Tuesday, 16 March 2021

DIO BULDANA NEWS 16.3.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 2264 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 567 पॉझिटिव्ह 514 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.16: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2831 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2264 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 567 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 359 व रॅपीड टेस्टमधील 208 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 701 तर रॅपिड टेस्टमधील 1563 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2264 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 71, बुलडाणा तालुका : करडी 4, सागवन 1, सुंदरखेड 4, दुधा 8, कुबेफळ 1, ढालसावंगी 1, धाड 6, वालसावंगी 1, कोलवड 1, उबाळखेड 1, चिखली शहर : 32, चिखली तालुका : वैरागड 1, खैरव 2, सातगांव भुसारी 1, शेलगांव जहा 1, दहीगांव 1, किन्होळा 1, मंगरूळ नवघरे 1, उंद्री 1, नागणगांव 1, खंडाळा 1, गांगलगांव 4, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : डिडोळा 1, तारापूर 3, निपाणा 2, आव्हा 1, शेलगांव बाजार 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : हिरडव 1, सुलतानपूर 8, पळसखेड 1, संग्रामपूर तालुका : वानखेड 5, मनार्डी 2, शेवगा 2, हिंगणा 11, बाभुळखेड 1, खामगांव शहर : 108, खामगांव तालुका : लाखनवाडा 2, सुटाळा 4, काक्ता 1, टेंभुर्णा 1, गोंधनपुर 1, आवार 1, पिंप्री गवळी 2, पिं. राजा 1, शिरसगांव दे 1, हिवरखेड 1, शेलोडी 14, शिर्ला नेमाने 1, पोरज 1, हिवरा बु 2 नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : शेंबा 2, जवळा बाजार 1, वळती 1, पिंप्री अढाव 1, पातोंडा 1, निमगांव 1, टाकरखेड 2, खैरा 1, निमखेड 1, बरफगांव 1, मलकापूर शहर : 23 , मलकापूर तालुका : दाताळा 2,लोणवडी 1, दे. राजा शहर : 40, दे. राजा तालुका : सिनगांव जहा 5, डोढ्रा 2, चिंचोली बुरूकुल 1, सावंगी टेकाळे 1, गिरोली 1, पांग्री 1, जळगांव जामोद शहर : 8, जळगांव जामोद तालुका : बोराळा बु 5, बोराळा खु 4, कजेगांव 4, पळशी सुपो 7, सुनगांव 1, मेहकर शहर : 25, मेहकर तालुका : नायगांव दत्तापूर 4, सावंगी माळी 2, सारंगपूर 7, कनका 1, पांग्री काटे 1, मादनी 1, महागांव 1, अंजनी बु 1, कळमेश्वर 2, जानेफळ 2, चिंचोली बोरे 1, खळेगांव 2, डोणगांव 1, सिं. राजा शहर : 10, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, आडगांव राजा 4, ताडेगांव 1, साखरखेर्डा 8, उमरद 2, दत्तापूर 1, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : लासुरा 1, जलंब 1, पहुरजिरा 1, मूळ पत्ता असोला ता. रिसोड 1, फत्तेपूर जि जळगाव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 567 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सिद्धार्थ नगर, चिखली येथील 65 वर्षीय महिला व गोपाल नगर, खामगांव येथील 78 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 514 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 117, खामगांव : 69, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 7, आशिर्वाद हॉस्पीटल 4, सहयोग हॉस्पीटल 3, कोविड रूग्णालय 5, मुलींचे वसतीगृह 8, अपंग विद्यालय 13, दे. राजा : 37, मेहकर : 13, जळगांव जामोद : 29, सिं. राजा : 31, नांदुरा : 43, मलकापूर : 91, शेगांव : 31, मोताळा : 12, संग्रामपूर : 6, लोणार : 2, तसेच आजपर्यंत 162856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 22379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 22379 आहे. आज रोजी 3505 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 162856 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 26230 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 22379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3629 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 222 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** ‘अपाम’च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेत 669 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व प्रकल्प कर्ज योजना • योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.16: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 669 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे. तसेच आतापर्यंत 771 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहे. या कर्ज प्रकरणांमध्ये 267 कोटी 64 लक्ष 56 हजार 874 रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 3776 अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी 1082 लाभार्थ्यांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले आहे. म्हणजे 1082 लाभार्थी पात्र ठरले. यापैकी 771 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. महामंडळाकडून 708 लाभार्थ्यांना व्याज परतवाना मंजूर करण्यात आला. व्याज परतावा 669 लाभार्थ्यांना सुरूदेखील झाला. आजपर्यंत 4 कोटी 69 लक्ष 4 हजार 91 रक्कम व्याज परताव्यापोटी वितरीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामंडळाची दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा आहे. यामध्ये 6 गटांनी अर्ज केले, 3 गटांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले. यामध्ये 42 हजार 140 रूपयांची रक्कमेचा व्याज परतावा झालेला आहे. तसेच प्रकल्प कर्ज योजनांमध्ये 19 गटांची संख्या आहे. अशाप्रकारे या तीनही योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यामुळे अर्ज करण्यास लाभार्थ्यांना सुविधा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेकडे सदर प्रकरण मंजूरीसाठी पाठविण्यात येते. बँकेले पाठविण्यासाठी लेटर ऑफ इंटेन्ट देण्यात येते. लेटर ऑफ इंटेन्ट बँकेकडे देण्यात आल्यानंतर सदर कर्ज प्रकरणात कर्जाची रक्कम देण्यात येते. तरी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर, 07262-242342 क्रमांकावर व महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी केले आहे. ******
जलजागृती सप्ताहाचे अधिक्षक अभियंता यांच्याहस्ते उद्घाटन 22 मार्च पर्यंत चालणार जलजागृती सप्ताह बुलडाणा,(जिमाका) दि.16: जागतिक जलदिन 22 मार्च निमित्त दि. 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जिल्हयात जलजागृती सप्ताहचे उदघाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांचे हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करून करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अधीक्षक अभियंता यांचे दालनात झालेल्या कार्यक्रमात जिल्हयातील खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा वाचन करुन पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवुन देण्याचे आवाहन केले. या सप्ताहा दरम्यान दि. 17 ते 21 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करतांना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड प्रादुर्भावाच्या लागु असलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आवाहन अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोष्टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता ईत्यादी विषयावर यशोगाथा आयोजित करणे. सोशल मिडीयावर पाणी बचती विषयी जनजागृती करणे अशाप्रकारे जास्तीत जास्त ONLINE स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्व विषद करुन, पाणी ही काळाची गरज असुन, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपकार्यकारी अभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड यांनी याप्रसंगी गृहीणींनी दैनंदिन काम काजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानजोडे, सहा.अधिक्षक अभियंता अंकुश गावित, लघुलेखक भरत राऊत, करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. संचालन व आभार प्रदर्शन मनजीतसिंग राजपुत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. ******* अवैधरित्या लाकडाने भरलेले वाहन पकडले नांदुरा – मोताळा रस्त्यावर वडाळी फाट्याजवळ कारवाई बुलडाणा,(जिमाका) दि.16: वनविभागातंर्गत मोताळा वनपरिक्षेत्रात 7 मार्च 2021 रोजी नांदुरा – मोताळा रस्त्यावर टाटा 407 वाहन विना परवानगीने निंबाचे अवैध लाकूड वाहताना आढळले. या वाहनावर वडाळी शिवारातील माऊली पेट्रोल पंपाजवळ कारवाई करण्यात आली. सदर वाहनाला हात देवून थांबविले असता वाहनात अवैध रित्या निंबाचे लाकूड आढळून आले. वाहन चालक शे. रजीक शे. महबुब वय 22 रा. वसाडी खु ता नांदुरा यास परवानगी व पास परवानाबाबत विचारले असता त्याने परवानगी व पास नसल्याचे सांगितले. याबाबत वाहन चालकाकडे अधिक चोकशी केली असता वाहन चालकाने सदर लाकडे मौजे शेंबा शिवारातून गाडी मालक शे. शाकीर शे जफीर रा. वसाडी खु यांनी आणावसाय सागितल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाहन क्रमांक एमएच 27 ए 4011 मध्ये निंब प्रजातीचे 08.00 घ.मी लाकडे अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतुक करण्याबाबत वनगुन्हा क्रमांक 763/16 7 मार्च रोजी जारी करण्यात आला. जप्त करण्यात आलेले वाहन टाटा 407 मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये जप्त करून ठेवण्यात आले आहे. सहायक वनसंरक्षक बुलडाणा व वनपरिक्षेत्र अधिकारी खामगांव, वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42 व महाराष्ट्र वन नियम 2014 मधील 31,47, 82, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 3 अन्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविले आहे. ******* भारतीय डाक विभागाकडून आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयेाजन बुलडाणा,(जिमाका) दि.16: भारतीय डाक विभागाने 15 वर्षापर्यंतच्या युवांसाठी write a letter to a family member about your experience with covid -19 या विषयावर 2021 आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयेाजन केले आहे. सदर स्पर्धा रविवार 4 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी इंग्रजी, मराठी, हिंदी यापेकी कुठल्याही ण्का भाषेत पत्रलेखन लिहायचे आहे. सदर स्पर्धेसाठी राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक 25 हजार रूपये, द्वितीय 10 हजार रूपये व तृतीय पारितोषिक 5 हजार रूपये असणार आहे. तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम 50 हजार रूपये, द्वितीय 25 हजार रूपये व तृतीय 10 हजार रूपये बक्षीस असणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जवळच्या डाक घरमध्ये किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त युवक - युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन डाक अधिक्षक ए. के इंगळे यांनी केले आहे. ********** असोला बु गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : चिखली तालुक्यातील असोला बु गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील लोकसंख्या 2450 आहे. टँकरद्वारे या गावाला दररोज 61 हजार 200 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ********** ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 248 उमेदवारांचा सहभाग बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यालयामार्फत 12 ते 14 मार्च 2021 कालावधीत पं. दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 248 उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करीत सहभाग नोंदविला. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात परम स्किल इंडिया ट्रेनिंग प्रा. लि औरंगाबाद, सतिशजी इन्फ्राटेक ॲण्ड मिडीया प्रा. लि चिखली, किसान इन्फोटेक प्रा. लि पुणे, रेनस्टॅन्ड इंडिया प्रा. लि पुणे, सुझूकी शोरूम बुलडाणा या कंपन्यांनी उमेदवारांच्या विविध 99 पदांसाठी सहभाग घेतला, असे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे. ******** गुणवंत खेळाडूंना मिळणार शासनाकडून पेन्शन बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे दि. 07 जून, 2018 रोजीच्या निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधुन अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. त्यानुसार गुणवंत खेळाडूंना पेन्शन मिळणार आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेच्या निकष क्र. 6 अन्वये सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त , गुणवंत खेळाडूस मासिक मानधन देण्याची तरतुद केली आहे. तसेच पेंशन 30 वर्षांपासुन (किंवा सक्रिय क्रीडा पासुन सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि खेळाडूच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेन्शन लागु करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधुन निवृत्त झाले असतील. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धांकरीता सदरची योजना लागु राहील. याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असुन, विहीत नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावायाचा आहे. याबाबत अधिक माहिती https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons या लिंकवर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे. असे राहणार दरमहा पेन्शन ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक - दरमहा 20,000 रूपये, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) - 16,000 रूपये, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) - 14,000 रूपये, सुवर्ण पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स - 14,000 रूपये, रौप्य व कास्य पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स - 12,000 रूपये. *****

No comments:

Post a Comment