधर नगर 12, विहीगांव 1, हिवरखेड 9, टेंभुर्णा 3,  नांदुरा शहर : 32, नांदुरा तालुका : विटाळी 4, कोळंबा 1, तरवाडी 2, शेंबा 1, वडनेर 5, मलकापूर शहर : 21, मलकापूर तालुका : कुंड खु 2, वडजी 1, वाघोळा 1, विवरा 17, दाताळा 1,  तालवाडा 6, दे. राजा तालुका : आळंद 1, अंढेरा 3, कुंभारी 2, सुरा 2, सिनगांव जहागीर 4, नारायणखेड 1, जांभोरा 1, निमखेड 1, दगडवाडी 2, पिंपळगांव 1, दे. मही 4, पिंप्री नंदाळे 2,     दे. राजा शहर : 18, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, गाडेगां खु 1,  मोताळा तालुका : पिं. देवी 14, धा. बढे 4, पोफळी 1, गोतमारा 4, गोलर 2, पि. गवळी 7, मोताळा शहर : 2, सिं. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : जऊळका 1, दुसरबीड 3, शिवणी टाका 1, सवडत 1, शेलगांव काकडे 1,  मलकापूर पांग्रा 1, सुजलगांव 1,   रताळी 3, मेहकर तालुका : अंत्री देशमुख 1, जानेफळ 2, हिवरा साबळे 1,  लोणार शहर : 1, लोणार तालुका : असोला 1,  मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 1,      यवतमाळ 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 379 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील 72 वर्षीय महिला, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 338 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 16, सिद्धीविनायक हॉस्पीटल 13,  अपंग विद्यालय 42, मुलींचे वसतीगृह 1,  दे. राजा : 37, चिखली : 21, मेहकर : 43, नांदुरा : 44, जळगांव जामोद : 9,  सिं. राजा : 4, संग्रामपूर : 4,  मलकापूर : 26, लोणार : 10, खामगांव : 41, शेगांव : 26,     

   तसेच आजपर्यंत 149305 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18435 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 18435 आहे. 

  आज रोजी 7581 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 149305 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 21304 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 18435 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2669 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 200 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

***********

कोविड केअर सेंटरवरील सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा

-    पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि 7 : जिल्हयात रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. दिवसागणिक रूग्णांची वाढ दिसून येत आहे. ग्रामीण भागातही रूग्ण वाढलेले दिसतात. या पार्श्वभूवीर जिल्हयातील सर्व कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने सुरू करावे. कोविड केअर सेंटरवर असणाऱ्या सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

  कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेतना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

  यावर्षी होणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रदद करावे. कुठेही यात्रा आयोजित करण्यात येवू नये.  ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याठिकाणी असलेले तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी टाकावी. रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचणी वाढववावी. तसेच परराज्यातून येणाऱ्या  प्रवाशांची योग्य तपासणी करावी. कोविड केअर सेंटरवर रुग्ण असो की नसो  कर्मचारी कार्यरत ठेवावे. येत्या तीन दिवसात बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच हिवरा आणि नांदुरा येथील सीसीसी सेंटर तातडीने सुरू करावे.

   ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. भविष्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे यंत्रणेने तयारीत राहावे, लस घेतली म्हणजे कोविड संसर्ग नियमांपासून दूर पळू नये.  त्यामुळे लस घेणाऱ्याने देखील त्रिसूत्रींचा अवलंब करावा, तसेच सर्व जनतेने देखील त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच रक्त पुरवठा, लसीकरणाचा आढावाही घेतला. लसीकरण करताना उन्हाळयाचे दिवस असल्याने लसीकरणासाठी वयोवृद्ध लोक येणार असून त्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये. लसीकरण ठिकाणी पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

 *****************

         जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्रांची व्यवस्था

  • प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र

बुलडाणा, (जिमाका) दि 7 : जागतिक महिला दिनानिमित्ताने 8 मार्च रोजी आरोग्य विभागाने महिलांचा विशेष सन्मान करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विभागाने कोविड लसीकरणाला येणाऱ्या महिलांकरीता विशेष केंद्रांची व्यवस्था केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने या केंद्रांवर शासनाच्या निकषांनुसार  60 वर्षावरील व 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ घेवून पात्र महिला लाभार्थ्यांनी मोठया प्रमाणावर  लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

   बुलडाणा तालुक्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष लसीकरण सत्र असणार आहे. तसेच चिखलीसाठी ग्रामीण रूग्णालय चिखली, दे. राजा तालुक्याकरीता ग्रामीण रूग्णालय दे. राजा, जळगांव जामोद तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मडाखेड, खामगांवसाठी सामान्य रूग्णालय खामगांव, लोणार तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुलतानूपर येथे विशेष लसीकरण सत्र असणार आहे. मलकापूर तालुक्याकरीता उपजिल्हा रूग्णालय मलकापूर येथे, मेहकरसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांव, मोताळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी, नांदुरा तालुक्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा, शेगांव तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आडसूळ येथे, संग्रामपूर तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा आणि सिं. राजा तालुक्यासाठी ग्रामीण रूग्णालय सिं. राजा येथे महिलांना लसीकरणाचे सत्र असणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे यांनी कळविले आहे.

                                                                                         ***********    

--

No comments:

Post a Comment